विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk साचा:Username Change 10 70839 155618 155601 2022-08-09T12:23:54Z QueerEcofeminist 918 बदल wikitext text/x-wiki

[[file:Global renamer-logo.svg|75px|link=[[m:Global rename policy]]]]

तुमचे सदस्यनाव विकिमिडीया मधील काही मुख्य(इंग्रजी विकिपिडीया, विकिकॉमन्स इ.) प्रकल्पांच्या धोरणात बसत नाही, विकिपीडियाचे सदस्यनाव वैश्विक असल्यामुळे तुम्हांला तुमचे नाव बदलण्याची विनंती केली जात आहे.

सदस्यनावात वैश्विक बदल करण्याची विनंती करण्याची माहिती [[विकिस्त्रोत:सदस्यनाव बदला]] येथे देण्यात आली आहे! या पानावरील माहिती लक्षात घेऊन येथे दिलेल्या दुव्यांवर जाऊन सदस्यनावात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता. सदस्यनाव शक्यतो हलके फुलके व कोणत्याही प्रकारे कोणालाच दुखावणारे किंवा गैर वाटेल असे नसावे. जाहिरातबाजी, अश्लिल, अपमानकारक, पदे/सत्ता दर्शवणारे असे कोणत्याही प्रकारचे नाव नसावे.

a15m4c26ecf47zcv6fc0m23fprs294t 155619 155618 2022-08-09T12:25:05Z QueerEcofeminist 918 duva wikitext text/x-wiki

[[file:Global renamer-logo.svg|75px|link=[[m:Global rename policy]]]]

तुमचे सदस्यनाव विकिमिडीया मधील काही मुख्य(इंग्रजी विकिपिडीया, विकिकॉमन्स इ.) प्रकल्पांच्या धोरणात बसत नाही, विकिपीडियाचे सदस्यनाव वैश्विक असल्यामुळे तुम्हांला तुमचे नाव बदलण्याची विनंती केली जात आहे.

सदस्यनावात वैश्विक बदल करण्याची विनंती करण्याची माहिती [[विकिस्त्रोत:सदस्यनाव बदला]] येथे देण्यात आली आहे! या पानावरील माहिती लक्षात घेऊन [[विशेष:GlobalRenameRequest|येथे दिलेल्या दुव्यांवर]] जाऊन सदस्यनावात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता. सदस्यनाव शक्यतो हलके फुलके व कोणत्याही प्रकारे कोणालाच दुखावणारे किंवा गैर वाटेल असे नसावे. जाहिरातबाजी, अश्लिल, अपमानकारक, पदे/सत्ता दर्शवणारे असे कोणत्याही प्रकारचे नाव नसावे.

8ov8va8ryz3b1yt8h3e2kdj35vdvkcu 155620 155619 2022-08-09T12:26:07Z QueerEcofeminist 918 भर wikitext text/x-wiki

[[file:Global renamer-logo.svg|75px|link=[[m:Global rename policy]]]]

तुमचे सदस्यनाव विकिमिडीया मधील काही मुख्य(इंग्रजी विकिपिडीया, विकिकॉमन्स इ.) प्रकल्पांच्या धोरणात बसत नाही, विकिपीडियाचे सदस्यनाव वैश्विक असल्यामुळे तुम्हांला तुमचे नाव बदलण्याची विनंती केली जात आहे. सदस्यनाव न बदलल्यास तुम्हाला कायमचे ब्लॉक/तडीपार केले जाऊ शकते.

सदस्यनावात वैश्विक बदल करण्याची विनंती करण्याची माहिती [[विकिस्त्रोत:सदस्यनाव बदला]] येथे देण्यात आली आहे! या पानावरील माहिती लक्षात घेऊन [[विशेष:GlobalRenameRequest|येथे दिलेल्या दुव्यांवर]] जाऊन सदस्यनावात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता. सदस्यनाव शक्यतो हलके फुलके व कोणत्याही प्रकारे कोणालाच दुखावणारे किंवा गैर वाटेल असे नसावे. जाहिरातबाजी, अश्लिल, अपमानकारक, पदे/सत्ता दर्शवणारे असे कोणत्याही प्रकारचे नाव नसावे.

1m416in6uw9loqfmrqnsrw9upuf457w 155623 155620 2022-08-09T12:33:38Z QueerEcofeminist 918 bhara wikitext text/x-wiki

[[file:Global renamer-logo.svg|75px|link=[[m:Global rename policy]]]]

तुमचे सदस्यनाव विकिमिडीया मधील काही मुख्य(इंग्रजी विकिपिडीया, विकिकॉमन्स इ.) प्रकल्पांच्या धोरणात बसत नाही, तसेच ते विकिमिडीया [[M:Terms of Use/en#4. Refraining from Certain Activities|टर्म ऑफ युजच्याही]] विरुद्ध जाते. विकिपीडियाचे सदस्यनाव वैश्विक असल्यामुळे तुम्हांला तुमचे नाव बदलण्याची विनंती केली जात आहे. सदस्यनाव न बदलल्यास तुम्हाला कायमचे ब्लॉक/तडीपार केले जाऊ शकते.

सदस्यनावात वैश्विक बदल करण्याची विनंती करण्याची माहिती [[विकिस्त्रोत:सदस्यनाव बदला]] येथे देण्यात आली आहे! या पानावरील माहिती लक्षात घेऊन [[विशेष:GlobalRenameRequest|येथे दिलेल्या दुव्यांवर]] जाऊन सदस्यनावात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता. सदस्यनाव शक्यतो हलके फुलके व कोणत्याही प्रकारे कोणालाच दुखावणारे किंवा गैर वाटेल असे नसावे. जाहिरातबाजी, अश्लिल, अपमानकारक, पदे/सत्ता दर्शवणारे असे कोणत्याही प्रकारचे नाव नसावे.

floduhqkyhn00shb454ig8fzu9dd4ak 155625 155623 2022-08-09T12:35:19Z QueerEcofeminist 918 duva wikitext text/x-wiki

[[file:Global renamer-logo.svg|75px|link=[[m:Global rename policy]]]]

तुमचे सदस्यनाव विकिमिडीया मधील काही मुख्य(इंग्रजी विकिपिडीया, विकिकॉमन्स इ.) प्रकल्पांच्या धोरणात बसत नाही, तसेच ते विकिमिडीया [[M:Terms_of_use#4._Refraining_from_Certain_Activities|टर्म ऑफ युजच्याही]] विरुद्ध जाते. विकिपीडियाचे सदस्यनाव वैश्विक असल्यामुळे तुम्हांला तुमचे नाव बदलण्याची विनंती केली जात आहे. सदस्यनाव न बदलल्यास तुम्हाला कायमचे ब्लॉक/तडीपार केले जाऊ शकते.

सदस्यनावात वैश्विक बदल करण्याची विनंती करण्याची माहिती [[विकिस्त्रोत:सदस्यनाव बदला]] येथे देण्यात आली आहे! या पानावरील माहिती लक्षात घेऊन [[विशेष:GlobalRenameRequest|येथे दिलेल्या दुव्यांवर]] जाऊन सदस्यनावात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता. सदस्यनाव शक्यतो हलके फुलके व कोणत्याही प्रकारे कोणालाच दुखावणारे किंवा गैर वाटेल असे नसावे. जाहिरातबाजी, अश्लिल, अपमानकारक, पदे/सत्ता दर्शवणारे असे कोणत्याही प्रकारचे नाव नसावे.

f7gfo9xueho3qm4o3mclve82jefdixe पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३१ 104 70853 155617 2022-08-09T12:22:19Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|{{x-larger|'''३.'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}मध्यरात्रीचा दुसरा प्रहर उलटून गेला तरी अण्णाने दिलेली बातमी समोर येत नव्हती. समोर उभं राहत नव्हती. शेख्या, पक्या, अशक्या गप्पा मारतांना आता पेंगुळले होते. शेंदाडअप्पाच्या दुकानात परवा रात्री साडे आठ वाजता एक बैलगाडी उभी राहिली. पाचवं साखरेच पोत उचलणार तेवढयात अण्णा, अशक्यानी माल थेट पकडला होता. अशक्या तो प्रसंग खुलवून सांगत होता.
{{gap}}"अरे, त्या शेंदाड्याने शंभरा शंभराच्या एका नोटे पासून दाखवायला सुरुवात केली. धा नोटांच मखर समूर नाचवत होता पण आपण हाललो नाय. त्याला वाटलं शिवे बाहिर राहणाऱ्याचं लेकरू. दुसरं खेड्यातल्या सुताराच. नोटा पाहून इरघळतील, भाळतील... अण्णानं थेट सायकल मारली आणि रातच्याला पोलीस हवालदाराला पुढे घालून आनलं आन् पंचनामा केला. लई शिव्या देत होता. आई माई वरून." अशक्या थाटात सांगत होता.
{{gap}}"अरे पन् लेका, दुसऱ्या दिशी पुन्हा छाती काढून मोंढ्यात फिरत व्हताच की. पोलिसांना चारला मलिदा नि केली सावडा सावड. धूऽऽ त्यांच्या जिंदगानीवर" मझर शेख पचकन थुकला नि मनातला राग गिळून टाकला.
{{gap}}"शेख्या हे व्यापारी लई डांबरट. त्यांना जर का आपला प्लॅन कळला असंल तर? सगळा डाव ओमफस... ओ लई पेंग याय लागलीरे" असे म्हणत अशक्या बाजेवर आडवा झाला नि काही मिनिटांच्या आत घोरायला लागला.
{{gap}}मोंढ्यात व्यापाऱ्यांच्या आडतीवर काम करणाऱ्या हमालापैकी काही विश्वासातले हमाल आडती समोर बाज टाकून झोपतात. राखण म्हणून. अशोकच्या घरातली बाज रेवणआप्पांच्या आडती समोर टाकून, डोक्यावर पांघरूण घेऊन आण्णाच्या बातमीची<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ३१ }}</noinclude> ho7ex5iyvbgbjaxcve15j29ngex91cw पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३२ 104 70854 155621 2022-08-09T12:26:14Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>वाट पहात ते दोघे बसले. पण बातमी आलीच नाही.
{{gap}}एप्रिल-मे महिन्यात सूर्यालाही झोप येत नसावी बहुदा. सातच्या आधीच उन्हाचे झोत डोळयावर येऊ लागतात. साडेपाचलाच फटफटून कोनफळी प्रकाश पसरतो. अशक्या पहाटे कधी घरी पळाला हे कळलेच नाही. मझर शेखला जाग आली तेव्हा रेवणअप्पाचा गडी अंगणात पाणी मारीत होता.
{{gap}}"उठा... उठा.. दिवस कवाच उघडलाय. आन हित कशापायी बाज टाकली? मालक काय म्हणतील मला. हुटा अंगूदर. शेणाचा सडा टाकूद्या मला अं? आज मंगळवार बाजाराचा दिस हाय. खेड्यातून उरलं सुरलं धान शेतकरी घेऊन येतील. माल घेणाऱ्या आणि विकणाऱ्यांचा लोंढा आत्ता सुरु होईल. हुटा..हुटा.." गड्याच बोलण पूर्ण होण्याच्या आतच पक्या सायकल जोरात मारीत येताना दिसला.
{{gap}}"शेख्या, अशक्याची बाज त्याच्या घरी टाकून तू लगी लगी मंडीच्या मागच्या गल्लीत ये. मी अशक्याला घेऊन होतो पुढ. बातमी रेड हँड पकडलीये. श्री भैय्या, बाप्पा देशमुख... समद्यांना सांगून हित आलो मी. आण्णा, सच्या, सद्या, पाप्या समद्यांनी ट्रक आडवून धरलाय..."
{{gap}}पक्या अशोकला घेऊन आला नि डबलसीट घेऊन नजरेआड गेलाही. गरिबाच्या घरात चिमणी पेटवायला, चूल पेटवितांना गवरीवर घालायला उलीसक सुध्दा रॉकेल मिळत नाही. रूपया सव्वा रूपयाला बाटली भरून मिळणार रॉकेल थेट आठन् दहा रूपयावर पोचलेल. खेड्यात तर ती बाटली पंधरा रूपयाला मिळे. मजूरी मिळणार बारा रूपये गड्याला आणि आठ रूपये बाईला. रॉकेल नाही तर रात्री दिवाबत्ती कशी पेटणार? इस्टू कसा पेटवावा? लाकड तरी स्वस्त होती का? या दुष्काळात महागाईचा तेरावा महिना. व्यापारी मालममाल व्हायला लागले होते... शेखच्या मनात विचार येत होते.
{{gap}}मंडई मागच्या अरूंद गल्लीत गर्दी जमा झाली होती. श्री भैय्या, बाप्पा देशमुख रॉकेलचा टँकर असलेल्या ट्रकमध्ये घुसले होते. ज्याने ट्रक मागवला तो व्यापारी पुढे येणार तरी कसा? ड्रायव्हर बिचारा गोंधळून गेला होता.
{{gap}}"ड्रायव्हरदादा दोष तुमचा नाही. आम्हाला कळतंय. तुम्ही टँकर घेऊन तहसीलमध्ये चला. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही." श्रीभैय्या ड्रायव्हरला शांतपणे विनंती करीत होते.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ३२ }}</noinclude> 9pczjq7t0wd1c2o42bb4hwj69jtb9p4 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३३ 104 70855 155622 2022-08-09T12:30:41Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}"शिऱ्या, लेका बामणी भाषेत समजूत घालून कुठ कळत का रे यानला? ये ऽऽऽ येतो का नाय आमच्या बरुबर? की बसू चाकावर? मला बी येती गाडी चालवाया." बप्पांनी दम भरला आणि ट्रक सुरु झाली. ट्रक मागे अनेक बघे नागरिक. 'बदलावं' युवा संघटनेची पोर गाडी तहसील कचेरीच्या कंपाऊंड मध्ये उभी केली. एकाच्या घरून खुर्च्या टेबल आणले. लिटर अर्धा-लिटरची माप आणली. कोरे कागद आणले असं सामान मुलांनी भराभरा जमा केल. पक्या आणि अशक्या बसले लिहायला. शेख्या आणि आण्ण्या रॉकेल मोजून द्यायला, श्रीभैय्यानी जाहीर केले की प्रत्येक घरागणिक दोन लिटर रॉकेल मिळेल. आणि भाव सरकारी एक रूपया वीस पैसे लिटर. हा हा म्हणता रांग लागली. दुपारी दोन अडीचपर्यंत टँकर रिकामा झाला. गिऱ्हाईकांची यादी सही व अंगठ्यासह करून ठेवली हाती. यादी करण्यापूर्वीच कार्बन पेपर आणून ठेवले होते श्रीभैय्याने, हे त्यालाच सुचणार ! मनी, उषापण सामिल झालया. त्यांनी बायांची वेगळी रांग लावली. रॉकेल घेणान्यांची नावे, किती रॉकेल विकले त्याचा आकडा तहसीलदारांच्या हवाली करून पैसे व रेकॉर्ड मिळाल्याची त्याची सही घेतली. सही घेताना श्रीभैय्यांनी काशही कडक आणि कोरड्या शब्दात तहसीलदाराला बजावले. "साहेब तुमच्या डोळयावर नोटाची पट्टी बांधलीय हे कळतय आम्हाला जी बातमी आम्हाला कळते ती तुम्हाला पोलिसखात्याला कशी कळत नाही? पुन्हा असं झाल तर रॉकेलचे पैसेही भरणार नाही. फुकट वाटून टाकू लबाडीचा माल..." हे सारे संपूवन सगळे जण श्रीभैय्याकडे थकवा घालवायला गेले. सगळे जण जमेस्तो संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. एवढ्यात आंद्या आला नि टेबलावर ठेका धरित गाऊ लागला. {{center|<poem>भुंगड़ा ऽऽ ओ ऽऽभुंगडा ओ ऽऽ भुंगडा ऽऽ कांद्यासाठी, तेलासाठी दुकान आप्पाचं फोडा ऽऽ ओ ऽऽ भुंगडा खाऊ भुंगडा ऽऽ मंगळवारातल्या ग्यानबाचा उजवा डोळा लंगडा ऽऽ हो लंगडा</poem>}}<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ३३}}</noinclude> ovpbycl3ibje2xim4wqo06cdh48eydg पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३४ 104 70856 155624 2022-08-09T12:35:10Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|<poem>डावीकडच्या दुकानवाल्याला गुदगुल्या करून झोडा चुरमुऱ्याच पोतं दणकावून फोडा ऽऽ खाऊ भुंगडा ऽऽ ओ भुंगडा ऽऽ</poem>}} {{gap}}मग अशक्या, शेख्या, सद्या, पद्या सगळयांनी ताल धरला. काहीनी फळीवरच लोखंडी घमेल काढल काहींनी बुकीने कांदे चेचून वाटी... थाळयाच्या कडा, विळी, चाकू घेऊन कांदे चिरायला घेतले. श्रीनाथने तेलाची बरणी, लाल तिखटाचा आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा डबा समोर ठेवला.
{{gap}}"अनूवैनी चला ना भुंगडा खायला. सकाळपासनं पोटात भाकर तुकडा नाय. लई भूक लागलीय चला ना." सदानंद वैनीला आग्रह करू लागला.
{{gap}}"अनुवैनी आम्ही किती किती गोंधळ घालताव हो घरात कंदी तरी रागवत जा ना आम्हाला." प्रकाशने पुस्ती जोडली.
{{gap}}"ताई या गोंधळात, पुस्तकात मन शिरत का हो?" निक्याने विचारले
{{gap}}"तर... तर! ह्या गोंधळातून तर तुमचा श्रीभैय्या आणि मी एकत्र आलो उलट या गोंधळात मस्त मन लागतं माझ पुस्तकात, अरे हे पीएच.डी. चं भूत माझ्या मानगुटीवर नसतं ना तर मीही तुमच्यात आले असते. शिवाय तुम्ही आहात म्हणून तर आयता भुंगडा मिळतोय मला." अनुने हसत पुस्तक मिटवले. आणि ती बाहेरच्या खोलीत आली.

