विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.21 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३० 104 66795 154977 130989 2022-07-22T12:04:52Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|आपणांपुढील कार्य.}} {{center|-------*------}} {{gap}}जगाच्या व्यवहाराचा गाडा आपला मार्ग जो जो अधिक आक्रमीत जात आहे, तो तो मानवी जीवितापुढील प्रश्न अधिक खोल आणि अधिक विस्तृत होत आहे. मानवी जीविताचा अंतिम हेतु काय, या प्रश्नाची चर्चा फार प्राचीन काळी होऊन त्याचा निकालही तेव्हां लागला. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हे तत्त्व श्रुतीने प्रथम शोधून काढले त्याच वेळी या प्रश्नाचाही निकाल लागला. सृष्टीतील यच्चयावत् पदार्थ एकमेकांशी इतके पूर्ण बद्ध झालेले आहेत की, आपणाबरोबर दुसऱ्याला ओढल्यावांचून तींतील एक परमाणूहि कांहीं हालचाल करूं शकत नाही. सारे जग उन्नतीच्या मार्गाला लागल्या शिवाय एकाचाही प्रवास सुखरूपपणे होऊ शकत नाही. आतापर्यंत जो अ नुभव आपणांस आला त्यावरून जगाच्या उन्नतीचा प्रश्न कोणत्याही एक तर्फी मार्गाने सुटण्यासारखा नाही हे उघड झाले आहे. जगाला सुधारण्याचा हक्क एखाद्या विशिष्ट मानववंशाकडे अथवा राष्ट्राकडे परमेश्वराने सोपवि लेला नाही. असल्या आकुंचित भावनांच्या पायावर जगाची उन्नति व्हाव याची नाही. कोणताही सिद्धांत परोक्षतः कितीहि खरा असला, तरी त्याची सत्यता साया मानवजातीला पटली पाहिजे. प्रत्येक सद्भावनेचा विस्तार इतका झाला पाहिजे की, तिच्यांत सारे मानवकुल बुडून गेले पाहिजे. साऱ्या जीवितभर ही कल्पना व्यापून राहिली पाहिजे. प्राचीन काळी आपल्या देशाची जी स्थिति होती, ती गेल्या काही शतकांच्या अवधींत कां राहिली नाही याचे कारण या विवेचनावरून स्पष्ट होईल.<br> {{gap}}प्राचीन काळी दोन मानवकुले एकाच मुळापासून उत्पन्न झाली; पण या दोहोंची परिस्थिति भिन्न असल्यामुळे त्यांची वाढही वेगवेगळ्या दिशांनी झाली; आणि मानवी जीविताचे कूट प्रश्न ती आपापल्यापरी सोडवू लागली. ही दोन कुले हिंदु आणि ग्रीक ही होत. हिंदु आर्यांची वस्ती भरतभूमीत झाली. हिच्या उत्तरेला पर्वतराज हिमालय. या हिमनगराजापासून पुष्कळ मोठमोठ्या नद्यांचा उगम होऊन त्या खाली मैदानावर वहात येतां येतां त्यांचे स्वरूप समुद्राप्रमाणे विशाल झाले. या सपाट प्रदेशी जिकडेतिकडे स्वा० वि० खं०-९-१५.<noinclude></noinclude> goxykspcgu4epggbhvk7wgex9rwenwf पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३१ 104 66796 154978 130990 2022-07-22T12:16:04Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२२६ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.[नवम {{rule}} प्रचंड अरण्ये पसरली होती. यांचा विस्तार इतका मोठा होता की, यांच्या पलीकडे जग म्हणून काही असूच नये असे एखाद्यास वाटावें. संस्कृतीच्या संपर्काचा नुसता वाराही लागण्याचा संभव येथे नव्हता. येथे राहणा रास जगाच्या कोणत्याही उपाधीपासून बाधा होण्याजोगी नव्हती. यामुळे येथील रहिवाशांचा लौकिक संबंध आपोआप तुटून त्यांची वृत्ति स्वाभा विकपणेच अन्तर्मुख झाली. त्यांची दृष्टि बाह्य जग सोडून अंतःसृष्टीकडे पाहूं लागली. आर्यांना बुद्धीच्या