विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४७ 104 66812 155461 131007 2022-08-03T06:30:38Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२४२ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम {{rule}} घडून येण्यासारखी नाही; पण तसे कधी काळी होणार असलेच तर असा सार्वलौकिक धर्म होण्याची योग्यता फक्त आपल्याच धर्माच्या अंगी आहे. त्यावांचून दुसरा कोणताहि धर्म सर्व जगाचा धर्म होणे शक्य नाही; आणि याचे कारणहि अगदी उघड आहे. आपल्या धर्मावांचून जगांतील दुसरा कोणताहि धर्म कोणा ना कोणा व्यक्तीपासून निर्माण झाला आहे. त्याचे जीवित कोणा ना कोणा व्यक्तीवर अवलंबून आहे. त्याच्या रचनेत एखादी ऐतिहासिक समजली जाणारी व्यक्ति मध्यवर्ती असून तिच्याच भोंवतीं त्या धर्माच्या साऱ्या इमारतीची उभारणी झाली आहे. असा एकच मध्यबिंदु असणे ही गोष्ट त्या धर्माच्या अस्तित्वाला विशेष बळकटी आणते असे त्यांना वाटतें; पण वास्तविक या गोष्टीने बळकटी येत नसून तो धर्म परावलंबी आणि दुबळा बनतो. ज्या मध्यवर्ती पुरुषाच्या भोंवतीं हे सारे जाळे विण लेले असते त्याचे अस्तित्वच नव्हते असे कोणी सिद्ध केले की, या साऱ्या धर्माचीहि इतिश्री झालीच; आणि असा प्रकार आजच घडूहि लागला आहे. अशा धर्मप्रवर्तकांपैकी निम्याशिम्यांची वाट आजच लागली असून बाकी चेहि हळूहळू तोच मार्ग आक्रमीत आहेत. यामुळे ज्या धर्मतत्त्वांना केवळ त्यांच्याच शब्दाचा पाठिंबा होता, ती तत्त्वेंहि हवेत उडून जाऊ लागली आहेत. आमच्या धर्माची गोष्ट अशी नाही. आमची धर्मतत्त्वें सनातन आ हेत. त्यांचे अस्तित्व कोणाहि एका व्यक्तीच्या शब्दावर अवलंबून नाही; ती स्वयंभू आहेत. आमच्यांतहि अवतारी पुरुष शेकडों होऊन गेले, तथापि त्यांपैकी कोणीहि आपला स्वतंत्र असा धर्म उभारला नाही. त्या सान्यांनी एकाच सनातन धर्माची तत्त्वे वेगवेगळ्या रीतींनी विशद केली. कृष्ण हा कृष्ण म्हणून मोठा नव्हे; अथवा तो विशिष्ट धर्माचा प्रवर्तक म्हणूनहि चिर स्मरणीय नव्हे. वेदांतधर्माचे स्पष्टीकरण अत्यंत उज्ज्वल रीतीने त्याने केलें म्हणून तो मोठा. हे कार्य कृष्णाने केले नसते तर बुद्धाप्रमाणेच तोहि काळाच्या पोटांत गडप झाला असता. बुद्ध हा काही कमी मोठा होता असें नाही. तथापि जें कार्य कृष्णाने केलें तें त्याने न केल्यामुळे हिंदुस्थानांत आज त्याचें नांवहि उरले नाही. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते ती ही की, कोणी कितीहि मोठा झाला तरी त्याला भुलून त्याच्यामागे आम्ही जात नाही. आम्ही व्यक्तींचे उपासक नसून तत्त्वांचे उपासक आहो. ज्याच्या ठिकाणी<noinclude></noinclude> 7wmvi5kjikhedxtnk9fnv1d2x0628jm पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४८ 104 66813 155459 131008 2022-08-03T06:24:33Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.]आपणांपुढील कार्य.२४३ {{rule}} आमची ही तत्त्वे प्रत्यक्षत्वास येतील तो आम्हांस पूज्य; आणि तो मोठा म्हणून पूज्य नव्हे, तर आमची तत्त्वे आम्हांस तेथे दिसतात म्हणून तो पूज्य. ही तत्त्वे तेथे दिसू लागतांच कोट्यवधि हिंदू लोक तेथे धावत येतात. आमची ही तत्त्वे सुरक्षित आहेत तोवर एकच काय पण हजारों बुद्ध जन्मास येतील. पण ही तत्त्वे नष्ट झाली आणि त्यांची विस्मृति आम्हांस पडली, तर मात्र आमच्या धर्माची काय वाट लागेल हे सांगता येत नाही. तत्त्वांना सोडून ऐतिहासिक व्यक्तींच्या झेंड्याभोवती आम्ही गोळा होऊ लागलों, की आमचा धर्महि आम्हांस सोडून जाण्याच्या पंथास लागेल. कोण त्याहि व्यक्तीला इतकें प्राधान्य न देणारा धर्म जगांत एखादा असेल तर तो आमचाच धर्म होय; पण असे असतांहि आम्ही सारे अवतारी पुरुष अगदी बाद केले आहेत असेंहि नाही. अशा शेंकडों पुरुषांना आमच्या धर्मात अवकाश आहे. आजपर्यंत असे शेंकडों पुरुष होऊन गेले आणि उद्या दुसरे शेकडों येणार असले तर त्यांनाहि आम्हांपाशी स्थळ आहे. मुद्दा इतकाच की, त्यांच्या द्वारे आमची तत्त्वे आम्हांस दिसली पाहिजेत. कोणत्या तरी उच्च तत्त्वांचे स्पष्टीकरण त्यांच्या द्वारे झाले पाहिजे इतकीच आमची अट आहे. आमच्या धर्माचा हा विशेष आपण लक्षात ठेविला पाहिजे. आजपर्यंत जशी ही तत्त्वे सुरक्षित राहिली तशीच ती पुढेहि ठेव ण्याच जबाबदारी आपणांपैकी प्रत्येकाच्या शिरावर आहे. त्याचप्रमाणे कालांतराने त्यांजवर वाढणारी बांडगुळे छाटून टाकून मूळचे उज्ज्वल रूप कायम राखणे, हेहि आपणा प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भरतभूमीवर आजपर्यंत अनेक घोरपडी