{{gap}}सकाळचे सात वाजून गेले होते. श्री अजून झोपलेला होता. १६ मार्च पासून महाविद्यालय बंद झालयं. पण ग्रंथालयात बसायला हव. लागणारी नवी पुस्तक ग्रंथपाल जोशींनी, प्राचार्यांनी परवानगी घेऊन मागवून दिलीत. या छोट्या गावात एक स्त्री घर सांभाळून पीएच.डी. करतेय याचंही कौतुक आणि मदतीचा प्रेमळ हात. सहा-सात वर्षात अनू या गावाशी एकरूप झालीय. आई जनकला घेऊन गेलीय. या दुसऱ्याच्या आगमनाची संभाव्य तारीख दसऱ्याच्या आसपास म्हणजे अभ्यासाला ऑगस्टपासून चार महिने मस्त मोकळे. माहेरपणाचे. त्याचाच उपयोग करायचा. येणाऱ्या जूनपूर्वी प्रबंध सादर करायचाच. मनात विचारच विचार. तिने घड्याळात पाहिले आठ वाजले होते. तिने स्वतःसाठी डबा भरला. ग्रंथालय साडेसातला उघडते. आता निघायलाच हवे असा विचार करून अनूने श्रीला हलवले.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ३४ }}</noinclude> snq901aagt1tumk1gy8953dwrbq4dbj पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३५ 104 70857 155626 2022-08-09T12:42:29Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}"श्री मी निघते रे कॉलेजात, तुझ्यासाठी दशम्या आणि ठेचा बांधून ठेवलाय. आणि आत्ताच्या न्याहरी साठी दीड दशमी, तुझी स्पेशल चटणी आहे. कपाटात दही पण आहे. पोटभर खाऊन जा. आज रात्री येणार आहेस का? किती वणवणतोस रे राजा? इतकी धावपळ, काही हाती लागणार आहे का पण? आणि हे बघ एकटा नको बाबा डोंगरात जाऊस. आनंद, प्रकाश, कोणाला तरी घेऊन जा..." असे म्हणत अनूने श्रीनाथच्या कपाळावर अलेले दाट केस कुरवाळले. आणि त्यावर अलगद ओठ टेकवून, येते रे, असे म्हणून बाहेर निघाली.
{{gap}}तिचा घनदाट लांब शेपटा ओढून श्रीने तिला जवळ घेतले, 'हा ऽऽ य' असा सित्कार काढीत तिने शेपटा त्याच्या हातातून सोडवला.
{{gap}}"तुझ्या या असल्या लाडामुळे माझे केस कमी होतील." ती खोटया खोट्या रागाने बडबडली. तिचा हात धरून तिला कॉटवर बसवीत अन तिच्या मांडीवर डोक ठेवीत श्री पुटपुटला,
{{gap}}"अने, मी झोपलो असलो की तुला प्रेमाच भरत येत. तुला काय वाटत, मी खरच झोपलेला असतो?"

{{gap}}"अे, मी जागा असताना कर ना प्यार... व्यार. प्लीज." श्रीच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेत अनू बाहेर आली आणि जिना उतरू लागली आणि श्री घोरू लागला.
{{gap}}श्रीनाथच्या स्वप्नात नुसते पाणीच पाणी घोंगावत पुढे येते होते. घुसळत उड्या मारीत होते. पण ते ओंजळी घेण्यासाठी पुढे जावे तसे ते मागे मागे जाई. पाण्यात ओंजळ बुडवली तरी ओंजळ कोरडीच. त्याचा जीव तहानेने व्याकून झालेला. घशाला कोरड सुटलेली. बदबदून सुटलेला घाम त्याने ओंजळीत धरला नि गटागटा पिऊन टाकला. त्याची तुरट चव. कुबट वास...
{{gap}}श्रीनाथला एकदम जाग आली, त्याने बावरून इकडे तिकडे पाहिले घड्याळातला छोटा काटा आठ वरून पुढे सरकला होता. तो तटकन उठला. हौदातलं तळाशी गेलेलं वरवरच पाणी अलगदपणे वाकून काढलं. तोंडावर शिपके मारले. अनूसाठी दोन बादल्या भरून न्हाणीत ठेवल्या आणि तोंड धुवुन, झटपट आंघोळ करून तो दशमी खायला बसला.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ३५ }}</noinclude> 580sngo0vqu2hylbtrolzbd1rs0mos3 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३६ 104 70858 155627 2022-08-09T12:46:15Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}... काल तो आणि बाप्पा देशमुख सहा खेड्यांतून जाऊन आले. धानवट्याचे लामतुरे डॉक्टर, डॉक्टर मोहन त्या भागातही काही खेडी कव्हर करणार आहेत. डोंगरातल्या दगडवाडी, देवठाण, लमाण तांडा अशा अगदी मध्यातल्या भागात त्यांना जायचे आहे. गरज पडली तर देवठाणच्या खरातला निरोप केलाय, की मुक्कामाला थांबू म्हणून. अवघ्या चार दिवसावर मोर्चा येऊन ठेपला आहे. त्याचं नियोजन सोपी बात नस्से. नीट आखणी तर केलीय. पण जसजसा दिवस जवळ येऊ लागला तशी थोडी अस्वस्थताही वाढतेय. खेड्यातले माणसे भाकरी बांधून आणणार आहेत. पिठलं... झुणका मात्र 'बदलाव' संघटना करणार आहेत. त्याची जबाबदारी कोण घेणार? शिवाय भोंग्याचा खर्च... असे अनेक विचार दशमी खातांना मनातून वहात होते. एवढ्यात मोटर सायकलचा हॉर्न वाजला. दशम्यांची शिदोरी आणि पाण्याची बाटली त्याने शबनम मध्ये टाकली. घराला कुलूप घातले. किल्ली सुधा वहिनींच्या खिडकीतून आत टाकित तो पायऱ्या उतरणार इतक्यात.
{{gap}}ओ, श्रीनाथ, घरात या. बायकोने केलेला फर्मास चहा प्या आणि मग कामाला लागा. तुमच्या मित्रालाही बोलवा. गुड न्यूज देतो तुम्हाला. या...या..." मोहिते काकांनी अडवले. चहा प्यावासा वाटतच होता. श्रीनाथने प्रकाशला वर येण्याची खूण केली आणि तो घरात शिरला. काकांनी त्याच्यासमोर पेपर टाकला आणि म्हणाले वाचा.
{{gap}}मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील सततच्या दुष्काळावर कायम स्वरूपी तोडगा. येत्या सोळा एप्रिलला मुख्यमंत्र्यां समवेत पाचही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. केंद्र सरकार या जिल्ह्यांमध्ये रोजगाराची हमी देणारी कामे सुरु करणार आहे. तातडीच्या नियोजनाची आखणी होऊन एक मे, महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आष्टी, पाटोदा, केज, अंबाजोगाई, कळंब, निलंगा आदि तालुक्यात कामे सुरु होणार.' दैनिक मराठवाड्यात पुढच्या पानावर बातमी होती. श्रीनाथने बातमीवरून नजर फिरवली.
{{gap}}"काका, ही कामे म्हणजे रस्ते आणि जोडरस्ते बांधणे, पुल रूंद करणे किंवा नवा बांधणे अशीच असणार. दुष्काळालाच बांध घालणारी काम का नाही शासन काढीत?"
{{gap}}"श्रीभैय्या, आम्हां अधिकाऱ्यांची जात सर्वात बेरकी, लबाड आणि बदमाश. वसंतराव नाईकांनी सामुदायिक विहिरींची योजना इंट्रोडयूस केली होती आठवतं? अत्यंत चांगली योजना. आपल्याकडे २५ एकरापेक्षा अधिक एकर जमिनीच्या<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ३६ }}</noinclude> och10xlbtk93jy4hghuh0t3y9e34x3a पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३७ 104 70859 155628 2022-08-09T12:50:48Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>मालकाची संख्या त्या मानाने कमी आणि दीड दोन एकरवाले छोटे शेतकरी जास्त. इकडच्या जमिनी कोरडवाहूच. छोट्या शेतकऱ्याला बारा चौदा हजाराची विहीर परवडणार नाही. म्हणून तीन, चार शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विहिरीचा खर्च करावा. शासन त्याला मदत करील. पाण्याचे समान वाटप करावे. पाळीपाळीने पाणी घ्यावे. अर्थात न भांडता तंडता... अशी ही योजना."
{{gap}}"न भांडता? हे कस व्हावं? भाऊ सख्खे आणि दाईद पक्के, ही म्हण काय आभाळातून पडली? सामाईक विहिरीवरून वाद वाढले नसते तर माझे शेतीतील डबल पदवी घेतलेले पतीराज, सातारा सोडून या मुरमाड माळावर आले असते का?... म्हणे अधिकारी बेरकी असतात!" सुधा वहिनी मध्येच खर बोलल्या "गप्पेऽऽऽ अधिकाऱ्याची बायको म्हणून श्यान नग मारूस. तर ही योजना आपल्या भागात फक्त कागदावर राहिली. आम्ही अधिकारी आणि आमचे पिट्टू कारकुंडे कागदी घोडे नाचविण्यात लई तरबेज असतोत. तस्सच झालं. घ्या शोध हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या सामुदायकि विहिरी दाखवा आणि हज्जार रूपये मिळवा. माझ्याकडून. मात्र आमचं नाव न सांगता हं. आम्ही आपले झाडं लावणारे अधिकारी. पाणीच नाही तिथे झाड कशी लावणार?..."
{{gap}}'चला चला उठा, तुमचा लई वेळ खाल्ला आमी.' अस म्हणत पोटावर हात फिरवीत नि मिशांना पीळ भरीत मोहिते काका गदगदून हसले.