विशालत्वाची जोड स्वाभाविकपणेच मिळाली होती. त्यांची उपजतबुद्धीच अंतस्थ विचारांकडे वळणारी होती. तशांतून त्यांचा वास ज्या स्थळी झाला तें नितांत रमणीय. प्रचंड नद्या, उत्तुंग गिरिशिखरें आणि अफाट वनराजी यांच्या साहचर्यात त्यांची उपजतबुद्धि जागृत होऊन ती अंतःसृष्टीचा विचार करू लागली यांत नवल नाही. मानसिक शक्तीचे पृथक्करण हा एकच विषय हिंदु आर्यांनी विचाराकरितां आपल्या हाती घेतला होता. ग्रीक लोकांची स्थिति याहून वेगळ्या प्रकारची झाली. जगाच्या ज्या भागांत त्यांनी वास केला, तो भाग सुंदर आणि रमणीय खरा पण त्यांत उदात्तपणा नव्हता. आजूबाजूची सृष्टि अत्यंत मोहक पण तिच्यांत कोणाचें चित्त अंतर्मुख करण्यापेक्षा बहिर्मुख करण्याचा गुण अधिक होता. सृष्टीने आपल्या साऱ्या सौंदर्याचा वर्षाव येथे सढळ हाताने केला होता. पण तेथील रहिवाशांची चित्तवृत्ति आपल्याच ठिकाणी गुंतवून ठेवावी असा गुण या सौंदर्यात होता. यामुळे तेथील ग्रीक कुलाचें मन या बाह्य सृष्टीकडे धाव घेऊ लागले; ही गोष्ट स्वाभाविकपणेच घडली. या बाह्यसृष्टीचे पृथक्करण कर ण्याकडे त्या मनाचा कल झाला. यामुळे हिंदुकुलाच्या द्वारे सारें पृथक्करण शास्त्र अवतीर्ण होऊन सृष्ट पदार्थांची शास्त्रे ग्रीक कुलांतून उद्भवली. हिंदु मन आपल्या दिशेने गेले आणि त्याने विश्वव्यापी सिद्धांत निर्माण केले. आजच्या काळीहि हिंदवासीयांची तर्कबुद्धि आणि त्यांच्या मेंदूचे विशालत्व ही सान्या जगांत अव्वल प्रतीची आहेत. आमच्या येथील तरुण कोठेही बाह्यदेशी गेले, तरी बुद्धीच्या बाबतीत दुसऱ्या कोणत्याही देशांतील तरुणांवर अद्यापि मात करितात, हा आपला नित्याचा अनुभव आहे. पण याच वेळी आणखीहि एक मुद्दा लक्ष्यात ठेविला पाहिजे. मुसलमानांनी हिंदुस्थान देश जिंकण्यापूर्वी एकदोन शतकें आमच्या अवनतिकालास सुरवात झाली. त्या वेळी या बुद्धि- --<noinclude></noinclude> 4zxl4gjnl3fopn6p0dex1mzmgh3kadg पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२३२ 104 66797 154979 130991 2022-07-22T12:25:22Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.]आपणांपुढील कार्य.२२७ {{rule}} वैभवाचे स्तोम अतिरेकास गेले होते. राष्ट्राची कर्तृत्वशक्ति हळू हळू लयास जात होती. बुद्धीच्या या अतिरिक्त आणि फाजील महत्वामुळे तिचा खरा जोम नाहीसा होऊन तीहि अवनतीच्या मार्गाला जाऊ लागली. ही अवनति कोण त्याही एका विशिष्ट वस्तू पुरतीच नसून तिचा व्याप हिंदुस्थानांतील सा-याच गोष्टींत थोडा फार आढळून येतो. साहित्यसंगीतादि कला घ्या, अथवा भौतिक शास्त्रे घ्या, तिचा प्रवेश कोठे नाही असे नाही. कलांत अवश्य अस णारा दृष्टीचा चौफेरपणा कोठेच दिसेनासा झाला. सौन्दर्याच्या कल्पनांतील उदात्तपणा नाहीसा झाला. नुसत्या बाह्य आकारांतील रेखीवपणाची कल्पनाही नाहीशी झाली, आणि यांच्या जागी भपकेबाज बेडौल आणि अगडबंब अशी पद्धति प्रचारांत येऊ लागली.