आल्या, हिंदुकुलाची भयंकर अवनति झाली, तथापि तशा स्थितींतहि वेदांत तत्त्वे मलिन झाली नाहीत हें आश्चर्य नव्हे काय? त्यांना मलिन करण्याची छातीच कोणास झाली नाही. श्रुतिग्रंथांइतकें अबाधित राहिलेलें धार्मिक वाड्मय जगाच्या इतिहासांत एकहि नाही. जगांतील बाकीच्या वाङ्मयाशी तुलना करून पाहतां श्रतिग्रंथ अगदी सोवळे राहिले आहेत असें आपणांस दिसून येईल. त्यांत कोणी क्षेपक भाग घुसडला नाही; मूळ संहि तेची ओढाताण अथवा छाटाछाट कोणी केली नाही आणि त्यांतील विचा रांचे मर्महि आजतागाईत पूर्वीसारखेंच राहिले आहे. उत्पत्तिकाली श्रति ग्रंथांनी जें मार्गदर्शकाचे कार्य केलें तेंच कार्य ते आजहि करीत आहेत.{{nop}}<noinclude></noinclude> 353elqpnof8n8yoydqjwrkdgdm3h2hj पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४९ 104 66814 155463 131009 2022-08-03T06:37:47Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२४४ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[ नवमः {{rule}} या मूळ संहितेवर निरनिराळ्या टीकाकारांनी आपापल्यापरी अनेक प्रकारच्या टीका केल्या आहेत, हे तुम्हांस ठाऊक आहेच. अवतारी पुरुषांनी याच तत्त्वांचे प्रत्यक्ष विशदीकरण केले. या अनेक प्रकारच्या स्पष्टीकरणांस अनुसरून अनेक पंथहि अस्तित्वात आले. या श्रतिग्रंथांतील कित्येक सिद्धां तांत आपणांस विरोधहि आढळून येतो. यांतील कांहीं ग्रंथ शुद्ध द्वैतपर असून दुसरे कांहीं शुद्ध अद्वैतपर आहेत. एखादा टीकाकार द्वैतवादी असला म्हणजे अद्वैतपर मते खोडून काढणे हे आपले कर्तव्य आहे असे त्याला वाटते. त्याच्या बुद्धीचा पल्ला द्वैतापलीकडे गेलेला नसतो; यामुळे अद्वैतपर वचनेंहि द्वैतपर लावण्याचा यत्न तो करितो; आणि अशाच रीतीने अद्वैत वादीहि त्याला प्रत्युत्तर देत असतात. अशा रीतीने दोन तट पडून त्यांत युद्ध सुरू होतात. पण हा कांहीं वेदग्रंथांचा अपराध नव्हे. सारे श्रुतिग्रंथा शुद्ध द्वैतपर आहेत असे सिद्ध करूं पाहणे जितकें मूर्खपणाचे आहे, तितकेंच ते अद्वैतपर मानणे चुकीचे आहे. ते द्वैतपर आहेत आणि अद्वैतपरही आ हेत. अर्वाचीन काळी नव्या कल्पनांचा उदय होऊन त्यांच्या दृष्टीने श्रुति ग्रंथांच्या रहस्याचा उलगडा करणे सुकर झाले आहे. मानवी मनाची स्थिति पाहतां या दोन्ही मतांचे अस्तित्व अवश्य आहे असे आपणांस आढळून येईल. या दोहोंच्या अस्तित्वावांचून त्याची उत्क्रांति सुलभपणे घडून येणार नाही; आणि याकरितांच वेदग्रंथांनी या दोहोंचेंहि विवरण केले आहे, अखेरची मजल सुखरूपतेनें गांठता यावी म्हणून श्रुतिमातेने या मार्गाला क्रमशः चढत्या अशा पायांची योजना केली आहे, हे तिचे मोठे उपकार होत. परस्परविरोधी वचने योजून तट उपस्थित करावे आणि अशा रीतीने भावी युद्धाचे बीजारोपण करावे असा श्रुतींचा हेतु नाही. आपल्या मुलांना अशा रीतीने भुलवून भलत्याच मार्गाला नेण्याचे कार्य श्रुतींनी केलेले नाही. आपल्या लहानग्या लेकरांकरितांच नव्हे तर काही तरुणांकरितांहि या पाय -यांची योजना श्रुतींनी केली आहे. लहान मुलांना तर त्यांची आवश्यकता आहेच, पण पुष्कळशा मोठ्या माणसांनाहि त्यांची गरज आहे. आम्हाला देह आहे आणि देह हाच मी अशी आमची भावना आहे तोपर्यंत व्यक्तिविशिष्ट परमेश्वराचीहि जरूर आम्हांला आहे. आम्हाला पांच इंद्रिये आहेत आणि त्यांच्या द्वारे आम्हांहून वेगळ्या अशा बाह्यजगाचा अनुभव आह्मांस होतो<noinclude></noinclude> ghbdo5tq3fzsvlx3zoj2s6grstgaggu पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५० 104 66815 155466 131010 2022-08-03T06:43:42Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.] आपणापुढील कार्य. २४५ {{rule}} अशी आमची समजूत आहे, तोवर व्यक्तिविशिष्ट परमेश्वरावांचून आह्मांस तरणोपाय नाही. या साऱ्या कल्पना आमच्या चित्तांत शिल्लक आहेत तोपर्यंत आत्मा, परमात्मा आणि बाह्य सृष्टि असें तीन स्वरूपांचे अस्तित्व कबूल कर ण्यावांचून आपणांस गत्यंतर नाही, हे श्रीरामानुजांनी उत्तम प्रकारे सिद्ध केले आहे. याकरितां बाह्य जग जोपर्यंत वेगळेपणाने भासत आहे, तोपर्यंत आत्मा आणि परमात्मा एकरूप आहेत असे म्हणणे ही पोकळ बडबड आहे. यांचें द्वैत प्रत्यक्ष भासत असतां तोंडाने एकरूपतेच्या गोष्टी सांगणे हा शुद्ध वेडेपणा नव्हे काय ? सामान्य मानवी मनाची घटनाच अशा प्रकारची आहे की, एकंदर अस्तित्वरूपाचा प्रत्यय त्याला वेगवेगळ्या स्वरूपांनीच व्हावा. आतां जे महापुरुष मनातीत स्थितीला जातात ते अर्थात् सृष्टिपलीकडेहि उड्डाण करितात. 'यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह' अशा शून्याव स्थेपलीकडेहि त्यांची मजल गेलेली असते. या ठिकाणी जीवात्म्याच्या सर्व बंधनांचा उच्छेद झालेला असतो आणि केवळ याच स्थितीत 'सोहम्' 'सर्व खल्विदं ब्रह्म' या वचनांचा अनुभव त्याला होतो. हा अनुभव होण्यास ज्ञान, विज्ञान आणि भक्ति या तिन्ही मार्गाचा उपयोग होतो. कृष्ण मध्येच अदृश्य झाला तेव्हां त्याच्या नांवाने टाहो फोडून गोपी आक्रंदन करूं लागल्या. 'कृष्ण, कृष्ण' यावांचून दुसरा उच्चार त्यांच्या तोंडाने होईना. सर्वत्र कृष्ण रूप त्यांना दिसू लागले. अखेरीस आपणहि कृष्णच आहों अशी भावना होऊन कृष्णाप्रमाणेच त्यांनी वस्त्रे परिधान केली आणि कृष्णाप्रमाणेच त्या क्रीडा करूं लागल्या. त्या कृष्णरूप बनून गेल्या. भागवतांत हे वर्णन केलेले आहे. यांत शुद्ध भक्तीने अद्वैतापर्यंत कसे जाता येते हे उत्तम प्रकारें दाखविले आहे. अशाच प्रकारची एक हकीकत सुफी मताच्या एका कवीनें फारसी भाषेत सांगितली आहे.
{{gap}}आपल्या उद्दिष्टाकडे पोचण्याचे मार्ग अनेक आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांत पायऱ्याहि अनेक आहेत. याकरितां, त्यांजसंबंधी युद्धे करण्याचे कांहींच प्रयोजन आम्हांस नाही. आतां पुराणकालींच्या निरनिराळ्या टीका कारांनी आपापल्या दृष्टीने वेगवेगळी मतें प्रकट केली असली तरी त्या साऱ्यांसच आपण नमन करूं या. कारण, ज्ञान ही मर्यादित चीज नाही. त्याचप्रमाणे तिचा सर्व सांठा कोणा एकापाशींच आहे असेंहि नाही. तिच्या<noinclude></noinclude> pssjfaw2q4fmdov63woxets9kwoiwvn पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५१ 104 66816 155469 131011 2022-08-03T06:54:46Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude> २४६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवमः {{rule}} प्रकटीकरणाचे मार्ग अनेक असून स्वरूपहि भिन्नभिन्न असू शकतात. याक रितां अर्वाचीन अथवा प्राचीन पंडितांपैकी कोणा एकाचीच बाजू धरण्याचे आपणांस कारण नाही. प्राचीनकाळी ज्याप्रमाणे अनेक मंत्रद्रष्टे आणि ऋषि होऊन गेले, त्याचप्रमाणे ते चालू काळी असून पुढेही ते निर्माण होणार आहेत याविषयी शंका बाळगू नका. फार काय, पण प्राचीनकाळी ज्याप्रमाणे व्यास, वाल्मीक आणि शंकराचार्य होऊन गेले, त्याचप्रमाणे त्यांची योग्यता स्वतःच्या अंगी तुम्हांसहि आणता येईल. तुम्हीं शंकराचार्य होऊ नये असे कोणतेंहि कारण अस्तित्वात नाही.
{{gap}}आमच्या धर्माचा हाहि एक विशेष आहे. आपलें ज्ञान ईश्वरदत्त होते असें इतर धर्माचे प्रवर्तक म्हणत, यामुळे त्यांच्या मतांना जो अधिकार प्राप्त झाला तो खुद्द ईश्वरापासून आलेला आहे, असे त्याचे सर्व अनुयायी म्हणत आले आहेत. ईश्वराशी इतकें साहचर्य फारच थोड्यांच्या नशिबी असणार हे उघड आहेआणि फक्त त्यांच्याच मार्फत आपणांसारख्या सामान्य जनांची गांठ ज्ञानाशी पडणार असें दुसरे धर्मानुयायी म्हणतात. यामुळे आद्य धर्म प्रवर्तकाने जें कांही सांगितले असेल त्याचे ग्रहण डोळे मिटून आपण केलें पाहिजे असा इतर धर्माचा हट्ट आहे. नॅझारेथच्या येशूला अशाच ज्ञानाची प्राप्ति झाली होती आणि याकरितां आपण सर्वांनी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानली पाहिजे असा ख्रिस्तानुयायांचा हट्ट असतो. पण आमच्या धर्माची गोष्ट तशी नाही. हे ज्ञान कोणा एखाद्यालाच प्राप्त होण्यासारखे आहे, असे आम्ही कधीच म्हटले नाही. पूर्वकाळच्या मंत्रद्रष्टयांना ते जसें प्राप्त झाले, तसेंच तें भविष्यकालच्या मंत्रदृष्टयांनाही प्राप्त होईल. आतां इतकें मात्र खरें की, वाक्पंडितांना, पुस्तकी विद्वानांना अथवा प्राचीनभाषाकोविदांना तें प्राप्त होणार नाही. त्यासाठी द्रष्टेपणच अंगी आले पाहिजे. सूक्ष्मविचार प्रत्यक्ष पाहण्याचे सामर्थ्य ज्याच्या अंगी असेल, त्याला तें अवश्य प्राप्त होईल. मोठ मोठे वादविवाद दीर्घकाळपर्यंत करीत बसलात तरी त्यामुळे आत्मानुभव तुम्हांस होणार नाही, तुमची बुद्धि कितीहि विशाल झाली तरी आत्म्याचे आकलन ती करूं शकत नाहीं; आणि सारे श्रुतिग्रंथ तुम्हीं मुखोद्गत केले तरी त्यानेंहि या ज्ञानाची प्राप्ति तुम्हांस होणार नाही. खुद्द श्रुतींचेही असेंच वचन आहे. अशा अर्थाचे वचन जगांतील दुसऱ्या कोणत्याही धर्मग्रंथांत<noinclude></noinclude> o06gg30brasdhvyfk42dqol63x10sts पान:कविता गजाआडच्या.pdf/४१ 104 70757 155445 2022-08-03T05:12:51Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{x-larger|'''तू नि मी...'''}}