{{gap}}दगडवाडीचा चढाव चढतांना मोटार सायकल हातात धरूनच चढावे लागते. प्रचंड दमछाक. अवघा चढाव दगड गोट्यांनी लदबदलेला. भर बाराचं ऊन डोक्याला गमछा बांधला तरी झळा कानाला वाफाळत होत्या. चढाव चढून आल्यावर प्रकाशने गाडी सुरु केली. ते गावात आले. गाव कस सुनसान, वडाच्या पारावर दोन जख्खं म्हातारी माणसे बसली होती. पारावरच्या देवळीत मुंजाबाचा लाल सेंदूर फासून ठेवलेला दगड होता. तो पहाताच पक्याने माथा टेकून दर्शन घेतले. ते क्षणभर पारावर टेकले. बाटलीतल कोमट झालेलं पाणी घशात ओतलं. पण श्रीनाथच्या मनात सामुदायिक विहिरीचं पाणी झिरपत होतं.
{{gap}}"बाबा, गाव लईच सुनसान दिसतंय. मानसं ऱ्हातात की नाय? कुठ गेली समदी?"
{{gap}}म्हातारबाबा ठार बहिरे होते. एकाने क्षणभर डोळे उघडले आणि पुन्हा मिटून घेतले. इतक्यात समोरच्या बाजून एक वयस्क बाई आणि दोन तरूण महिला<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ३७ }}</noinclude> tl7lkkkx124ac9v26bqer20obfj8nx9 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३८ 104 70860 155629 2022-08-09T12:55:05Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>डोक्यावर, कमरेवर पाण्याच्या घागरी घेऊन येतांना दिसल्या. प्रकाश त्यांना काही विचारणार इतक्यात श्रीनाथने त्याला गप्प राहण्याची खूण केली.
{{gap}}"पक्या, आपणच पुढ होऊन बघूया पाणी कुठून आणतात ते." असं म्हणत ते चालायला लागले. अवघ्या दहा मिनीटात ते एका खोल दरीपाशी येऊन उभे राहिले. डोंगराच्या उतारावरून चिंचोळी पायवाट खाली उतरत होती. खोल पायरी सारखे दगड नीट रचून ठेवलेले. एकेक पायरी उतरून मध्यात यायचे. तिथे मात्र जरा मोकळी जागा होती. दोन मोठया धोंडयावर चपटे दगड टाकून टेका तयार केला होता. घळीतून उतरून गेले की निळाई नदी. उतरण्यासाठी समोर प्रचंड रूंद असा वाळूचा पट्टा. नदीची खूण सांगणारा. त्या पात्रातही काही बाया दिसल्या. डोक्यावरून, अंगभर पदर घेऊन साड्या कसून बांधलेल्या. पात्रात खड्डे खणलेले. ते आदल्या दिवशी सांजच्याला करून ठेवायचे नि सकाळी त्यात साठलेले नितळ झालेले पाणी घागरीत भरायचे. बारकी पोरं मग नारळाची करवंटी किंवा लहान वाटीतून घागरीत पाणी भरत होती.
{{gap}}"ओऽऽ भाऊ, येक तर वरी तरी चढून जावा, नायतर खाली उतरा. आमचा रस्ता मोकळा करा." एक प्रौढ बाई अंगावर मऊपणे खेकसली. दोही पटकन खाली उतरून आले.
{{gap}}दोन्ही बाजूंनी बुटक्या डोंगराच्या रांगा. बोडक्या डोक्यांसारखे दिसणारे भकास पिवळे डोंगर व तुळतुळीत दगडांची टेंगळं. मधून लांबच लांब वाळूचा पट्टा. त्या वाळूच्या पट्याची रूंदी चांगली चौडी आहे. फार वर्षापूर्वी निळाईचे पात्र मोठे असावे. श्रीभैय्या, प्रकाशने वर चढायला सुरुवात केली. चढतांना दमछाक झाली. मनात आलं, गावातील बाया कशा आणित असतील खेपेला दोन-दोन घागरी भरून? आणि मध्यावर चापट दगड, मोठ्या दोन दगडांवर ठेवून जो ठेपा केला होता, त्याची महतीही लक्षात आली. तिथे घागर टेकायची. क्षणभर दम घ्यायचा आणि परत चढण चढायची. गरज आणि अडचणी माणसाला शहाणं करतात हे खरं.
{{gap}}पारावर आता एक लंगडा माणूस येऊन बसलेला दिसला. त्याला पाहून दोघांनी रामराम घातला.
{{gap}}"बाबा, गावात माणसं दिसत न्हाईत. किती वस्तीचं गाव हाय? बायाच दिसतात काम करताना." श्रीनाथने विचारले.
{{gap}}"व्हय, व्हय कस्सं. तुज्या कापडांवरून सरकारी मानुस दिसत न्हाईस. मंग तुज्यापाशी बोलून काय उपेग? कस्सं? सरकारी असतास तर आमचं गऱ्हाणं तिकडं जाऊन गायलं असतंस, कस्सं?" त्या लंगड्या म्हाताऱ्याने उत्तर दिले.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ३८ }}</noinclude> 8dyn98bn6bqo8fozr41k8ypcyqenmnl पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३९ 104 70861 155630 2022-08-09T13:00:25Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}"बाबा आमी शेरातून आलाव. परळी अंब्याकडचे हाव म्हणा की. आमी बी बोंबलू की तुमच गाऱ्हाणं. आंब्याच्या तहसिलीत जाऊन." प्रकाश बाबांच्या जरा जवळ सरकत बोलला.
{{gap}}लंगडा बाबा सांगू लागला.
{{gap}}"अरं या दगडवाडीत शंभरावर घरं हाईत. हितं धनगर, हटकर, वंजारी लोकांची वस्ती लई. दोन बामनाची, दोन मारवाड्याची कामापुरती घरं कस्सं. आन् पाचसात आमा देशमुखाची आन् मराठ्याची. पाऽऽर पल्याड दोन कोसावर लमाणतांडा हाय. तांडा नि वाडी मिळून हजार बाराशे माणसांची वस्ती होती. पन आता मातूर पन्नासेक घरांना कायमचं कुलूप लागलया. बामन, मारवाडी शेरात हालले आहेत. थोडे देसमुख, हटकर पुन्या, ममईकडे गेलेत कायमचे. सकरांत झाली की धनगरं सांगली साताऱ्याकड मेंढरं घेऊन जातात. ती दोन पाऊस झाल्यावरी येतात पन गेल्या दोन वरसात कोनी फिरकलं नाय. तांड्यात असतील दोन चार घर, आन वाडीत धाईस. त्यांतही आमच्यासारखी लंगडी, लुळी, पांगळी, म्हातारी माणसं आणि लेकुरवाळ्या नायतर वयस्क बाया बापड्या, गावात कोनी खरचलं तर खांदा द्याया चार माणसं शोधावी लागत्याल.

{{gap}}बाकी तुमाले सांगून काय उपेग? आमचा अंकुश बी ग्येला की म्हाताऱ्या लंगड्या चुलत्याला मागं टाकून. वाडा आन् रान सांबाळाया बसवून. शंभर रूपये मातर दरमहा न चुकता पाठवतो. ...जरा हात देता का राजे हो. वाड्यात जाऊन बसतो. कस्सं?" श्रीनाथने हात देऊन उठवले कुबडी दिली.
{{gap}}"बाबा नाव सांगा ना. विचारू ना?" प्रकाशने उदास आवाजात विचारले. "नावात काय आहे राजा? कस्सं? ... मी रामराव देशमुख. देसमुखी कवाच बुडाली. पडक्या गढयांची माती बी इकून खाल्ली. नावाचं 'देसमुख' कस्सं?" असं म्हणत बाबा हसले आणि कुबडीवर भार देत, लोंबता लुळा... लटका पाय सावरीत घराकडे निघाले.
{{gap}}'श्रीभैय्या पुढचं देवठाण, बांगरी करू नि माघारी फिरू. हे उजाड माळ, इथली बेसहारा... निराधार मानसं पाहून डोकं गरगराया लागलंय.' पक्याच्या शब्दात हताश उदासी होती. "पक्या उदासून कसं चालेल? देवठाण, भावठाण, यल्डा, साकूड, सोनवळा, ममदापूर.... डोंगरपिंपळा, सोमनवाडी... नाही नाही म्हटल तरी डोंगरातली तीसपस्तीस खेडी गाठायचीत चार दिवसात. अशक्या, डॉक्टर मोहन, शेख्या, ग्यानू<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ३९ }}</noinclude> l1qcph6od10o7o10tjvd56hkkq7o6vr पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४० 104 70862 155631 2022-08-09T13:05:46Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>.... आपण सारेच आज रात्री एकत्र जमणार आहोत. एक टीक साकुडाकडे गेलीय तर दुसरी यल्डा भागात आणि चंदू, नारायण डोंगरमध्यातल्या ममदापूर, टोकवाडीत जाऊन येणारेत. आपण आज सोनवळा, डोंगरपिंगळा करून देवठाणला जाऊ आज रात्री मिटींगला पोचायचंय. ध्यानात धर. चल दसम्या खाऊन घेऊ. भुकेजलाहेस. श्रीभैय्याने दशम्यांची शिदोरी उघडली. लसणीच्या चटणीचा वास नाकातून थेट पोटात पोचला. बारके कांदे, भाजलेले शेंगदाणे, कैरीचा तक्कू. अनू गुळ तुप घालून केलेल्या दशम्या फार चांगल्या बनवते. सहाही दशम्या कधी संपल्या पत्ता लगला नाही. पक्याने मोटरसायकल सुरु केली. दगडगोटे, खाचखळग्यांनी भरलेला वाकडा तिकडा रस्ता पार करून ते दोघे सोनवळ्याच्या रस्त्याला लागले. रस्ता असा नाहीच. पांदीतून वाट होती. भवताली वैराण शेतं. नाही म्हणायला अधून मधून वेड्या बाभळी आपले पिंजारलेले काटेरी केस झुलवीत उभ्या होत्या. गेल्यासाली पंधार जून उलटला तरी पावसाचा टिपूस नाही नुसतं भरारा धावणारं वारं होते. यंदा काय होतं ते देव जाणे. सोनवळ्यात बैठक घेतली. एक जख्ख म्हातारी दोन बायांचा आधार घेत थरथरत आली.
{{gap}}"लेकरा, आमा बुढ्यांची कायतरी सोय बघा. दोन्ही पोरं लेकरंबाळ घेऊन ममईला भाकरतुकडा शोधाया गेलीत. मला म्हातारीला कसे नेणार? या शेजारच्या बायांनी सांगितलं दोन दिसाला मोरचा की काई हाय म्हनं आंब्याला. लेकरा, आम्हा बुढ्यांना एकखट्या इख तरी घेऊन टाकाची सोय करा रं. आमच औक्ष तुमाले लागू द्ये बाबा पन काय तरी कर रे..." म्हातारीचं बोलणे ऐकूण क्षणभर सगळेच स्तब्ध झाले.
{{gap}}"अे, सुभे वडीमायला न्ये तिकडं. हित लई महत्वाच्या गोष्टी बोलायच्यात." सोनवळ्याचे नरहर अप्पांनी गावच्या लेकीला सांगितले.
{{gap}}बैठक संपली. डोंगरपिंपळयाला जायला श्रीचे मन तयार होईना. ते देवठाणला पोचले, तेव्हा सूर्य माथ्यावरून कलला होता. सहा साडेसहा वाजून गेले असावेत. मांगवाड्यातल्या विहिरीवर हंड्यांची रांग लागलेली होती. श्रीनाथ, प्रकाश खराताच्या वाड्याकडे वळले आणि गाडी थांबवली. फटफटीचा आवाज ऐकताच खरातभाऊ बाहेर आला.
{{gap}}"वाटत पहात होतो, श्रीभैय्या तुमची. समद्यांना सांगावा दिलाया. तुम्ही साळंकडे जावा. म्या एक फेरी मारून पोचतोच तिकडं. आबा मालकांनी बत्ती, सतरंजी पाठिवलिया. आन् पल्याडच्या बांगरीत बी सांगावा धाडलाय. तितली मानसे बी हितंच येनार हाईत...?" किसनला मध्येच अडवित प्रकाशने सवाल केला.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ४० }}</noinclude> 07pkscptybvuan5i1dys00zrakkdkjt पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४१ 104 70863 155632 2022-08-10T05:37:14Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}"दादा, ही एवढी लांबलचक हांड्यांची रांग? तुमच्या वस्तीत तर जेमतेम दहा घरची न्हाईत."
{{gap}}'अरं' ही त्याची' करनी.' आकाशाकडे बघत खरातभाऊ बोलले. "गावातल्या समद्या हिरी आटल्या. फक्त साळं समुरची हिर आन् आमची हिर जित्या हाईत. पण साळंच्या हिरीतले झरे बी आटत चाललेत. आमच्या हिरीचं पानी मातर पार आटत न्हाई. बामणाची मारवाड्याची नि देसमुखाची पाचदहा घरं सोडली तर आख्खं गाव हितं येत पानी भराया. किसनने आभाळाकडे पाहात श्रद्धेने हात जोडले... आणि धावत्या चालीने गावाकडे वळला.
{{gap}}शाळे समोरच्या विहिरीजवळी बायांची तुफान गर्दी होती. दोन चार गडी मानसं होती. सारीजण विहिरीत वाक्-वाकून पहात होती. श्रीभैय्याही विहिरीजवळ गेला त्या खोल...खोल विहिरीत पाहून त्याला धक्का बसला त्या खोल खोल विहिरीत एका चिमुकल्या सात आठ वर्षाच्या मुलीच्या कमरेला दोर बांधून, बादलीत बसवून विहिरीत सोडले होते. लहान वाटीने ती पाणी घागरीत भरून देत होती. पाणी असेल जेमतेम पाऊल भर. श्रीनाथ माघारी फिरला. शाळेच्या ओसरीत टाकलेल्या जाजमावर जाऊन बसला. गावकरी त्या भागातल्या तक्रारी सांगत होते.
{{gap}}"दादा, देवठाण्याहून आडलेली बाई आंब्याच्या दवाखान्यात बाजेवर घालून नेतांना उशीर झाला, तर तिरडीवर ठिवावी लागली ती बाज. कंदी व्हावा रोड? खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी गत. कंदी व्हावा रोड? किंतीन दिस तंगडीतोड करावी.