नव्या कल्पना उत्पन्न करण्याचा जिवटपणा हिंदूंच्या मेंदूत राहिला नाहीसे दिसते. प्राचीन संस्कृत संगीतांत हृदयाला हालवून सोडण्याची जी शक्ति होती, तिचा प्रत्यय या काळांतील संगीतांत कोठेही येई नासा झाला. प्रत्येक स्वराला जें स्वातंत्र्य म्हणून असावें तें नष्ट झाले. अर्वा चीन कालचे संगीत म्हणजे अनेक स्वरांची नुसती खिचडी होय. तानांच्या गिरक्यांत अनेक स्वर अशा रीतीने एकत्र गुरफटतात की, त्यांतील कोणाही एकाचा स्वतंत्र पत्ता लागत नाही. संगीताची ही अवनतावस्था आहे. केवळ कल्पनेच्या साम्राज्याकडे तुम्ही पाहिले तरी तेथेही हाच प्रकार तुम्हांस आढळून येईल. जुन्या पुराण्या आणि उष्ट्या कल्पना डामडौलाच्या आणि भपकेबाज भाषेच्या शृंगारांत मांडलेल्या तुम्हांस आढळतील. येथेही नुसत्या बाह्य शृंगाराच्या भपक्यावर तुमचे डोळे भारून टाकण्याचा हा यत्न अस ल्याचे तुमच्या प्रत्ययास येईल. या पोषखाच्या आंत कल्पनेचा नवीनपणा असा कोठेच आढळावयाचा नाही. धर्म विचार ही आपली खास हक्काची बाब आहे असें तुम्ही समजतां, पण या बाबींत झालेल्या अवनतीस कोठे तोडही सांपडावयाची नाहीं; आणि असे होणे हे युक्तच आहे. पाणी पितांना भांडे उजव्या हातांत असावें की डाव्या हातांत असावें, असल्या प्रकारच्या प्रश्नांना अत्यंत निकडीचे महत्त्व देऊन त्यांच्या चर्चेत शेकडो वर्षाच्या काळाचा अपव्यय ज्यांनी केला, असल्या तत्त्ववेत्त्यांच्या बुद्धीतून अधिक चांगली फलप्राप्ति ती काय होणार ? ज्या देशांतील अत्यंत विशाल बुद्धीचे लोकही स्वयंपाक घरांतल्या गोष्टींची चर्चा करण्यांत शेंकडों वर्षे खर्च करि-<noinclude></noinclude> ha8wt2lg7ei2cwi96u2aiaoxql4oikl पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८६ 104 70521 154980 2022-07-22T16:31:10Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ७२ ) दहनस्थलों देवालय बांधून ब्राह्मणद्वारा पूजा सुरु आहे. व दरसाल चोळी पातळहा संस्थानांतून द्यावें लागतें देह ठेवितांना तिनें आपल्या संनिध मला स्थान द्यावें येवढे मागून घेतल..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७२ ) दहनस्थलों देवालय बांधून ब्राह्मणद्वारा पूजा सुरु आहे. व दरसाल चोळी पातळहा संस्थानांतून द्यावें लागतें देह ठेवितांना तिनें आपल्या संनिध मला स्थान द्यावें येवढे मागून घेतले होतें. पुढें श्रीनारायण महाराज यात्रेस जाऊन परत चिंचवड येथें आले. ८गंगाधर नाईक या नांवाच्या गृहस्थानें लढाईत यश मिळावें ह्मणून चिंचवड येथें येऊन पवनाबाईंत उभें राहून एकवीस दिवस अनुष्ठान केलें. श्रीमोरया प्रसन्न होऊन त्यांनी त्यास एक प्रासादिक तरवार श्रीनारायण महाराजांच्या हातानें देव- विली. नाईकानें तिचा भक्तिपूर्वक स्वीकार करून वसईचा किल्ला घेण्याचे कामीं पराक्रम करून तो सर केला. श्री- ९ निरंजन नांवाचा एक ब्राह्मण मोरगांवास श्रीमंगलमूर्तीची भक्तिकरून राहिला होता. त्याच्या भक्तींनी श्री प्रसन्न होऊन डोळूं लागले. इतक्यांत श्रीनारायण महाराजांची स्वारी श्री- दर्शनास आली ह्मणून त्यांच्या लोकांनी त्यास तेधून घालवून दिलें तो बिचारा भैरवाजवळ जाऊन बसला हे पाहून मंगलमूर्तीही तेथे गेले हा चमत्कार पाहून श्रीनारायण म हाराजांनी त्यांस स्वतः सन्मानानें परत देवालयांत आणवून आपल्या उजव्या बाजूचा त्यास मान दिला. श्रीनारायण महाराजांनी शके १६३२ भाद्रपद शु. ७ रोजी हा नश्वरदेह विसर्जन केला. त्यांना जेथें दहन केलें तेथें श्रीगणपतीची<noinclude></noinclude> 5uklx1q3ok4pir4b8n5wjd4duzotdg4 पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८७ 104 70522 154981 2022-07-22T17:19:00Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ७३ ) प्रतिमा उठविली आहे व शेजारी त्यांच्या पत्नीस दिलेल्या वराप्रमाणें तिचीही प्रतिमा उमटली आहे. हल्लीं ह्या दोन्ही प्रतिमा एकत्र असलेल्या जागीं देऊळ बांधिलें आहे ( शके १६४१ आर..