तू अस्वस्थ
भळभळती जखम
सोसणाऱ्या
अश्वत्थाम्यासारखा!
अरे,
अवघा एक बिंदू निखळला
तर
तू एवढा खिळखिळा ?
अस्तित्वाचे रंग हरवलेल्या
आभाळा सारखा !!!
एक
बंदा रूपया
एक पै उणावली तर
निष्पर्ण
आणि
एकाकी?

मी तर प्रत्येकक्षणी
एकेक बिंदू हरवत
जगत्येय..
किती म्हणून मोजू
हरवलेले हुंदके ?
पण
आम्ही स्वतःला
हरवतच जगायचं असतं
<noinclude>कविता गजाआडच्या /४२</noinclude> rs6se8uwq7navc99x71p3d5pdxfz91l पान:कविता गजाआडच्या.pdf/४२ 104 70758 155446 2022-08-03T05:15:34Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>हा धडा
हजारो वर्षांपासून
आईच्या गर्भातच
शिकलोय

हाती उरलेले भूतकाळातले
बसंती क्षण
उराशी कवटाळित
उद्याचे
सस्मित स्वागत करण्याची
सस्टेनेबल 'उर्जा'
तुला
'सी यू अगेन' म्हणण्याची
निर्भयता
नक्कीच देईल मला !!