{{gap}}"कंदी यावी यष्टी?"
{{gap}}"कंदी याव्या लाईटी?"
{{gap}}"आमच्या घरची पोरं चौथी झाली की बसनार घरी. मास्तर बरा हाय, गावतलाच हाय म्हणून बरं. पन सातवी, मॅट्रिक काढायची तर पळा परळीला नायतर केज, आंब्याला जावं लागतं. तिथं खोली करायची. भाकर करून खाऊ घालण्यासाठी बाईमाणूस ठेवा. हा दाम दुप्पट खर्चा आमाले कसा परवडावा?"
{{gap}}"चौधरी मास्तरानी, आजवर गावकऱ्यांचे धा अर्ज दिले... असतील तालुक्याला पण गेले असतील कचरा कुंडीत!" लोक अडचणींचा पाढा वाचत होते. काही बाया दूरवर उभ्या राहून पहात होत्या. त्यांना किसनदादांनी हाक घातली.
{{gap}}"या...या. शेवंतामावशी याना. तुमची बी फिरयाद घाला शिरीभैय्यांच्या कानावर."
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ४१ }}</noinclude> 12isq5cd8dbv75kgqi60yi6yj09j9y0 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४२ 104 70864 155633 2022-08-10T05:42:17Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}डोईवरचा पदर आदबीने पुढे ओढून, अंगभर पदर घेऊन शेवंतबाई आणि सहा सात जणी पायऱ्या चढून ओसरीवर आल्या. थोड्या बाजूला बसल्या.
{{gap}}"दादा पाण्याचे हाल तर हायेतच, पन पोरी कमी शिकलेल्या म्हणून चांगली पोरंबी मिळनात लगिन करायसाठी. आजकाल शेरातल्या पोरी शिकाया लागल्याता. सातवीपसवर तरी साळा हवी बगा." एक जण बोलली.
{{gap}}"दादा पाण्याचे हाल हाईतच, पण दारूचा लई ऊत माजलाय. आज तुमी आलाव, म्हणून समदे शुध्दीवर हाईत. नायतर एव्हाना तर्रऽऽ होऊन बसणार. मंग पैशासाठी... तिखट भाजीसाठी बायकूला बदड. पोरांना मार. घरातली भांडी बासनं ईक ..."दुसरीने पुस्ती जोडली.
{{gap}}"व्हय माय. त्याचा बी कायतरी बंदोबस्त करा दादा." तिसरी.
{{gap}}श्रीनाथने सगळे ऐकून घेतले. चोविस एप्रिलच्या मोर्चात गावातील झाडून सर्वांनी सामिल होण्याचे आवाहन केले. भाकऱ्या बांधून आणायला सांगितले. रात्री 'बदलाव' चे कार्यकर्ते मंगळावारातल्या शिवाप्पांच्या घरात जमले. सर्वच खेड्यातल्या अडचणी सारख्याच होत्या. पिण्याच्या पाण्यासाठी दोन दोन कोस चालून पाणी आणायचे. खेडी ओस पडत चाललेली. मोर्चातील मागण्याचे निवेदन तयार केले आणि काहीशी लांबलेली बैठक संपली.
{{gap}}श्रीनाथ घरी पोचला तेव्हा रात्रीचे दोन वाजून गेले होते. तो आत आला आणि घड्याळात दोनचे टोल पडले. आजची बैठक खूप लांबली. तहसील मोमिनाबादला असल्याने मोर्चा मोमीनाबाद ऊर्फ अंबाजोगाईत... आंब्यातच निघणार होता. तेथील कार्यकर्त्यानी झुणका, चटणीची जबाबदारी घेतली होती. महाविद्यालयातले प्राध्यापक, विद्यार्थी जोमाने कामाला लागले होते. गेल्या चार पाच वर्षात श्रीनाथने चांगला गट तयार केला होता. पाच पंचवीस पोरं हां हां म्हणता जमा होत. शासनाला जाब विचारणाऱ्यांची, अभ्यास करणाऱ्यांची आणि संघर्षाला तयार असणाऱ्यांची फळी निर्माण व्हायला हवी असे श्रीनाथला नेहमी वाटे. त्याची ही सुरूवातच जणु.
{{gap}}अनू गाढ झोपली होती. श्री ने तिच्या डोळ्यावरचा चष्मा काढून खिडकीत ठेवला. हातातलं पुस्तक काढून शेल्फमध्ये ठेवलं. आणि त्याने दिवा मालवला. पण डोळ्यासमोर डोक्यावर दोन दोन घागरी घेऊन चढ चढून येणाऱ्या बाया, खोल विहिरीत बारक्या पोरीला उतरवून, वाटी वाटीने पाणी भरून वर ओढल्या जाणाऱ्या घागरी आणि मरण मागणारी ती म्हातारी माय... आलटून पालटून येत होते.
{{Css image crop |Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf |Page = 42 |bSize = 371 |cWidth = 36 |cHeight = 20 |oTop = 533 |oLeft = 326 |Location = right |Description = }}<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ४२ }}</noinclude> 5znx5a0aa0t2jhy26wdf418yaocnwe0 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४३ 104 70865 155634 2022-08-10T05:46:04Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|{{x-larger|'''४.'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}गोविंद दादांचा आवाज ऐकून आंजा झोपडीच्या बाहेर आली. देवठाणचे गोविंद दादाच होते ते. 'अंकुशा...अंकुशा' अशी हाक देत होते. पदराला हात पुशित आंजा झोपडी बाहेर आली.
{{gap}}"दादा, या ना. कवा आलात? सोनूचे पप्पा दादरला कामागवर गेलेत. सांजच्याला येतील. दमा, मी खुर्ची टाकते." असे म्हणत ती आत गेली. खुर्ची आणून अरूंदशा अंगणात ठेवली. डोक्यावर आदबीने पदर घेऊन दादांच्या पायाचे दर्शन घेतले. लगबगीनी झोपडीत जाऊन स्टीलचा पाण्याचा तांब्या आणला. ग्लासमध्ये पाणी ओतून दादांना दिले. गिलास नगं तांब्याच दे असे म्हणत दादांनी तांब्या हातात घेतला आणि ते गटागटा पाणी प्यायले. त्यांच्या हातातला तांब्या घेत "दमा म्या च्या टाकून येते" असे म्हणत आंज्या परत आत गेली.
{{gap}}"कशी आहेत गावाकडची सगळी जण? दगडवाडीला कंदी गेला होता? लई आठवण येते समद्यांची. तुमचं कसं येणं झालं इकडे?" दादांच्या हातात चहाचा कप देत तिने अनेक प्रश्न समोर टाकले. दादा हसले, "हाईत समदी बरी. तुमी कसे हाव ते सांग. रूळलीस का या ममईत? झोपडी किरायाची का? आन् शिवा जवळच राहतू का?" चहाचा कप खाली ठेवत गोविंद दादांनी विचारले.
{{gap}}"व्हय, पोटाला कालवणा संगट दोन कोर भाकर मिळतेय. दोन पैसे बरे मिळताहेत. मग रूळावलाच हवं की हितं. शिवादादांनीच दिलीया ही झोपडी. इथून दोन ठेसनं गेली की दादर लागतं. तिथल्या बिल्डींगीच्या ईटकामाचं कंत्राट शिवादादांनी घेतलय. सोनूचे पप्पा त्यांच्या हाताखाली काम करतात. आपल्या तिकडचे पंधरा-एक घरांतले बाप्ये आलेत इकडे. माझ्या सारख्या सातजणी बायापण आहेत. आमी<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ४३ }}</noinclude> qhtdtphrowr7g00fq944k2f7gikmov0 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४४ 104 70866 155635 2022-08-10T05:50:32Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>लेकरंबाळं घेऊन आलेल्यांना झोपड्या दिल्याता. इथून जवळच रस्त्याच्या पल्याड बिल्डिंगा दिसतात नव्हं? तिथ मी बी काम करत्ये. आज सुट्टी घेतलीय. म्हणून भेट तरी झाली. सोनूला जवळच्याच सरकारी पाळणा-घरात सोडते. तिथे महिन्याला पंचवीस रूपये भरावे लागतात. चार घरी मी झाडू पोछा आणि पोळ्या करते. महिन्याला आठशे रूपये मिळतात. समदी घर जवळच हायती..."
{{gap}}"... पण, दादा गावाकडची लई आठवण येते वं. माझंच पुराण सांगत बसले मी! तुमी हितं कसं येण केलंत? ते सांगा." खालचा कप उचलत आंजाने विचारले.
{{gap}}"रातच्याला येतो की. अंकुशाला सांग. समदेच भेटतील. मंग सांगतो का आलो ते. हितंच टाकीन पथारी. जवळच यष्टीचा थांबा हाय वाटतं?" असं म्हणत खांद्यावर पिशवी अडकवून दादा बाहेरच्या गर्दीत दिसेनासे झाले.
{{gap}}सायन जवळच्या या झोपडपट्टी येऊन वरीस उलटून गेलंय. सुरवातीला लई जड गेलं. पाण्यासाठी रांगेत उभं राहणं एक वेळ परवडलं. पण संडासला जायचं म्हणजे नरकात जायचं. गावकडे पांद होती. मोठमोठ गोटे होते. इथे काय? रस्त्याच्या कडेची गटार नाही तर रेल्वेच्या कडेची गटार पाहायची नि बसायचे. डोक्यावरचा पदर तोंडावर ओढून घ्यायचा. आंजाच्या झोपडपट्टीतल्या बाया रात्री निजानीज झाली की बाहेर जाऊन उरकून येत. आंजाला आता त्याची सवय झालीये.
{{gap}}तिने खाली काढलेला स्टोव्ह निटपणे ठेवला. शेजारी दुधाचं भगोनं ठेवलं. त्यावर मोठं भगोनं पालथं घातलं. मांजरीची भीती. भाजीच्या टोपल्यावर फडकं ओलं करून चहुबाजूंनी झाकून टाकलं. पैशाची बारकी पिशवी कमेरला खोचून ती झोपडीच्या बाहेर आली. आणि तिने झोपडीला कुलूप घातले. शेजारच्या छगूला सांगून ती दादरला निघाली. गेल्या दीडदोन सालात रोजचे पेपर वाचायची सवय झालीय. परवाच्या लोकसत्तेत जाहिरात आलीय. तीन वृध्द व्यक्तींची देखभाल करण्यासाठी महिला हवी. तिच्या कुटुंबातील पुरुषास रोजगार मिळेल. मात्र, कुटुंब निर्व्यसनी हवे. कुटूंबात पाहूण्यांची ये जा नको. आणि पत्ता शिवाजीनगर, दादर असा होता. दादरचौपाटीच्या अलिकडच्या रस्त्याच्या मधल्या बोळात एक टुमदार बंगला होता. बंगल्यावर बोर्ड होता. अंदाज घेत तिने बंगल्याच्या फाटकावरची बेल दाबली.