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७३ ) प्रतिमा उठविली आहे व शेजारी त्यांच्या पत्नीस दिलेल्या वराप्रमाणें तिचीही प्रतिमा उमटली आहे. हल्लीं ह्या दोन्ही प्रतिमा एकत्र असलेल्या जागीं देऊळ बांधिलें आहे ( शके १६४१ आरंभ मार्गशीर्ष शुद्ध १० समाप्ति १६४२ शर्वरी नाम संवत्सरे वैशाख श्रु. ३ ) ४ धाकटे श्रीचिंतामणि महाराज, १ हे श्रीनारायण महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होत हे सत्पुरुष असून साक्षात्कारी होते. यांनी आपला काळ श्रीमंगलमूर्तीच्या सेवेंत घालविला. यांचे कारकीर्दीत श्रीनारायण महाराजांनी बांधिलेली देवालयें थेऊर, शेवरी येथील पूर्ण झाली. यांनीही आणखीं कांहीं देवालयें बांधिलीं आहेत. याशिवाय यांचा इतिहास उपलब्ध नाहीं यांनीं शके १६५८ कार्तिक वद्य १२ रोजी समाधि घेतली. ५ श्री धरणीधर महाराज ( थोरले.) १ श्रीधाकटे चिंतामणि महाराज यांचे हे वडील पुत्र होत. हेही साक्षात्कारी असून सत्पुरुष होते. यांचे कारकीर्दीत सातारचें शाहुराजास श्रीचे दर्शनास जाण्याबद्दल मंगलमूर्तीचा दृष्टांत +टीप- हे नरनारायणाचे अवतार होत ह्मणून द्विमुख उमटले आहेत अर्से कोणी सांगतात.<noinclude></noinclude> i0gm1ts08ycudt52su820dqaww6w58q पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८८ 104 70523 154982 2022-07-22T17:19:29Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ७४ ) झाला. त्याप्रमाणे ते चिंचवड येथे श्रीचे दर्शनास आले. प्रथम वाड्यांत गेले तों धरणीवर महाराज तेथें नसून दूर्वा आणण्या- करितां बागेंत गेले होते. ह्मणून कारभारी मंडळींनी महाराज..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७४ ) झाला. त्याप्रमाणे ते चिंचवड येथे श्रीचे दर्शनास आले. प्रथम वाड्यांत गेले तों धरणीवर महाराज तेथें नसून दूर्वा आणण्या- करितां बागेंत गेले होते. ह्मणून कारभारी मंडळींनी महाराजांचे बंधूसच हे महाराज ह्मणून दाखविले परंतु शाहूमहाराजांस स्व- प्रांत जे पुरुष दिसले ते हे नव्हत असें वाटून त्यांनी चौकशी केली. त्यावरून ते दूर्वा आणण्याकरितां बागेत गेल्याचें वृत्त त्यांना समजलें ह्मणून शाहूमहाराज श्रीमोरयाचे देवालयाकडे दर्शनास गेले. तों श्रीधरणीधर महाराज तिकडून येत होते. उभयतांची दृष्ट होतांच खुणापटून शाहूमहाराजांनी श्रींस साष्टांग दंडवत घातलें. श्रीनी तेथेंच प्रसाद दिला ही भेट जेथें झाली त्या खड- काला राजाबेंडा ह्मणतात. नंतर कांहीं दिवस मुक्काम पडून शाहूमहाराज परत गेले. हे शके १६९४ मार्गशीर्ष वद्य ६ स समाधिस्त झाले. ६ श्रीनारायण महाराज (धाकटे ) १ श्रीधरणीधर महाराज यांचे हे वडील पुत्र होत यांस सि- द्वि अनुकूल असून हे सत्पुरुष साक्षात्कारी होते. एकदां श्री- मंत माधवराव पेशवे यांनी इंग्रज सरकारावर स्वारी करण्याचा मनोदय करून ओझर येथें श्रीचेदर्शनास नानाफडणीस व स खारामबापू ह्यांसहवर्तमान गेले. त्यावेळी श्रींचा प्रसाद झाला.