<noinclude>कविता गजाआडच्या /४३</noinclude> k247nsgqfec6qxy8f82phh3q573063r पान:कविता गजाआडच्या.pdf/४३ 104 70759 155447 2022-08-03T05:19:02Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{xx-larger|'''कोण दे आमंत्रण'''}}

<poem>त्या स्वरांच्या जीवघेण्या लक्ष हाका वेढिती दूर पुरल्या चांदण्या रक्तातुनी वेल्हाळती आत्मरंगी रंगल्या रानी अचानक वादळे उतरत्या पाण्यातुनी वणवे फुलांचे पेटले दिवसकलुनी सांजधारा दाटल्या माथ्यावरी परतिच्या वाटेवरी का मातवीसी वैखरी ? दूरच्या दूरात झुलते सायलीची वेलण वठुनी गेलेल्या ऋतूंना कोण दे आमंत्रण सोलुनी सुख राजवर्खी आतले विष प्राशिले आज का वळणावरी आयुष्य अवघे पेटले ●</poem><noinclude>कविता गजाआडच्या /४४</noinclude> 920jpasz9fro280mrrvj7jdxadbzgwf पान:कविता गजाआडच्या.pdf/४४ 104 70760 155448 2022-08-03T05:26:02Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{x-larger|'''आज...'''}}

{| |+ |- | विस्तवातही होती
विस्तवात आज फक्त || {{gap}}रूणझुणती धारा
{{gap}}राख अन् निखारा... |- | || |- | श्वासांतुन शिरीषगंध
पोखरले शब्द आज || {{gap}}थिरकते बहार
{{gap}}श्वासांना भार... |- | || |- | तेव्हाचे दिवस कसे
उतरत्या उन्हांचाही || {{gap}}सावनी उन्हाचे
{{gap}}आज डंख जाचे |- | || |- | स्वप्नांची चळत उभी
ओंजळीत आज फक्त || {{gap}}रस्त्यावर होती
{{gap}}रखरखती माती... |- | ● || |}<noinclude>कविता गजाआडच्या /४५</noinclude> lbgu2xtdbw91521kerk9ouxja3rqgi6 पान:कविता गजाआडच्या.pdf/४५ 104 70761 155449 2022-08-03T05:31:37Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{x-larger|'''सुन्न'''}}

<poem>सुन्न कोनफळी आभाळ आतल्या आत सळाळणारं कोसळण्याचा उन्मेषही हरवून गेलेलं...! अशा आभाळाकडे पाहून, बहरणारी झाडंही कुचकं हसून पानं ढाळतात नव्या पालवीचे चाळ झुमकावीत... .... तेव्हा , अगदी दूरात उभं असलेलं निष्पर्ण वठलेलं झाड मात्र, गालात हळूच हसतं आज नाहीतर उद्या... कोसळणं हा तर धर्म आहे आभाळाचा पण वठण्याचा सुन्न किनारा फक्त झाडांसाठीच! ● </poem><noinclude>कविता गजाआडच्या /४६</noinclude> rvbxe72w4q5kdi2r7h9j35he6f8ygij पान:कविता गजाआडच्या.pdf/४६ 104 70762 155450 2022-08-03T05:42:37Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{x-larger|'''काळ येथे रुंधला'''}}

{| |+ |- | मुक्त- नग्ना होऊनी मी
बीज पेरून तू निराळा || {{gap}}प्राशिली उर्जा तुझी
{{gap}}दशदिशांना पांगला.. |- | || |- | अंकुरांच्या स्पंदनांने
बांधुनी माझ्या दिशा || {{gap}}श्वास गर्भी उसळते
{{gap}}तू भरारून मोकळा... |- | || |- | झोपल्या ज्वालामुखी सम
शत युगांनी काल माझा || {{gap}}ओठ मिटवून कुंथले
{{gap}}प्राण कोणी उकलला ?... |- | || |- | कोंडलेल्या विषकढांनी
त्याच रंगाला भुलोनी || {{gap}}जाहले मी सावळी
{{gap}}मेघ झम झम बरसला... |- | || |- | बीज चेतून बहकले अन्
उधळुनी सोळा कळा || {{gap}}विश्व बघण्या झेपले
{{gap}}मेघ मीही झेलला... |- | || |- | सूर्यदग्धा...मेघ मग्ना
कोण माझा ? मी कुणाची ? || {{gap}}कोणती मी नेमकी ?
{{gap}}...काळ येथे रुंधला... |- | ● || |}<noinclude>कविता गजाआडच्या /४७</noinclude> s9jf1d6d4611v2p6304t267ok0ew7sz पान:कविता गजाआडच्या.pdf/४७ 104 70763 155451 2022-08-03T05:45:57Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{x-larger|'''समर्पित जीवने'''}}

<poem>अक्षरांना अर्थ देऊन श्वास पेरित चालणे अमृता वोल्हाविती ही समर्पित जीवने... पारिजाताने लवावे हृदय जैसे कोमळ दुःखितांच्या वेदनांचे चुंबुनी ओले वळ वाहत्या सरितेपरी तीर फूलवित वाहणे... जहर शब्दांचे पचवुनी हास्य ओठी गोंदले कर्मयोगी पावलांशी कंटकांची हो फुले पेटत्या ज्वालेपरी पंख पसरून सांजणे... ईश्वराची साक्ष येथे लक्ष लवती मस्तके स्वेदयात्री हे भिकारी मानवैभव या फिके ज्यातिने ज्योतीस उजळित जन्मवेरी चालणे... ● </poem><noinclude>कविता गजाआडच्या /४८</noinclude> k5xd5c8utorf9byluyglo1zuby4t78h पान:कविता गजाआडच्या.pdf/४८ 104 70764 155452 2022-08-03T05:49:52Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{x-larger|'''गाणे तिच्याच साठी....'''}}