{{gap}}आंजा अंकुशाची कधीची वाट पहातेय. पण त्याचा पत्ता नाही. अंधार पडलाय. दोन आनंदाच्या बातम्या त्याला द्यायच्या आहेत. पहिली बातमी देवठाणचे गोविंद<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ४४ }}</noinclude> 8v191ebepptrsaejrazftwb20tomryi पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४५ 104 70867 155636 2022-08-10T05:55:39Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>दादा आल्याची आणि दुसरी तिच्या नव्या नोकरीची. दादरच्या त्या बंगल्यात दोन म्हाताऱ्या बाया आणि एक म्हातारे दादा राहतात. एक म्हातारी पासष्टीची तर दुसरी नव्वदीच्या पल्याड पोचलेली. आणि म्हातारे बाबा सत्तरीचे. वझे साहेब आणि वैनींचे दोन्ही मुलगे परदेशात असतात. इथे ही तीन म्हातारी माणसे. नव्वदीच्या आईचे सारे जिथल्या तिथे करावे लागते. त्यासाठी मजूरीण हवी होती....
{{gap}}... वांगी शिजली, वरण भात शिजला. पण अजून सोनूच्या पप्पांचा पत्ता न्हाई. आंजा वैतागली आणि चपात्या टाकाया बसली. सोनू भात खाऊन झोपली आहे. चपात्या डब्यात भरून ठेवल्या नि काटवट धुवायला ती बाहेर आली. अंकुश, शिवादादा, गोविंददादा आणि एक दोघे अनोळखी गडी रस्ता ओलांडताना दिसले. पुन्हा चपात्या टाकाव्या लागणार आणि भाजीला वाढवा द्यावा लागणार. अंजाच्या मनात आलं. तिने लगेच डेचक्यातल पाणी भाजीत ओतलं. भाकरीच्या पिठाचा डबा बाहेर काढला.
{{gap}}"अंजा कॉट खालच्या घडीच्या खुर्च्या काढ नि दे बाहेर. शिवादादा बी इथंच जेवतील..." अंकुशाने झोपडी जवळ जाऊन मोठ्याने सांगितले.
{{gap}}"ताटं तयार करून भाईरच देते. यावा आत." आंजाने अंकुशाला हाक दिली. जेवण झाली. आजांनेही दोन घास खाऊन घेतले. बाहेर प्लॅस्टिकच्या पट्टयाच्या घडीचा कॉट टाकला आणि तीही बाहेर येऊन बसली.
{{gap}}"अंकुशा, 'बदलाव तरूण इकास' मंडळाशी पवार साहेब बोलणार हाईत उद्या. आपल्या गावातले चाळिस-पन्नास लोक आलाव आमी. गेल्या साली रोजगाराची काम सरकानं काढली पण पोटं फुगली मधल्या मुकदमांची. केज - धारूर रस्ता पयल्यापासून हाय. पण आता केज- आडस - देवठाण असा मधला रस्ता बांधाया घेतलाय. पण रस्ता कागदावरच. तो काळाढुस्स मोपलवार आठवतो का? त्याच्या मायानं लोकांची भांडी घासून पोराला शिकिवलं. तो झालाय मुकादम. त्याची मजूरांची यादी बी आणलीय बाप्पा देसमुखानं. पवार सायबांना दाखवायला. अव जी माणसं जलमीच न्हाईत त्यांची नाव हाईत यादीत. नितीन गडदे, शैलेश सोनर, संगीता पाटील... अशा फेसनबाज नावाच्या पोरांनी कंदी खंदाव्या बराशी? कसे फोडावे दगड? गवाच्या कवा सर्गात पोचल्याली म्हातारी मानसं बी दावलीत त्या यादीत. तुझा आजा पांडवा किसन देसमुख, माजा बाप तुकाराम इठोबा गुंजाळे...समदे बराशी खंदाया हजर<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ४५ }}</noinclude> 9j29w3zp9yjuhgj0nbt7uajw66xu72y पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४६ 104 70868 155637 2022-08-10T06:06:39Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>होते." गोविंद दादा सांगत होते. ऐकणाऱ्यांची हसाव की रडाव अशी गत.
{{gap}}"अंकुशा, ल्येका तू गेला संकरातीनंतर त्या नंतरच्या सालीच बाबासाबाची जयंती झाल्यावर २४ एप्रिलला लई मोठा मोर्चा काढला आमी बदलाव तरूण इकास मंडळानी. पाच-दहा हजार माणसं असतील, तीन हजारावर बाया असतील मोर्च्यात. मिरग आला नि न बरसता ग्येला. आर्द्रा आल्या नि गेल्या. या साली हस्ताचा पाऊस आला. पण तो लोखंड्या हस्त. समदी जिमिन गच होऊन बसली. शेतकऱ्याला आशा असते वो. तशा दुष्काळात जमीन नीट नेटकी कराया झटला. मंग बदलाव तरून इकास मंडळानी ठरिवलं की मोर्चा काढायचा आन् डेपूटी कलिक्टराच्या हापिसावर हल्ला बोल बोंबलायचं. येक टोक हापिसात होतं तवा दुसरं टोक भर बाजारात होतं. समदे लोक भाकऱ्या बांधून आलेवते. बदलावच्या पोरांनी झुनका नि मिर्चुचा ठेसा दिला. म्हाताऱ्यांसाठी खिचडी केली होती. आपल्या देवठाणच्या शेवंतामावशी, दगडवाडीची राणूमाय, भामरीची उषा मास्तरीण यांनी ऐन वेळी भासणं ठोकली. शेवंता मावशीनं तर गानं जुळवून म्हटलं." {{left margin|4em|हाताला न्हाई काम, कनवटीला न्हाई दाम
पोटात न्हाई भाकर, च्यात न्हाई साकर
अन सरकारा, नकोस मारू गमज्या,
आंदी खाली उतर...}} {{gap}}मंग राणूमाय कशी व्हावी मागं. {{left margin|4em|जिमनीचा घसा कोरडा, घरात पोरांचा उताडा
मालक ओढतो कोरडा, दारू पायी इकला वाडा
अरं सरकारा, दारूचा माठ तुमी फोडा
नायतर खाली उतरा...}} {{gap}}लई झ्याक झाला मोर्चा.
{{gap}}"अरं गोईंदा खेड्यातल्या बायांना काय अक्कल नसती? लई हुशार नि बेरकी असतात बरका, भाकर तव्यावर टाकली तर त्याचीच पचते अन् फिरते. कालवण बी त्यांनीच करावं. अरं म्हणून तर हा रेसमी शालू बांदून ठिवावा लागतो बासनात. येगवेगळ्या पक्षांची माणसं बी आली असतील मंग." शिवादादांनी विचारले.
{{gap}}"आले की समदेच. जनसांघ, काही कांग्रीसची मानसं, सोसालिस्ट आंबेडकरवाले<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ४६ }}</noinclude> 1mr8er18lkvghkyih1mpg61ztv7o0wr पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४७ 104 70869 155638 2022-08-10T06:13:00Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>समदेच आलेत. पण म्होरक्या शिरीभैय्याच. आरं आपल्या भागातील लई माणसं पुन्या ममईकडे येतात. का तर जमिनी कोरडवाहू. गेल्या चार सालापासून दुसकाळाचा फेरा. आपल्या मुलखात शंभरातली ऐंशी हिस्सा जिमीन मोठ्या तालेवार शेतकऱ्यांकडं असती. आन् त्यांची संख्या शंभरात जेमतेम पंधरा. ते हिरी पाडू शकतात. पैसा असतो त्यांच्याकडं. आन् शंभरातली वीस हिस्सा जमीन आपल्यासारख्या दीड दोन एकरवाल्या शेतकऱ्याकडं. आपन छोटे शेतकरी सत्तरटक्के. बिगर शेतीवाले शंभरात. जेमतेम पंधरा." गोविंददादांनी ठेक्यात सांगितले.
{{gap}}"व्हय, व्हय, घरी लेकीचं लगीन काढलं, नाय तर बुढ्या माणसांची मौत झाली तर पैसा लागणार. धा-वीस हजाराच्या आसपास. अशा वेळी जवळ विकाया काय असतया? मग काढा जमीन. घाला सावकाराच्या घशात. अवं अशा वेळी कालचा लहान काश्तकार रस्त्यावर येऊन उघडा व्हतो." अंकुशाला गोविंद दादाच बोलण पटलं. अन् त्याने आपले मन मोकळे केले.
{{gap}}"अंकुशा अरं तुझ्याच तोंडचे शब्द श्री भैय्या बोलतात. ते म्हणतात, आजचा लहान शेतकरी उद्याचा भुमिहीन मजूर बनून देशोधडीला लागतो. ममई पुण्याच्या झोपडपट्टीतील कुटुंबाची माहिती काढली तर लक्षात येतं की हजारो मजूर बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातून आले हायेत. मराठवाड्यावर अडिचशे वर्ष निजामाने सत्ता गाजविली. सामान्य शेतकऱ्यांसाठी, बलुतेदारांसाठी कोणत्याही योजना आणल्या नाहीत. रझाकाराच्या धामधुमीत माणसं भरडली गेली. बायांना सूर्यदर्शन व्हत नव्हतं. आपला भाग भारतीय स्वातंत्र्यानंतर तेरा महिन्यांनी निझामाच्या जोखडातून बाहेर आला. महाराष्ट्रात आमचे पाच जिल्हे घालण्यासाठी आमी हट्ट धरला. त्याला बी आज वीस वर्षे होऊन गेली तर काय मिळालं आपल्याला?...अं.." बोलताना गोविंददादांना धाप लागली.
{{gap}}"दादा शांत व्हा. तुमचा प्रत्येक शब्द खरा आहे. पण आता बाप्पा श्रीभैय्या आणि अनेक तरूण या प्रश्नाला भिडले आहेत ना? अशा वेळी आपण खेड्यातल्या लोकांनी त्यांच्या बरोबर व्हायला हवं." दादांना शांत करीत अंकुश बोलला.
{{gap}}"व्हय व्हय.... अरं तुझ्यासारखी थोडंफार शिकल्याली पोरं ममई, पुण्याकडं बराशी खंदाया येऊन बसली तर त्या शेरातल्या जाणत्या पुढारी पोरामागं काय आम्ही खेड्यातल्या बुढ्यांनी जायच?" अंकुशाचा हात झटकीत गोविंद दादा बोलले. पुन्हा<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ४७ }}</noinclude> 0fstux80a9zncaew44tbkgjqvf0wyot पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४८ 104 70870 155639 2022-08-10T06:16:54Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>कोणीच बोलेना. जो तो उठून मुकाट झोपडीकडे गेला.
{{gap}}अंकुशच्या हातात दोन उशा आणि चादरी देत आंज्याने गोविंददादांना हटकले, "दादा तुमची समदी चर्चा राजकारणाची. गावाकडचं सांगानं काही. आमचे काका कसे हायीत. शिवादादाची थोरली कारभारीन कशी हाय. त्यांचं मोठं पोरगं आंब्याच्या योगेसरी शाळत घातलं म्हणं. भोसल्याची गया मावशी गडदेमामाची राणूमाय...सगळ्यांची लई आठवन येती हो..."
{{gap}}"हाईत समदी बरी... आंज्ये एकांदी चक्कर करा दिवाळीच्या टाईमाला. परत्यक्ष भेटा. लई झोप याला लागली. घे लावून दार." असं म्हणत त्यांनी रस्ता पार केला.
{{gap}}दादरच्या बंगल्यातल्या नोकरीची चांगली बातमी सोनूच्या पप्पांना सांगणार कधी? उद्या सकाळी सांगू असं मनाशी म्हणत आंजाने दोन चटया बाहेर दिल्या आणि ती आडवी झाली.
{{gap}}.... निळाईतून एक घागर नि एक बारकी बिंदगी पाणी आणताना तिची दमछाक होई. चार खेपात ती पार गळून जाई. तरी अंकुशा माणुसकीचा नवरा. चढाव चढून आली की तो बाकीचा रस्ता काटून पाणी घरात नेऊन टाकी. यंदाही पाऊस नेटका झाला नाही. भेगाळलेलं उजाड, चारदोन बाभळीची झाडं उभी असलेलं त्याचं शेत,... रान डोळ्यासमोर आलं. जिमीन किती तहानली असंल. तिच्या अंगावरून गेल्या दोन बरसांत कुणाचा हात फिरला असेल...? विचार करता करता केव्हा तरी आंजाचा डोळा लागला.
{{gap}}'आंजे मी आज कामावर जाणार न्हाई. शिवादादांना सांगितलंय. गोविंददादा बरोबर शिरी भैय्यांना भेटून येतो.' अंकुश बाहेर जाताना आंजाला सांगत होता.
{{gap}}"आवऽऽ मिनिटभर थांबा. दादर चौपाटी समूर वझे सायबांचा बांगला आहे. त्यात तीन म्हातारी माणसं राहतात. त्यात एक नव्वदीची जख्ख आजी आहे. जिचं सगळंच जिथल्या तिथे कारावं लागतं. चोविस तास माणूस पायजे. राहायला खोली त्ये देणार. नि वर पाचशे रूपये. मी छान सेवा करीन म्हातारीची. दादरहून तुम्हाला पण जवळ ऱ्हाईल कामाची जागा. मी काल बोलून आले. आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना फोन करून काय ते सांगावं लागेल. सोनूला पण वळण बरं लागेल. होय? सांगा काय ते..." आंजाने विचारले.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ४८ }}</noinclude> 7g08qm82ef2s21zdtavp7pycn8171yl पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/४९ 104 70871 155640 2022-08-10T06:20:36Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}"तुला जे पटेल ते कर. पण उद्या तुझं काम त्यांच्या मनाला आलं नाही तर... विचार करून सांग माझी ना नाही".... अंकुश निघून गेला.
{{gap}}मुख्यमंत्री वसंतदादा यांना वेळ नव्हता म्हणून पवार साहेबांनी श्रीभैय्या, बाप्पा देशमुख, आण्णा, अशोका, कौसडीकर पाटील आदि शिष्टमंडळाचं निवेदन मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्विकारलं. आणि मोजक्या आठ दहा जणांना चर्चेसाठी बोलावलं. बाप्पांनी अंकुशालाही येण्याचा आग्रह केला आणि तो गेला. एक गाव एक पाणवठ्याच्या दौऱ्यात श्रीनाथ आणि पवार साहेबांची ओळख झाली होती. त्यांच्या मनात पवार साहेबांबद्दल विश्वास होता.
{{gap}}श्रीभैय्या आणि बाप्पा देशमुख सर्वाच्या मनातले दुःख पवार साहेबांच्या समोर मांडत होते. दहावी बारावी पास झालेल्या डोंगरातल्या तरूणांच्या शेताला पाणी नाही. उच्चशिक्षणासाठी शहरात ठेवायला बापाजवळ पैसा नाही. धोब्याच्या कुत्र्यासारखी गत. न घरका न घाटका. याचं जित्तं उदाहरण म्हणजे अंकुश. त्यातून तो विचार करणारा. वर्तमानपत्र वाचणारा आहे. गोविंददादांनी साहेबा समोर जितं उदाहरण ठेवलं अंकुशाचं. मुंबईत आल्यापासून तो बोलतोही नेमकं आणि बिनतोड. म्हणूनच त्याला सोबत घेणे गोविंददादांना महत्वाचे वाटले होते.
{{gap}}'दादा मी डोंगरातल्या दगडवाडीचा. धा एकराचा मालक. पण जमीन उताराची, दगडांनी भरलेली. ते दगड वेचून पौळ भरून पाणी आडवावं अस दहांदा मनात येई. पन त्यालाही पैसा हवं. बहिनींना उजवतांना घरातली भांडीकुंडी, बैल, औत इकले. हीर हाय पन पानी नाही. चार साल पानी पडलं नाही. खानार काय? शेवटी उचललं गठूड आन् आलो हितं. बारावी सायन्सला बावन टक्के घेऊन पास झालो. पन पुढे शिकाया पैसा हवा. आता करतो गवंडी काम. पन दादा आमची नाळ... आमचं मन गावाच्या मातीत पुरलंय. कंदीतरी गावाकडे जायचं सपन रोज उराशी घेऊन झोपतो. माज्या सारखे अनेक हाईत.' अंकुशचा आवाज बोलतांना जड झाला. रोजगार हमीच्या कामातही कसा भ्रष्टाचार चालतो याचे पुरावे बाप्पांनी समोर ठेवले. रस्ता केला तर तो दोन दिवसात परत होत्याचा नव्हता होतो. रोजगारासाठी काम गावापासून दोन किलोमिटरच्या पेक्षाही लांब असेल तर बायांना फार त्रास होतो. बायामध्ये नव्वद पंच्च्यानव्व टक्के अंगठा उठवणाऱ्या, त्यांचा अंगठा आठ रूपयावर घेतात पण हातात सहा रूपयेच पडतात. या कामावर साठ ते पासष्ट टक्के बायाच असतात.<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ४९ }}</noinclude> qdf7qlwg6vzc4v9hg5x0cyt98dmv16f पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५० 104 70872 155641 2022-08-10T06:24:39Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>त्यांच्या लेकरांचे पण कसे हाल होतात. साऱ्या अडचणी पवार साहेबांनी शांतपणे लक्षपूर्वक ऐकूण घेतल्या आणि त्या दूर करण्याचे विशेषतः पाळणाघर, अंगणवाडी कामाच्या जागी सुरु करण्याचे व काम दोन किलोमिटर पेक्षा दूर न ठेवण्याची शिफारस करण्याचे आश्वासन दिले. जाताना अंकुशाच्या पाठीवर दिलाशाची थाप दिली.