<noinclude></noinclude> nr31qt54xti66mnyaryr3k9u3fojsjr पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/८९ 104 70524 154983 2022-07-22T17:19:57Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ७५ ) की तुझांस जय प्राप्त होईल. त्याप्रमाणे त्यांस अनुभव आला तेव्हां परत येतांना त्यांनी श्रीचें दर्शन घेऊन गाँव इनाम करून दिले ते अद्याप त्यांचे वंशजाकडे चालू आहेत. ही गोष्ट शके..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७५ ) की तुझांस जय प्राप्त होईल. त्याप्रमाणे त्यांस अनुभव आला तेव्हां परत येतांना त्यांनी श्रीचें दर्शन घेऊन गाँव इनाम करून दिले ते अद्याप त्यांचे वंशजाकडे चालू आहेत. ही गोष्ट शके १७०० विलंबनामसंवत्सरी घडली. यांनी शके १७२४ कार्तिक वद्य १२ रोजी समाधि घेतली ७ श्रीचिंतामणि महाराज (तिसरे) १ श्रीनारायण महाराजांचे हे ज्येष्ठ पुत्र त्यांच्या पश्चात् संस्थानचे मालक झाले. हे साक्षात्कारी सत्पुरुष होते परंतु यांनी गादीचा उपभोग फार दिवस घेतला नाहीं हे शके १७२७ आषाढ शु || ४ स समाधिस्त झाले. यांस औरस संतती नव्हती व श्रींची आज्ञाही सात पिढ्यांपर्यंतच औरस संततीस उपभोग घेता येईल अशी होती त्याप्रमाणेंच शेवटी झालें. नंतर यांनी धरणीधर महाराजांस दत्तक घेतलें. ८ श्रीधरणीधर महाराज ( दत्तक ) १ श्रीचिंतामणि महाराजाचे हे दत्तक पुत्र हेही साक्षात्कारी सत्पुरुष व व्यवहार चतुर होते. यांचा जन्म शके १७२२ साली झाला. हे एकदां निजाम हैदराबादेस गेले होते तेव्हां त्यांचा दिवाण चंदूलाल यानें महाराजांचें सत्व पाहावें ह्मणून एका सबर असलेल्या घोडीस व गाईस काय.<noinclude></noinclude> av8ppaaga55rkr5nequ96az3wfj6653 पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/९० 104 70525 154984 2022-07-22T17:20:21Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ७६ ) होईल ह्मणून विचारलें त्यावरून महाराजांनी त्यांस उत्तर दिलें. पुढे त्यांनी त्यांस ती जनावरें प्रसूत होईपर्यंत ठेवून घेतलें. दोन्हीं जनावरें प्रसवल्यानंतर पाहतात तो महाराज..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७६ ) होईल ह्मणून विचारलें त्यावरून महाराजांनी त्यांस उत्तर दिलें. पुढे त्यांनी त्यांस ती जनावरें प्रसूत होईपर्यंत ठेवून घेतलें. दोन्हीं जनावरें प्रसवल्यानंतर पाहतात तो महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचा अनुभव आला त्यावरून दिवाणांनी निजामसरकारा कडून महाराजांस देणगी देवविली. यांचा काल शके १७७४ अधिक भाद्रपद व||४ ता. २ सप्टेंबरसन १८५२ रोजी झाला. २ श्रीधरणीधर महाराज गादीवर असतांना त्यांचे पुत्र श्री- चिंतामण महाराज हे अल्पवयी वारले. धरणीधर महाराज यांच्या कुटुंबांनी गणपतदेव या नांवाचे इसम दत्तक घेतले असें ह्मणतात. यांना सुमारें २० वर्षे संस्थान चालविलें तसेंच श्रीचिंतामण महाराजांच्या बायकोनेंही एक भालचंद्र देव या नांवाचे इसम दत्तक घेतले होते. उभयतांचा तंटा सुरू झाला व कोर्टात निकालासाठीं प्रकरण गेलें. त्यावेळीं निकालांत दोघेही श्रीची सेवा करण्यास अनधिकारी ठरले. नंतर कोटांनी संस्था- नची व्यवस्था तीन ट्रस्टींच्या हाती