<poem>गुणगुण गाणे ओठावरती, तुझिया फुलून यावे निश्वासांचे ओझे फेकून जीवन उमलून जाये ॥धृ॥ हे हात कोवळे, ओझ्याखाली दबले हे केस मोकळे, तेलाविण झाले जाळे माथ्यावरचे ऊन बाभळी क्षणभर उतरून यावे... १ ही अनाथ माती, अनवाणी पायाखाली त्या उजाड राती, स्वप्नांविण मिटल्या डोळी हसण्यासाठी चार क्षणांचे अंगण तुला मिळावे ...२ हे श्वास उद्याचे फुलण्या आधी खुडले आईचे दुखरे डोळे पंखातून क्षण फडफडले या मातीच्या फुटव्यांसाठी आभाळाने गाव ....३ हे झाड कुणाचे ? माती की आभाळाचे ? हे झाड उद्याचे पालवत्या पानफुलांचे या विश्वाच्या आईसाठी प्राण इथे पेराव ....४ ● </poem><noinclude>कविता गजाआडच्या /४९</noinclude> hdcrq3muyj01lzit47rceho9neey326 पान:कविता गजाआडच्या.pdf/४९ 104 70765 155453 2022-08-03T05:57:41Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{x-larger|'''२८ ऑगस्ट १९९५ ची पहाट,
बिजिंगच्या दिशेची..'''}}

<poem>गच्च अंधाराच्या पंखावरून उडताना आगीनगाडीच्या धुरा सारखा अंधार मागे..मागे घरंगळून पडत गेला. बहुदा, रावणाच्या खांद्यावर बसून उडणाऱ्या सीतेने मागे फेकलेल्या आकंठ दागिन्यांसारखा.... तर, मैत्रिणी मीरे तू त्याही वाटेवर भेटलीस. न थांबता न थकता न वाकता चालणारी तू... अंगभर पहेनकर 'धीरज का घागरा' आणि 'सचकी ओढनी' 'अनदेख्यो' प्रदेशाची वाट चालणारी नवी दिशा शोधणारी</poem><noinclude>कविता गजाआडच्या /५०</noinclude> ss502kjz4x4ytyv4wvckb6rj0vhejsx पान:कविता गजाआडच्या.pdf/५० 104 70766 155454 2022-08-03T06:03:00Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude><poem>तू... मीरे, घनदाट आभाळाचा हात धरून घुमणाऱ्या माझ्या ज्ञानूला रूणझुणत्या वाऱ्याच्या नितळ आरशात दिसली होती स्वतः अैवजी विराणी राधा. आणि आज? मलाही उमजलं नाही की तुझा निर्भय धीराचा घूॅंमर घागरा आणि नीडर सत्याची तलम ओढणी माझ्याही अंगभरून कधी भिरभिरायला लागली ते !!! मैत्रिणी मीरे, तू...मी... नोरती.. भंवरी... साबिया किंकरी.. झरिना... नर्गिस..जया अशा शेकडो... हजारो न पाहिलेल्या प्रदेशाच्या पाऊलवाटेने धावणाऱ्या... ...</poem><noinclude>कविता गजाआडच्या /५१</noinclude> gw4utmtsvgvf1fs9fh3guvdcto3nzev पान:कविता गजाआडच्या.pdf/५१ 104 70767 155455 2022-08-03T06:06:37Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude><poem>या क्षणी पापणीतून उगवलीय नीरव.. स्वयंभू पहाट जी भर बाजारात डोईवरचा पदर खांद्यावर घेणाऱ्या जनाईला सापडली होती ... उठा बायांनो उठा आवरा झरा झरा बिजींगच्या धावपट्टीवर इमायनानबी पाय टेकलेत उतरा माय उतरा... ... तर, रावणाच्या उजव्या पायाचा अंगठा कैकयीच्या आज्ञेने मनभरून... चित्रफलकावर रेखणाऱ्या भवभूतीच्या सीते, आज मीही मानणार आहे आभार रावणाचे .... </poem><noinclude>कविता गजाआडच्या / ५२</noinclude> q5nna3k5yhuvsqkk5n62qh2v24s9g1b पान:कविता गजाआडच्या.pdf/५२ 104 70768 155456 2022-08-03T06:10:33Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude><poem>एरवी एकवीस..पंचवीस..तिसाव्या शतकातूनही अंधाराच्या पंखावरून वहात राहिलो असतो 'रामनाम' जपत- ●</poem><noinclude>कविता गजाआडच्या /५३</noinclude> 8kz1uarjy4blsu5axrywr8blosqsm11 पान:कविता गजाआडच्या.pdf/५३ 104 70769 155457 2022-08-03T06:14:43Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{x-larger|'''भंवरीबाई...'''}}