{{gap}}अंकुशाला त्याच्या दादांनी चौथीनंतर बनसारोळ्याच्या शाळेत शिकायला ठेवले होते. महिना पंधरा रूपयात जेवण आणि शाळेची फी. त्यामुळे अंकुश दहावीपर्यंत तिथे शिकला. दहावीत चांगले गुण मिळाले. परळीच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला खरा. पण तिथे वसतीगृहाची सोय नव्हती. खोली करून चौघे राहत. घरून येताना जवारीच पीठ, तांदुळ, दाळ घेऊन येत. हाताने रांधून खात. सकाळी सातलाच कॉलेजला जावं लागे. प्रयोगशाळेतील तास आटोपून घरी यायला संध्याकाळ होई. भाकरी नि तेल तिखट कांदा, नाही तर तव्याररचा झुणका असा दुपारचा डबाबरोबर घ्यावा लागे. रात्री मात्र डाळ भात नाहीतर भाजीची संगत लागे. पोटात भूक ठेऊन पुस्तकातही मन बसत नसे. त्यात संक्राती अगोदर दादांना बुळकी लागली. डॉक्टरच औषध मिळण्याआधीच अंगातलं पाणी कमी झाल्याने होत्याचे नव्हते झाले. तो दुःखाचा तडाखा जबरदस्त होता. आई तर आठवतच नाही. अंकुश नंतरच्या बाळंतपणात बाळबाळंतिण दोघेही दगावले होते. मूल आडवं आलं की बाईचं जगणंच संपलं. गावातली मन्नादाई तिला जमेल ते उपचार करी. पण अशी अडलेली एखांदीच वाचायची. अंकुशची आई मूल आडवे आल्यामुळेच मरण पावली. माय गेल्यावर त्याच्या दादांनी दुसरे लग्न केले नव्हते. अंकुशाने परीक्षा दिली पासही झाला. पण जुन्या रितीरिवाजानुसार चुलत्यांनी वर्षाच्या आत अंकुशचे लग्न करून दिले. अंजनी काळी सावळी पण नववी पास झालेली. लगीन झाल्यावर आडीच वर्षांनी सोनूचा जन्म झाला. एकोनसत्तर पासून पाऊस वेळेवर झालाच नाही. जुलै उजाडला तरी पावसाला सुरवात नसे. आगाताचे डोंगरात येणारे पीक म्हणजे पिवळा आणि उडीद. त्याच्या दहा एकरात धोंडे गोटेच जास्त. जेमतेम दीड एकर बरे रान होते. बाकी सगळे चढ उताराचे. पाऊसकाळ संपायला आला की हस्त दणदणा बरसून जाई. लोखंड्या हस्त पडला की जमीन गच्च होऊन जाते. लागोपाठ दोन वर्षे फार जिकरीची, कठिणाईची गेली. शेवटी लंगड्या रामकाकाला गावी सोडून तो<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ५० }}</noinclude> fz9dfe0gsj85s2gi36sj1l89lx0bd77 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५१ 104 70873 155642 2022-08-10T06:30:55Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>मुंबईला आला. रामूकाकाच्या खर्चासाठी दरमहा शंभर रूपयाच्या हिशोबाने तो येत्या जात्या सोबत पैसे पाठवी. तरीही काकाची आणि जमीनीची आठवण त्याला सतावित राही.
{{gap}}... मुंबई - परळी गाडी यायला अवकाश होता. संध्याकाळचे सात वाजून गेलेले होते. निवेदन घेऊन आलेल्या बहुतेक लोकांना मनमाड पॅसेंजर मध्ये बसवून पाच सात लोक एस.टी.ने जाणार होते. मनमाडहून पुढे काचिगुडा पॅसेंजर ने परभणी गाठायची. पुन्हा पूर्णा परळी या रूकुटूकू ब्रॉडगेज गाडीने परळीला जायचे. मग पुन्हा एस.टी. चा घंट्याचा प्रवास. ही माणसं परवा सकाळपर्यंत गावाकडे पोचली असती. उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे चौदा तासांचा एस.टी. चा खडतर प्रवार करून श्रीभैय्या, बाप्पा, गोविंददादा यांना परळी गाठायचे होते.
{{gap}}शिवादादांनी सर्वाना हॉटेलात पुरीभाजी खायला नेले. तिथेही गप्पा त्याच.
{{gap}}"भैय्या, माज्या शेतातली दीड दोन एकर जमीन जरी भिजली असती, तरी मी गाव सोडलं नसतं. इथेही कष्टच करावे लागतात. बिना कष्टाची भाकरी फक्त सावकार, सरकारी नोकर आन पुढाऱ्यांच्याच ताटात पडते. पाण्याची कायतरी युगत शोधा. पन् ... हे समदं लवकर व्हाया हवं दादा." अंकुश क्षणभर थांबला आणि दूरवर पहात पुन्हा बोलू लागला.
{{gap}}"...ही मुंबई.... इथलं राहणं, इथला झगझगाट एकदा का डोक्यात भिनला की तो उतरणं कठीण. इथे आल्यावर खूप नवे इंग्रजी शब्द शिकलो मी, माणसं दारूशी जशी 'ॲडिक्ट' होतात तशी ही मुंबईच्या 'हवे' शी पण ॲडिक्ट होतात. हितलं बरंमाळं जगणंच गोड वाटू लागतं.
{{gap}}येत्या काही वर्षात जर पाऊस पाणी बक्कळ झालं, माज्या शेताला पाणी लागलं तर मी सगळं सोडून दगडवाडीला येईन. हिरीसाठी पैसे पण साठवीन." अंकुशने मनातली बात बप्पा, भैय्याजवळ मोकळी केली. बप्पा हसले. अंकुशला पाठीवर प्रेमाने थोपटत म्हणाले, "बेटा, 'देर है, अंधेर नहीं' एक दिवस आपल्याला नक्कीच सूर्य दिसेल."
{{gap}}घरी परततांना अंकुशच्या डोळ्यासमोर कितीतरी प्रसंग, माणसे तरळून गेली. मुंबईत आल्यापासून पेपर हाती पडला की तो वाचून काढी. त्यांच्या झोपडपट्टीत टाटा कॉलेजातली पोरं पोरी गेल्या वर्षापासून दर मंगळवार, शुक्रवारी येतात. घराघरात<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ५१ }}</noinclude> dew10q606dusvcu49yug6i848x5x3r7 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५२ 104 70874 155643 2022-08-10T06:38:08Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>जाऊन तेथील बाया, लेकरं यांच्याशी गप्पा मारतात. त्यांना मदत करतात. पाळणाघर सरकारला काढायला लावलंय. त्या जागेत सायंकाळी वर्तमानपत्रं वाचायला सोय केली आहे. अंकुश घरी येण्यापूर्वी तिथे जातोच. मुंबईत आल्याने जग किती प्रचंड मोठे आहे हे पेपर मधून कळते. मुंबईचीही आता सवय व्हायला लागलीय, हेच खरं. आंजा सोनूला आणायला बालवाडीत गेली की शेजारच्या खोलीतली वर्तमान पत्रे वाचायला चुकत नसे. आसपासच्या बायांना जमवून तिने भिशी सुरु केली होती. महीन्याला दहा रूपये प्रत्येक जण जमा करी. महिन्यातल्या पहिल्या रविवारी सायंकाळी सगळ्या जमत. गप्पा मारीत. बाराजणींच्या नावाच्या चिठ्ठया आंजाने केल्या होत्या. एखाद्या लहान लेकराकडून चिठ्ठी काढली जाई. तिला एकेशवीस रूपये मिळत. मग तिच्या नावाची चिठ्ठी फाडली जाई. या निमित्ताने गावाकडची खबरबात पण कळे. कुणी ना कुणी गावाकडे जावून येई.
{{gap}}आंजा कामाला जाई त्या कमला दिदी खूप प्रेमळ होत्या. अजमेरजवळ त्यांचे माहेर होते. दादांची नोकरी मुंबईतली ते रोज चर्चगेटला जात. दिदी महिन्यातून चार दिवस स्वयंपाक करीत नसत. मग त्यांनी आंजाला चपात्या नि फलके करायला शिकवले. त्यांना बाळ येण्याची चाहूल लागल्यावर आंजाला चपात्या करायला सांगितले. शंभर रूपये पगार पण वाढला.
{{gap}}गेल्या सालची पहिली पंचमीतर सुनीच गेली. यंदा पंचमीला भिशीतल्या बायांनी रात्री भुलईचा फेर धरला. {{center|<poem>पंचमीचा सण नागोबा वेगीला मुऱ्हाळी यावा मला, पाठी भाऊ ग मागीला... वेडा बागडा भाईराया बहिणाला असावा चार आण्याची चोळी, एका रातीचा विसावा...</poem>}} {{gap}}भवतालच्या बायापण जमल्या. त्याही फेरात आल्या. एकीने सासुरवाशी भारजाचे भुलईचे गाणे म्हटले. एक तेलंगणातली प्रौढ अम्मा पुढे आली. तिनेही पंचमीचे वेळी फेरात म्हटले जाणारे गाणे म्हटले. सासू ऐवजी भावजय नणदेला कसे छळते, ठार मारून पुरते त्याची कथा सांगितली. त्या पुरलेल्या ढिगाऱ्यावर रंगीबेरंगी सुंगधी फुले फुलतात. त्या बाईची धाकटी बहिण ती फुले तोडायला जाते तर तिला बहिणीचे गाणे ऐकू येते.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ५२ }}</noinclude> lrzo1bebuqz33je2gwtitsl2j19xr19 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५३ 104 70875 155644 2022-08-10T06:44:13Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|<poem>मुट्टकु मुट्टकुओ येल्ले । मुहिनी चेत्रकु यलाले पद्दीना चेतिकी पवडालू। पाकरी मा अत्ता पामु ओंडी पेट्टींदी....</poem>}} गाण्यातून भावजय आणि सासूही कसा त्रास देते ते ती बहीणीला सांगते.
{{gap}}...ते गाणे आंजाला खूप लागून राहिले. तिच्या मनात आले. मला तर सासू नाही की सासराही. नणदांनी कधी वाकडा बोल लावला नाही. केलं कौतुकच. मग बाकीच्या सया आपापल्या कहाण्या सांगू लागल्या. बारा वाजून गेले. सगळ्याजणी आपापल्या झोपड्यांत परतल्या. पण नवा मैत्रीचा धागा गुंफून.
{{gap}}आंजा मुंबईत चांगलीच रूळली. तरी घरची, बहिणीची, बाप्पांची याद येईच...
{{gap}}अंकुशाला जेवायला वाढतांना आंजाने सांगून टाकलं की दादरच्या साहेबांच्या घरातलं इस्त्रीच्या सारखं कडक बंद वातावरणात आपला जीव घुसमटेल असं तिला सारखं वाटतं. इथे वस्तीत बायामाणसांची कचाकचा भांडणं झाली तरी त्यांत मनातला ओलावा आहे. एकमेकांना सांभाळून घ्यायचा रिवाज आहे. तिने फोन करण्याचे टाळले होते.
{{gap}}अंकुशला तिचा निर्णय ऐकून हसू आले.
{{gap}}"बरं...बरं... मुंबईत आल्यापासून माझी काळी राणी खूपच शहाणी व्हाया लागलीय. झोप आता." तरी पण सोनूचा विचार करून कायते ठरव असं म्हणत त्याने झोपडीतला बारका दिवा विझवून टाकला. {{Css image crop |Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf |Page = 53 |bSize = 369 |cWidth = 41 |cHeight = 27 |oTop = 378 |oLeft = 291 |Location = right |Description = }}<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ५३ }}</noinclude> fctqlx1syy8cqvjgdycsjzawaf7myqd पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५४ 104 70876 155645 2022-08-10T06:49:49Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|{{x-larger|'''५.'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}३० जून १९७५ ची रात्र दारावरची घंटा वाजली. श्रीनाथ दार उघडायला पुढे झाला. दारात पोलीस सब इनस्पेक्टर चाटे उभे होते.
{{gap}}'श्री भैय्या, तुम्हाला पाहुणचारासाठी न्यायला आलो आहे. पाहुणचार घ्यावाच लागेल. आठ पंधरा दिवसाच्या तयारीने चला.'
{{gap}}श्रीने अनुला उठवले. अनूला क्षणभर काहीच कळेना. 'अने, २६ तारखेला बाईने आणीबाणी जाहीर केली तेव्हाच मनाने संकेत दिला होता. काहीतरी अघटीत घडणार. तेव्हा बाईसाहेब उठा पंधरा वीस दिवस आम्ही माहेरपणाला निघालोत. तेव्हा तयारीसाठी मदत करा. 'माहेरपण' काय तुम्हालाच असतं?' अनूला हलवून भानावर आणित श्रीनाथ चेष्टेच्या सुरात बोलला.
{{gap}}जनक आणि इराला अनू उठवतेय असे पाहून श्रीने तिला थांबवले.
{{gap}}"अने, पिल्लांना उठवू नकोस मुलं घाबरून जातील. पोलिस स्टेशन मधून मी तुम्हाला फोन करीन. मुलं घाबरून जातील. अंदाज घेऊन त्यांना नीट समजावून सांगुया..."
{{gap}}अनुने दोन नेहरू शर्टस, पायजामे, अंथरायची चादर, पांघरायची सोलापूरी चादर, दाढीचे सामान, टुथपेस्ट, ब्रश, साबण.... असे जमेल ते सामान तिने घाईघाईने एका बॅगमध्ये भरले. आठवणीने लवंगा आणि भाजलेली बडीशेप, तीळ, ओव्याचे मिश्रण एक मोठ्याशा डबीत भरून दिले. बॅग श्रीच्या हातात देतांना भरून आलेले डोळे वाहू लागले.
{{gap}}"अरे वेडी की काय तू?..." अनुच्या कपाळावर अलगद ओठ टेकीत तिच्या पाठीवर हात फिरवून तो मुलांच्याकडे वळला. इरा आणि जनकला डोळाभर साठवून तो बाहेरच्या खोलीत आला. मोहिते काका, काकू, खालचे जोशीदादा कोणालाही न<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ५४ }}</noinclude> imdy19ugu9j82doovhywanjgc1u0671 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५५ 104 70877 155646 2022-08-10T06:54:38Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>उठवता तो जिना उतरून खाली आला आणि पोलिसांच्या गाडीत बसला.
{{gap}}मध्यवर्ती पोलिस चौकीमध्ये जनसंघ, समाजवादी, कम्युनिष्ट, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, युक्रांद, एस.एफ.आय. इत्यादि काँग्रेस विरोधी पक्षांच्या व संघटनांच्या कार्यकर्त्यांचा जणू अड्डा जमला होता. प्राध्यापक, वकील, डॉक्टर्स, विद्यार्थी, कार्यकर्ते सुमारे बावन्न जणांच्या गप्पाना ऊत आला होता. तरूण कार्यकत्यांना गट हाहा हुहु करीत घोळका करून एका बाजूला बसला होता. अशक्याने ओरडा करायला सुरवात केली. {{center|<poem>खुडबुडती... खुडबुडती पोटातले उंदीर खुडबुडती मामांचं घर धांडोळली धांडोळती बाबा धांडोळती पोलिस मामा या लवकर झपट आणा पिठलं न् भाकर झन्नक झूँ चटणी नि तेल चविला आणा गुळ नि साखर तरच इथलं जेवण रूचेल, तर मामांचं जेवण पचेल...</poem>}} बाकीच्यांनीही त्यात सूर मिळवला. टाळ्यांचा ताल सुरू झाला.
{{gap}}"थांबा, काही सिरियसनेस आहे की नाही तुम्हाला? आणीबाणीचा अर्थ कळतो? श्रीनाथराव तुमच्या मुलांना जरा समज द्या?" देशकर काका जोरात सर्वांच्या अंगावर ओरडले. खिशातल्या पाकिटातली शंभर रूपयाची नोट काढून हवालदाराला देत जरब देऊन सांगितले.
{{gap}}"जवळच्या 'समाधान' हॉटेल मधून शंभर चपात्या, भाजी नि चटणी घेऊन या. पोरं भुकेली आहेत. तुमची 'बावनपत्तेकी' साग खाण्या आगेदर बरं जेवण जेवणार आहोत. आमच्या पैशांनी." श्रीनाथ, बप्पा देशमुख यांनीही त्यात भर टाकली. तासाभरात शंभर सव्वाशे पोळ्या, मिरचूचा खर्डा पिठलं हॉटेलचे नाथा महाराज घेऊन आले. स्वतःची म्हणून किलोभर जिलबी आणली.
{{gap}}पंधरा मिनीटात चपत्या नि पिठलं होत्याचे नव्हते झाले. एवढ्यात बीडहून बिनतारी निरोप आला, की सर्वाना जेलमध्ये कोंडा आणि तासाभरात रिपोर्टिंग करा... काय कृती केलीत ते कळवा. चाटे साहेबांनी वायरलेस केला.
{{gap}}"सर इथल्या तुरुंगात दोनच खोल्या आहेत. तिथं चार आधीचे कैदी आहेत.<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ५५ }}</noinclude> ookuo5p4uytdbjnw9jgoxfftmmqmvn3 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५६ 104 70878 155647 2022-08-10T07:03:08Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>एका खोलीत कोपऱ्यात मोरी आहे. तिला आडोसा नाही. सर, सर्व कैदी, वकील, डॉक्टर, प्राध्या...” पी.एस.आय.चे वाक्य तोडीत बीडहून कडक शब्दात बजावले गेले.
{{gap}}"हा आदेश दिल्लीचा व्हाया मुंबई आला आहे. तात्काळ पाळा."
{{gap}}तुरूंगातल्या त्या खोल्या म्हणजे साक्षात नरक, कित्येक वर्षात झाडू लागलेला नसावा. कोपऱ्यात भिंतीवर जाळ्यांचे साम्राज्य पसरलेले. आणि भेसूर डोळयांचे, केस दाढी वाढलेले कैदी. ते घाबरून आणि बावरून एका बाजूला जाऊन बसलेले.
{{gap}}"पक्या माझ्या अंगाला तर हे सारे पाहूनच खाज सुटलीय."अशक्या तोंडातल्या तोंडात कुणकुणला. ती रात्र युगासारखी दीर्घ. लघुशंकेसाठी ठेवलेला पत्र्याचा डबा. तो बाहेर नेऊन दरवेळी रिकामा करणारे ते कैदी. गप्पांनाही नशा चढत नव्हती. श्रीनाथच्या मनात कोळीष्टकांचे काहूर. काही तासात आम्ही हादरलो. मग स्वातंत्र्य लढ्यातील तरूणांनी आणि सक्तमजुरी भोगणाऱ्या कैद्यांनीही कसे सोसले असेल. डोळ्यात रात्र जागी होती. पण प्रत्येक जण शेवटी तिला शरण गेला. सकाळची उन्ह बोचू लागली. अमन हरून सैयंदला हिटलरच्या कॉन्सेट्रेशन कॅप्समध्ये आपण आहोत असे वाटले. त्या भयानक दुर्गंधीने तो घामेजून जागा झाला. संघाचे दादाराव मात्र सर्वांना उत्साह देत होते.
{{gap}}"सावकरांचा तुरुंगवास आठवा आणि पुढच्या संघर्षासाठी सज्ज व्हा तरूणांनो, सज्ज व्हा. या राष्ट्रासाठी क्रांतीवीर भगतसिंग, राजगुरु..." दादाराव अहिरवाडाकरांच वाक्य तोडीत, त्याच घनगंभीर आवाजात अशोकने टेप सुरु केला....
{{gap}}"पंडित जवाहरलाजी, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांना सहा सहा तास बर्फाच्या लादीवर बसवून ठेवले. लहानग्या शिरिषकुमारला गोळ्या घालून पाणी मागणाऱ्या शिरीषला म्हणून रॉकेल प्यायला दिले. पण राष्ट्रातल्या सामान्य माणसाला..."
{{gap}}"अशोकजी तुम्ही माझी चेष्टा करण्याच्या हेतूने बोलत असाल तर..."
{{gap}}"नाही...नाही... दादाराव. बेचाळीसच्या चळवळीचा फक्त आढावा घेतला हो... दादाराव शेवटी आम्ही भारतीयच." अशोक काहीशा खवचट आदबीने म्हणाला. एवढ्यात पी.एस.आय.चाटे आले आणि त्यांनी तुरुंगाचे कुलूप काढून सर्वाना बाहेर काढले. समोरच्या कार्यालयात येण्यास सांगितले.