दिली त्यावेळेपासून हल्लींचे महाराज धुंडिराज गणेशदेव हे चीफट्रस्टी या नात्यानें संस्थानचे पट्टाभिषिक्त महाराज ह्मणून काम पाहत आहेत ( इ. स. १८९० तारीख १६ आगष्ट ) श्रीमंगलमूर्तीचें संस्थान नंबर १ श्रीमोरयागोसावी यांनी श्रीमंगलपूर्तीस प्रसन्न करून त्यांनी<noinclude></noinclude> 4kjig00hup227psjpnz9nxgxkl5khfq पान:गुन्हेगार जाती.pdf/२ 104 70526 154985 2022-07-22T17:23:23Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "गुन्हेगार जाती. चिंचक नारायण अचे, बी. ए. एल् एल्. बी. सब्जज, कोर्ट पारनेर जिल्हा, अहमदनगर ह्यांनी, मे. एम्. केनडी सा. ब. इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस इलाखा मुंबई, ह्यांच्या क्रिमिनल क्लासे..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>गुन्हेगार जाती. चिंचक नारायण अचे, बी. ए. एल् एल्. बी. सब्जज, कोर्ट पारनेर जिल्हा, अहमदनगर ह्यांनी, मे. एम्. केनडी सा. ब. इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस इलाखा मुंबई, ह्यांच्या क्रिमिनल क्लासेस इन् दि बाँबे प्रेसिडेन्सी नामें पुस्तकावरून लिहिलें. आवृत्ति पहिली, प्रती ५०००. सन १९९९. किंमत सवा रुपयां.<noinclude></noinclude> i1e3446s8d55s9y8a1z0vb7w32slrvm पान:गुन्हेगार जाती.pdf/३ 104 70527 154986 2022-07-22T17:23:46Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "सन १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणे नोंदून पुस्तका- संबंधीं सर्व हक्क कर्त्यानें आपणाकडे ठेविले आहेत. पुणे येथें आर्यभूषण छापखान्यांत रा. नटेश अप्पाजी द्रवीड यांनीं छापिलें व पार..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>सन १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणे नोंदून पुस्तका- संबंधीं सर्व हक्क कर्त्यानें आपणाकडे ठेविले आहेत. पुणे येथें आर्यभूषण छापखान्यांत रा. नटेश अप्पाजी द्रवीड यांनीं छापिलें व पारनेर येथें रा. त्रिंबक नारायण अत्रे यांनी प्रसिद्ध केलें.<noinclude></noinclude> lrf2ibinokt3alksfcqsufwkq9dv7ji पान:गुन्हेगार जाती.pdf/४ 104 70528 154987 2022-07-22T17:24:09Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रस्तावना. ग्याझेटीअर्स, पोलिसखात्याचें दतर, अनुभवशीर पोलिसअंमल- दारांची टिपणें, आणि जातीजातींचे भेदे इत्यादि द्वारांनी माहिती मिळवून मेहेरबान एम्. केनडीसाहेब बहादूर इन्स्प..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>प्रस्तावना. ग्याझेटीअर्स, पोलिसखात्याचें दतर, अनुभवशीर पोलिसअंमल- दारांची टिपणें, आणि जातीजातींचे भेदे इत्यादि द्वारांनी माहिती मिळवून मेहेरबान एम्. केनडीसाहेब बहादूर इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस, इलाखा मुंबई, ह्यांनी गुन्हेगार जातींविषयी इंग्रजीत पुस्तक रचिलें. पोलिसांतील व गुन्ह्यांचे कामाशी संबंध असणाऱ्या इतर खात्यां- तील ज्या लोकांस इंग्रजी येत नाहीं, त्यांस हा विषय समजणे इष्ट आहे. त्यांचे उपयोगासाठीं सदरहु पुस्तकाचें हें मराठी रूपांतर केलें आहे. सदरच्या अंमलदारांस गुन्हेगार जातींची रहारीत, त्यांची गुन्हे करण्याची पद्धत वगैरे माहीत असणें अवश्य