<poem>बीजींगच्या वाटेवर तुझ्या हातात हात गुंफले नि पुन्हा एकदा कडकडून भेटलीस भवरीबाई तू. तेव्हापसवर वर्तमानपत्रांच्या मथळ्यातून आणि धुसमुसत्या शब्दागारातून मस्तकात सणसणत फिरली होतीस गोफणगुंडा फिरवीत. त्या विभोर सायंकाळी मात्र कृष्णतुळशीच्या रंगातून मिणमिणत्या पहाट - डोळ्यातून अंगभर जाणवलीस तनामनात भंवरलीस आणि बीजींगची वाट कशी पायाखाली आल्यागत वाटली. ... आज पुन्हा</poem><noinclude>कविता गजाआडच्या /५४</noinclude> n953f2kvc3j9vl5157gmqv3pln4xash पान:कविता गजाआडच्या.pdf/५४ 104 70770 155458 2022-08-03T06:23:15Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude><poem>दोन महिन्यानंतर ...?..? पुन्हा एकदा तू वर्तमानपत्रांच्या काळ्या अक्षरातून... .... मीरेच्या पायात रुतणारी वाळू तुझ्याही पायाखाली. विषाचा पेलाही तोच. फक्त समोर ठेवणारे हात नि चेहेरे बदलेले .... वाटलं होतं धीरज का घागरा नि सचकी ओढनी पेहनल्यावर तरी मीरेच्या स्वप्नातला तो देश तुला... मला..तिला सापडेल पण, भंवरीदेवी, गड उतरून जमिनीवर पाय ठेवणाऱ्या मीरेला.. भवरी,सिसीलिया कमला..नझमा..हमीदा, मी नि तिला तो देश कोणत्या का होइना शतकात गवसेल ना...? ●</poem><noinclude>कविता गजाआडच्या /५५</noinclude> meioxfse5ppk0qffntqcudor1vkfnno पान:कविता गजाआडच्या.pdf/५५ 104 70771 155460 2022-08-03T06:30:34Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{x-larger|'''पाऊस (१)'''}}

<poem>चहू अंगानी... अंगानी दाट आभाळ झेपलं काळ्या मातीच्या कवेत रूप माईना सावळं... चहुअंगानी !! लाख धारांचे...धारांचे कसे सोसावे कहार ? काळ्या रेसमी पोतात जडविले निळेमोर... चहुअंगानी !! रान मोरांचे...मोरांचे लाख डोळ्यंचे पिसार हुब्या अंगात...अंगात वल्या गंधाचे शहार... चहुअंगानी !! खिन थांबल्या...थांबल्या जित्या रगताच्या लाटा भर रानात अवेळी कोनी ठकविल्या वाटा ?.... चहुअंगानी !! ●</poem><noinclude>कविता गजाआडच्या /५६</noinclude> 1ndhx5cbjfbu29j63ot9hz937g9ejtc पान:कविता गजाआडच्या.pdf/५६ 104 70772 155462 2022-08-03T06:35:32Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{x-larger|'''पाऊस (२)'''}}

<poem>माझ्या मनाची कवाडं आज कोनी मोकलली? झिमझिमत्या सरीनं भुई वलीकंच झाली... अंग..अंग गह्यरलं जसं शहारलं रान अंधाराच्या वाटेवर कोनी अंथरलं ऊन ? झणानत्या वाऱ्यासंगे देह झुंजून शिणला थेंबा थेंबी निथळून जीव पैंजणांचा झाला... माझ्या मनाची कवाडं घेती आभाळ सामोरी गाठ...गाठ सुटताना भरू आले प्राणभरी...!!! ●</poem><noinclude>कविता गजाआडच्या /५७</noinclude> r6ojth0j55ydx0ewwzw16ari2zh3luk पान:कविता गजाआडच्या.pdf/५७ 104 70773 155464 2022-08-03T06:40:30Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{x-larger|'''अरे पावसा.. पावसा'''}}

<poem>कोनी क्येलं रे चेटूक जीव झाला येडा पिसा किती झुंजशील बाप्पा अरे पावसा...पावसा... थळथळलेली शेतं रान झालं मुकं..मुकं मान मोडुनिया हुबं पान लागलेलं पिक ऊन वाहिसनी ग्येलं सूर्य गेला कुन्या देसा?... हुबी पान्यात लेकुरे माय झाली कसनुशी फाटलेल्या आभायाला चार टाके घालू कसी? इघुरल्या पदराचा तुला घालते आडोसा..... कशी तुही येडी माया माय धुपावून गेली बाळ कनसांची काया मुकेपणी खरचली </poem><noinclude>कविता गजाआडच्या/५८</noinclude> clupavp7lf9nvmlucfmqeg6b019gzpp पान:कविता गजाआडच्या.pdf/५८ 104 70774 155465 2022-08-03T06:42:39Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> <poem>वल्या वढाळ मायेचा कसा धरावा भरोसा ?... किती घालशील येढे ? किती ओढशील फेर? ऊर फुटेतो सोशीन तुह्या पावलांचा जोर उभी ठाकले कधींची मले माझाच भरोसा... येक ध्यानामंदी ठेव तुज्या थकलेल्या जीवा माझ्या मांडीचा विसावा... अरे पावसा पावसा ●</poem><noinclude>कविता गजाआडच्या / ५९</noinclude> q8gbg3mhy4jji86j6effkwn2c3pw82y पान:कविता गजाआडच्या.pdf/५९ 104 70775 155467 2022-08-03T06:47:37Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{x-larger|'''संग'''}}