{{gap}}"अने, पाणी कडकडीत गरम कर. मी बाहेरच थांबलोय, माझ्या अंगावर किती लिखा नि किती उवा असतील ते त्याच जाणे. शिवाय गोचिडा वेगळ्या. गॅसवर दोन्ही<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ५६ }}</noinclude> 0lnazs2h86iwiqjp25cukt59iqh98op पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५७ 104 70879 155648 2022-08-10T07:06:32Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>बाजूला पाणी ठेव. आणि मी पलिकडच्या अरूंद गॅलरीतून मागच्या न्हाणीत जाऊन बसतो. एक लाईफबॉय टाक आणि लायसिल नसेल तर पलिकडच्या दुकानातून जनकला आणायला सांग." श्रीनाथने दरवाजा खटखटावून अनूला बाहेर बोलावून विनंतीवजा आदेश दिला आणि तो न्हाणीकडे गेला. दुपारचे दोन वाजून गेले होते. एक रात्र एका युगासारखी.
{{gap}}श्रीनाथला आलेला पाहून अनूने सुखचा श्वास घेतला आणि गॅसवर गरम पाण्यासाठी पातेली चढवून तांदळाची बरणी खाली काढली.
{{gap}}२६ जून पासून हवाच बदलली होती. खरं तर हे दिवस पावसाचे. १९७० ते ७२ सतत तीन वर्षे पावसाने तोंड दाखवले नाही. ७३,७४ चा जूनही मनसोक्त आणि धरतीला आतपर्यंत ओलवून टाकणाऱ्या पावसाशिवायच गेला आणि या वर्षी जरा बरसतोय तोच हे नवे संकट. आणीबाणीचे. श्रीनाथ अंतर्बाह्य अस्वस्थ आहे. आणीबाणी यापूर्वीही दोनवेळा घोषित करण्यात आली होती. १९६२ च्या चिनी आक्रमणाचे वेळी आणि १९७१ च्या बांगलादेश मुक्ती संग्रामाचे वेळी. पण त्या दोनही वेळी बाह्य आणीबाणी घोषीत करण्यात आली होती. परंतु २५ जूनच्या रात्री पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुचनेनुसार राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी "अंतर्गत उपद्रवामुळे भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याने आपण आणीबाणी लागू करीत आहोत." असे नमूद केले आहे. चार ओळींच्या त्या वटहुकूमाने कोणाही भारतीयाला विना वॉरंट अटक करण्याचा, नागरी हक्क व स्वातंत्र्य स्थगित करण्याचा अधिकार भारत सरकारला मिळाला. म्हणजे इंदिराबाईना...पंतप्रधान इंदिराजींना मिळाला.
{{gap}}"अने, तुला २६ जूनचे इंदिराजींचे भाषण आठवते? ते ऐकतानाच तू म्हणाली होतीस बाईच्या आवाजात किती दूरस्थ थंडपणा आहे. मी तुझं म्हणणं चेष्टेवारी नेलं होतं पण हवेतील संवेदनशीलता.. आर्द्रताच हरवली आहे. जो तो संशयाने पाहणारा. बोलू की नको असं घोकत ओठ बांधून बसलेला. आम्ही आज सुटलो तरी उद्याचा भरवसा नाही. तेव्हा मनाची तयारी करून ठेव. आता लढा पुन्हा एकदा दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी द्यायचाय. आणि सर्वांनी एकत्र येऊन.
{{gap}}... १२ जूनला इंदिराजीविरूध्द निकाल लागला. त्यांची निवडणूक रद्द ठरवली गेली. खरं तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. पण ते तसं घडलं नाही तेव्हाच लोकशाही, स्वातंत्र्य, समता या तत्वांची मृत्युघंटा वाजली. अने मी सतत बाहेर<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ५७ }}</noinclude> opba34sf8q39w82uin6erli7nbtud9l पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५८ 104 70880 155649 2022-08-10T07:13:51Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>असेन. खेड्यातून फिरायचे ठरवलेय आम्ही. तू निर्भयपणे रहा. वाटल्यास जनक, इराला आईबाबांकडे पाठवलेस तरी चालेल. पण मग तू फार एकटी पडशील...."
{{gap}}एक मुकी शांतता.