आहे. त्याशिवाय इतर लोकांसही सामाजिक सुधारक, शेतकरी व निकृष्ट जातींचे उ- द्धारासाठी प्रयत्न करणारे परोपकारी गृहस्थ-यांना प्रस्तुत पुस्तकापासून पुष्कळ उपयुक्त माहिती मिळण्याचा संभव आहे . मेहेरबान सी. सी. बॉईडसाहेब बहादूर, आय सी. एस., डि स्टिक्ट जज्ज, अहमदनगर व मेहेरबान एम्. केन सिाहेब बहादूर इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस, मुंबई इलाखा, यांचे शिफारशीवरून नामदार मुंबईसरकारनी मला हे पुस्तक प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली, ह्याबद्दल मी उभयतां साहेबांचे व नामदार सरकारचे मनःपूर्वक आभार मानतों. मेहेरबान केनडीसाहेबांचे उपकारांचा भार तर मज- वर फारच मोठा झाला आहे. मूळ पुस्तकाचें श्रेय त्यांना आहेच<noinclude></noinclude> m7lllqakpvyq2uv88q33bjesea1qog4 पान:गुन्हेगार जाती.pdf/५ 104 70529 154988 2022-07-22T17:24:34Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "२ आहे. पण त्याचे मराठी रूपांतरानें सुद्धा नेपथ्यविधान त्यानाच पुष्कळसें करावें लागले. त्यांनी पुस्तकाची हस्तलिखित प्रत साद्यंत तपासून दुरुस्त केली आणि अनेक ठिकाणीं सुबोध, अर्..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>२ आहे. पण त्याचे मराठी रूपांतरानें सुद्धा नेपथ्यविधान त्यानाच पुष्कळसें करावें लागले. त्यांनी पुस्तकाची हस्तलिखित प्रत साद्यंत तपासून दुरुस्त केली आणि अनेक ठिकाणीं सुबोध, अर्थपूर्ण व रेखले शब्द आणि शब्दरचना सुचविल्या. सबंध इलाख्याच्या एका खा- त्याचा कारभार शिरावर असतांना त्यांतले त्यांत वेळ काढून मेहन- तीनें व काळजीपूर्वक पुस्तक सुधारण्यात त्यांनी जें अगत्य दाखविलें त्याबद्दल त्यांचें कृतज्ञतापूर्वक कौतुक केल्यावांचून माझ्याच्यानें राह- वत नाहीं. मुकाम पारनेर, जिल्हा अहमदनगर. } त्रिंबक रायण अत्रे. सूचना - पुस्तकें खालील पत्त्यावर मागवावीत. दरमहा पंच- वीस रुपयांखालील पोलिस अंमलदारांना व्ही. पी., व टपालखर्च माफ. त्रिंबक नारायण अत्रे, सब्जज्ज, पारनेर, पोस्ट पारनेर, जिल्हा अहमदनगर.<noinclude></noinclude> es6jriwu0ivvtehgjbdilnlkqy1lnzs पान:गुन्हेगार जाती.pdf/७ 104 70530 154989 2022-07-22T17:25:14Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "मूळ ग्रंथांतील चित्रे व त्यांची पानें. . दिल्लीवाल बौरी कमाऊ धारवाड जिल्ह्यांतील लंबानी नेहमींच्या पोषाखांत भामटे वेषांतर केलेले भामटे विजापूर छप्परबंद दक्षिण महाराष्ट्रांत..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>मूळ ग्रंथांतील चित्रे व त्यांची पानें. . दिल्लीवाल बौरी कमाऊ धारवाड जिल्ह्यांतील लंबानी नेहमींच्या पोषाखांत भामटे वेषांतर केलेले भामटे विजापूर छप्परबंद दक्षिण महाराष्ट्रांतील कैकाडी सातारा जिल्ह्यांतील मांग हरण शिकारी रामोशी ... ... ... ... ... ... .... ... वाट चालणारा दिल्लीवाल कमाऊ औधीये ... ... BAB ... ... -- ... ... ... ... .... ... मुखपृष्ठ १ ... C THE १७३ २१९ पुस्तकाचे शेवटीं सात चित्रपट आहेत, त्यांत निरनिराळ्या जातींचीं गुन्ह्यांची उपकरणें दाखविली आहेत. ... ४९ ६३ १०८ १३३ ... १४३<noinclude></noinclude> o95v5z2yz0bris3kq3hmaz383k4rc3v पान:गुन्हेगार जाती.pdf/१० 104 70531 154990 2022-07-22T17:25:45Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "गुन्हेगार जाती -- मुंबई इलाखा. बंजारे. संज्ञा:- ह्यांना स्थानपरत्वें बंजारी, ब्रिंजारी, लमाण, लंबाणी व लंबाडी ह्मणतात. यांच्यांत पोटजाती पुष्कळ आहेत. त्यांत मथुरीये, लभाण, चारण ( रजप..