<poem>न्हात्याधुत्या मातीचे भांग कोनी रेखिले ? मोतियांचे गजरे वर कोनी माळले ? न्हात्याधुत्या मातीचा भरजरी नखरा बिलवरी कशिदा काढियला पदरा!! न्हात्याधुत्या मातीचे अंग अंग चेतले कंवारिण कळीचे गंध कोनी झेलले ? न्हान्याधुत्या मातीचा शिणगार साजिंदा सावळिया रूपाले भुलला वो गोईंदा !! न्हात्याधुत्या मातीचे आवतन कोनाले ? कोनी केलं चेटूक ? कोनी रंग चोरले ? </poem><noinclude>कविता गजाआडच्या /६०</noinclude> b6in0uyjifvr76bzzk1qxvscrqvils7 पान:कविता गजाआडच्या.pdf/६० 104 70776 155468 2022-08-03T06:49:13Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude><poem>न्हात्याधुत्या मातीनं देखियलं सपन हरभऱ्या काकना हळदीचा सुकून !! न्हात्याधुत्या मातीचे भाळ कोनी गोंदले ? नादावले आभाळ काठावर झुकले !!! ●</poem><noinclude>कविता गजाआडच्या /६१</noinclude> ew6wlxv89ihhx1v1ypagufng0b6qdlv पान:कविता गजाआडच्या.pdf/६१ 104 70777 155470 2022-08-03T06:56:09Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{x-larger|'''खुणाविते चन्द्रावळ...'''}}

<poem>हिरवळ हिरवळ रेशमाच्या जावळाची अगंभर सळसळ.. हिरवळ हिरवळ पाखरांच्या पंखावर थरथरते आभाळ... हिरवळ हिरवळ बाभळीच्या दिवाळीची पितांबरी झुळझुळ... हिरवळ हिरवळ काळजात कालविते विषभरे काळेजळ... हिरवळ हिरवळ डोळाभर तुडुंबली दहादिशांची ओंजळ... हिरवळ हिरवळ काजळाच्या डोळियांची खुणाविते चन्द्रावळ... ● </poem><noinclude>कविता गजाआडच्या /६२</noinclude> 5poj2576zhkv03ji49ag8tkgey9d1li पान:कविता गजाआडच्या.pdf/६२ 104 70778 155471 2022-08-03T06:58:59Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{x-larger|'''घर'''}}

<poem>आपणच आपल्या घरात 'आश्रित' होतो तेव्हा 'घर' या शब्दकोशातील शब्दांचा अर्थ शोधित रानोमाळ भटकावे लागते वनवासी होऊन. आणि अचानक भेटतो तो म्हातारा 'घर देता का घर?' म्हणत दारोदारी वणवणणारा... ... थकून भागून कधीतरी बाभळींच्या सावलीत निवान्त झोपलेला आणि अचानक ओंजळीत येतं स्वप्नातलं घर कधीच न हरवणारं.. ●</poem><noinclude>कविता गजाआडच्या /६३</noinclude> ir537qv8dxmiztudexv9yrrepq82gp4 पान:कविता गजाआडच्या.pdf/६३ 104 70779 155472 2022-08-03T07:03:17Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{x-larger|'''कोण वाजवी पैंजण ?'''}}

<poem>आज वारा चेतावला जीव झाला जाईजुई अंगभरून झुरते देवघरात समई... अस्सा वारा चेतावला शिरिषाचे डोळे जड पायतळी पानोपानी आठवांचे फाटे शीड... चेतावला वारा वारा प्राणभरी काठोकाठ फांदीफांदीला फुटवा डोळा उघडतो देठ... आज वारा चेतावला नुरे पदराचे भान दक्षिणेच्या दारातुन कोण वाजवी पैंजण ?...? ●</poem><noinclude>कविता गजाआडच्या / ६४</noinclude> eprsqqn5mlebgpg2a6exy3cpux291g0 पान:कविता गजाआडच्या.pdf/६४ 104 70780 155473 2022-08-03T07:25:51Z अश्विनीलेले 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ थिजणारी पाने आणि अपंग स्वप्ने तुझ्या घनगर्द सावळ्या पाठीचे रसरशीत ताजे पान अथांग उन्हाळे हिवाळे झोलून आतल्या आत थिजत चाललेय. माझे उत्फुल्ल गुबरे गाल न्यावर टेकीत हजारो..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="अश्विनीलेले" /></noinclude>________________ थिजणारी पाने आणि अपंग स्वप्ने तुझ्या घनगर्द सावळ्या पाठीचे रसरशीत ताजे पान अथांग उन्हाळे हिवाळे झोलून आतल्या आत थिजत चाललेय. माझे उत्फुल्ल गुबरे गाल न्यावर टेकीत हजारो चांदण्या रेखण्याचा माझा छंद मात्र अजूनहीं थकलेला नाही. पण या आताच्या उत्तररात्री, मलाही उमगलेय उल्कापाताचे सत्य, आणि पुनर्जन्माच्या साखळीचे अपंग स्वप्न जे हरेकाच्या मनात उगवतेच हरळीगत ! शेवटी एकाच कॅसेटच्या दोन बाजू आतल्या आत थिजणारी पाने आणि पुनर्जन्माची अपंग स्वप्ने... कविता गजाआडच्या /६५<noinclude></noinclude> 7bqxhy71cjtss4047rx1vi4ofvimcf1