{{gap}}"अनू, आज खूप अस्वस्थ आहे मी. वाटतंय तुझ्यावर नि मुलांवर मी अन्याय करत नाही ना? सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष हे आपलं दोघांचं स्वप्न होतं आणि आहे. पण ते स्वतंत्र भारतातलं स्वप्न होतं पण आज वाटतंय दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार. अनूऽऽऽ.."
{{gap}}बोलतानाही त्याचा स्वर रूद्ध झाला.
{{gap}}'श्री माझी नको काळजी करूस. मी नोकरी करतेय. ही फार मोठी जमेची बाजू तुझ्या माझ्या पोतडीत आहे. फक्त एकच. घराबाहेर पडतांना दशम्याचटणीची शिदोरी तुझ्या पोतडीत ठेवायची, ओके?'..... श्रीनाथच्या कुशीत शिरत अनू गुणगुणली.
..........{{gap}}{{gap}}............{{gap}}{{gap}}.....
{{gap}}दुसऱ्या दिवसापासून आण्ण्या, प्रकाश, अशोक, डॉक्टर असे अनेक कार्यकर्ते खेड्यापाड्यातून हिंडू लागले. आणीबाणीचा पट्टा आवळत जाणारा. रोजन् रोज कानगोष्टी सारखी कुजबूज कानावर येई. मधु दंडवते, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजीभाईंना अटक झाल्याचे कानोकानी इथवर पोचले. वर्तमान पत्रातल्या बातम्यांचा तर प्राणच हरवला होता. नुसती शब्दांची भेंडोळी. एक जुलैला भारताच्या एकानुवर्ती शासन करणाऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधीनी २० कलमी कार्यक्रम जाहिर केला. रेडिओवर 'मां तेरे बीसों सपने साकार करेंगे हम' सारखी गाणी सतत येऊ लागली. श्रीनाथ, डॉक्टर साहेब, आण्ण्या, बाप्पा देशमुख, अशक्या यांसारखी मंडळी खेड्यापाड्यातून आणीबाणी म्हणजे काय हे सांगत फिरू लागली. उषा, लल्ली, सुशा, सारख्या मुलीही त्यात सामील झाल्या. व्यापारी क्षेत्रातली काही मुलं दूर गेली. 'माझ्या बाबूजींच्या दुकानात आज रात्री सिमेंटची गाडी उतरणार आहे.' असं गुपचूप येऊन सांगणारा, रोज श्रीभैय्या भोवती असणारा जुगल गेल्या आठ दिवसात श्रीनाथ व पक्याकडे फिरकलाही नाही. सायकल मारण्यात पटाईत असलेला शेख्या दिसेनासा झाला. प्रत्येक दिवस खूप उंच न मावळणारा. तरीही अंधारलेला.
{{gap}}त्या दिवशी रात्री एक वाजून गेला तरी श्री परतला नव्हता. डोळे चुरचुरायला लागले होते. दीडचा टोल शेजारच्या शाळेतील जागल्याने दिला. अनूला कधी झोप<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ५८ }}</noinclude> gddvlqtu9tuo60ci5n4zh2ulk2q4hjd पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५९ 104 70881 155650 2022-08-10T07:18:10Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>लागली ते कळले नाही. श्री घरी आला तेंव्हा दोन वाजून गेले होते. बरोबर डॉक्टर आणि अण्ण्या होते. अण्ण्या, डॉक्टर आतल्या खोलीत झोपले आणि श्रीनाथ बैठकीत कॉटवर लवंडला. जून संपला, दमदमादम पाऊस पडला तरी उकाडा होता. अनूने पंख्याखाली चटई टाकली आणि बाहेरच्या खोलित ती आडवी झाली.
{{gap}}पहाटेचा गार वारा खिडकीतून आत येत होता. सोबत पावसाचा ओला गंध घेवून. त्या मृदगंधा सोबत थेट वरच्या मणक्यावर पोचलेल्या सायलीचा काहींसा मत्त मधुर गंध. अनूच्या गाढ झोपेत फक्त तो गंधच झुळझुळत होता.
{{gap}}दारावरची बेल वाजली. एकदा. दोनदा. तिसऱ्यांदा कानांना भेदून टाकणारी किरकिर्र घंटा. अनूने उठून श्रीनाथला जागे केले. त्याला आत पाठवले. इथवर सारे ठरवल्यासारखे. आणि तिने दिवा लावून दरवाजा उघडला. डी.वाय.एस.पी.चव्हाण समोर उभे होते.
{{gap}}"वैनी, श्रीभैय्यांना न्यायला आलो आहोत, असे बैठकिच्या खोलीत येत ते बोलले. "अहो, श्रीनाथ मुळी...." असे म्हणणाऱ्या अनूला अडवित खाली घडी घालून ठेवलेल्या चटईकडे पाहत ते म्हणाले वैनी श्रीभैय्या दीड एक तासापूर्वी आले आहेत. ते घरात आहेत. आताच आम्ही बालकमंदिरातून आलो. तिथे अमन, ग्यानेश होते त्यांच्यावरही वॉरंट आहे. आप्पा, फणसे, विनोद, धर्माधिकारी, प्राध्यापक देशपांडे, प्रा.देशकर, बप्पा देशमुख, सुधीर, बन्सीधर, क्षिरसागर यांच्यावरही वॉरंट आहे. सगळ्यांना घेऊन आमची व्हॅन नऊ वाजता इथून बीडला या मंडळीसह जाणार आहे." एका दमात श्री. चव्हाण बोलले. खूर्चीवरून उठत काहीसे विशादाने हसत अनुला म्हणाले, "श्रीभैय्यांना जे काही आवडतेय ते ताजे करून खाऊ घाला आणि निरोप द्या."
{{gap}}चार पावलं पुढे गेलेले पोलिस अधिकारी दोन पावलं माघारी आले आणि मऊ स्वरात म्हणाले,
{{gap}}"वैनी आम्हीही माणसं आहोत. तुम्ही काळजी करू नका. श्रीभैय्यांना घ्यायला मी सर्वात शेवटी इथे येतो तयार रहा."
{{gap}}एवढ्यात श्रीनाथने डॉक्टरला न्हाणीत लपवले होते. आण्ण्या कॉटच्या मागे निवान्त भिंतीला टेकून बसला होता.
{{gap}}अनू डोळ्यातल्या धारा पुसत कांदा कापत होती. श्रीनाथला खमंग कांदा पोहे खूप आवडतात. आणि भरपूर तूप घालून केलेला कणकेचा शिरा.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ५९ }}</noinclude> 76k2mmnm6ch3zk9o746872xwzjvct6b पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/६० 104 70882 155651 2022-08-10T07:18:52Z अश्विनीलेले 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ "अने, पोह्यात थोडे शेंगदाणे नि डाळवं टाक बरका आणि शिरा पिठाचा कर. तूप घालताना हात आखडू नकोस. बामणी शिरा नको.” श्रीनाथ न्हाणीतून सूचना देत डोक्यावरून पाणी ओतत होता. डॉक्टरही..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="अश्विनीलेले" /></noinclude>________________ "अने, पोह्यात थोडे शेंगदाणे नि डाळवं टाक बरका आणि शिरा पिठाचा कर. तूप घालताना हात आखडू नकोस. बामणी शिरा नको.” श्रीनाथ न्हाणीतून सूचना देत डोक्यावरून पाणी ओतत होता. डॉक्टरही खूप अस्वस्थ. आण्ण्याला तर त्या कोपऱ्यात सुरक्षित वाटत असावे. बसल्या बसल्या साहेब घोरत होते. एवढ्यात श्रीनाथच्या गटात आजवर कधीही न आलेला, खालमान्या म्हणून सगळी गँग ज्याची टर उडवीत असे तो जाड चष्मेवाला गंगणे दबकत आत आला. "मॅडम, मी गंगणे. मी काही मदत करू शकतो का? मी खालमान्या आहे. जे होतंय ते बरं नाही हे मलाही कळतंय. प्लीज." अनू काही बोलण्याआधी श्रीनाथने त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटले, "तू खूप अबोल आहेस दोस्त. पण तू आमच्या आणण्या, पक्याचाच दोस्त आहेस. गड्या एक काम तूच करू शकशील." लगेच डॉक्टर कडे वळून श्रीनाथने सांगितले. "आज पावसाचा अंदाज नाही. डॉक्टर, तुमची खादीची पँट नि शर्ट काढा. हे काकाजींचं धोतर आहे माझ्यापाशी. नि हा मळका सदरा. डोक्याला पंचा बांधा आणि मधल्या रस्त्याने पांदीतून गंगणे तुम्हाला थेट धानुऱ्याला सोडून येईल. जमल का गंगणे? समजा गडबड झाली तर मग तुलाही उद्या बीडला यावं लागेल. आहे तय्यारी दोस्त?" ___ "श्रीभैय्या काळजी नको. मी ठिकठाक काम करून टाकीन." गंगणेने आश्वासन दिले. __ "ऐच्यू पोलिश बाबाला त्यांच्या गालीतून कुते नेताहेत गं? आई, पोलिश चोलांनाच पकलतात ना?" इरा अनूला विचारीत होती. _ "इरे, बोबडाबाई चुप बस. त्या इंदिरा बाईनं आपल्या बाबालाच नाही तर, खूप जणांच्या बाबांना पकडून नेलंय. ते काही चोर आहेत म्हणून नाही. ती डाकीण आहे डाकीण. माणसं पकडणारी....." जनक गंभीर आवाजात तिला दापत होता. श्रीनाथला पकडून नेण्यापेक्षाही जनकला अवघ्या आठव्या वर्षी आलेलं शहाणपण अनुभवून अनू क्षणभर हादरून गेली. एक न दिसणारं ओझं तिच्याही डोक्यावर कोणीतरी टाकलंय असं तिला जाणवलं. पोलिस व्हॅन केव्हाच निघून गेली होती. दोन्ही पिल्लांना घेऊन ती जिना चढून वर आली. "अनू आधी इकडे ये. मी आलं घालून चहा केलाय तो पी आणि मग कॉलेजात जा मुलांकडे बघते मी. नंदा मावशी येतीलच कामाला." सुधा वहिनीनी तिला घरात बोलावले. शोध अकराव्या दिशेचा / ६०<noinclude></noinclude> 8zeym86xonmqlmn4e2f24tfkyp043kl