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>गुन्हेगार जाती -- मुंबई इलाखा. बंजारे. संज्ञा:- ह्यांना स्थानपरत्वें बंजारी, ब्रिंजारी, लमाण, लंबाणी व लंबाडी ह्मणतात. यांच्यांत पोटजाती पुष्कळ आहेत. त्यांत मथुरीये, लभाण, चारण ( रजपुत बंजारे ) धारी ( यांना कर्नाटकांत तंबुरेरु ह्मणतात ) या चार मुख्य होत. धारी मुसलमान आहेत, व ते ह्या जातीचे भाट आहेत. बंजारा मांगांना धाळीये ह्मणतात. हिंदु बंजा- ज्यांच्या पोटजातींत सोनार, खवाशी अथवा न्हावी, पुजारी वगैरे आढ- ळून येतात. अहमदनगर, नाशिक, पुणे, खानदेश ह्यांमध्ये खेड्या- पाड्यांतून वंजारी जातीची वस्ति आहे. ही जात बंजाऱ्याहून वेगळी आहे. त्यांच्या रीतीभाती, पेहराव, भाषा, दक्षिणी मराठ्याप्रमाणे असून ते गुन्हे करीत नाहींत. गुजरायेंत थोडेसे गोवरीया अथवा गोवलीया आणि लमाण बंजारे दृष्टीस पडतात. त्यांची भाषा, पेहराव व तोंडवळा दक्षिणी व कानडी बंजायाहून किंचित् भिन्न आहे. हे लोक शेतकरी असून बिनपरवाना अफू आणण्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही गुन्ह्यांत पडत नाहींत. - www Spowe वस्तिः - मुंबई इलाखा, निजामशाही, ह्रैसूर, मद्रास, मध्यप्रांत व वहऱ्हाड येथें हे लोक सांपडतात.<noinclude></noinclude> c6shcy5i0nqlic83kd0jqj89q38bmtb पान:गुन्हेगार जाती.pdf/११ 104 70532 154991 2022-07-22T17:26:06Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "गुन्हेगार जाती. गुन्ह्यांचें क्षेत्रः- यद्यपि कांहीं पोटजाती अजून फिरस्त्या राहिल्या आहेत, तथापि बंजारे बहुतेक स्थाईक झाल्यासारखेच आहेत. कोठें कोठें त्यांच्याच तांड्यांचीं ग..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>गुन्हेगार जाती. गुन्ह्यांचें क्षेत्रः- यद्यपि कांहीं पोटजाती अजून फिरस्त्या राहिल्या आहेत, तथापि बंजारे बहुतेक स्थाईक झाल्यासारखेच आहेत. कोठें कोठें त्यांच्याच तांड्यांचीं गांवें झालीं आहेत. तळा (तांडा ) पासून तीस ते साठ मैलपर्यंत ते गुन्हे करतात. जनावरें उचलण्यासाठीं ते वेळेवर याही- पेक्षां लांच जातात. तळाच्या आसपास ते गुन्हे करीत नाहींत. लोकसंख्याः- या जातीची लोकसंख्या मुंबई इलाख्यांत एक लाख बंजारी व अठरा हजार लंबाणी आहे. बंजाऱ्यांचा भरणा खानदेश, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, पुणे, ठाणें ह्यांत विशेष आहे; व लमाणांचा धारवाड, विजापूर, दक्षिण भागांतील संस्थानें, पंचमहाल, बेळगांव, कानडा येथें आहे. - स्वरूपः- गांवठाणापासून दूर अशा पडीत जमिनीवर बंजाऱ्यांच्या तांड्यांची वस्ति असते. दरएक तांडयाला नाईक असतो, तो तांड्या- च्या पंचायती मिटवितो, व त्याच्यातर्फे इतरांशी बोलणें चालणें करितो. पुरुष उंच, धट्टे कट्टे, निमगोरे, बांधेसूद, कंटक आणि जबरदस्त मजल काटणारे असतात. जरा घामटपणानें राहणारे त्यांच्यांतले गरीब लोक सोडून द्या; पण एकंदरींत ही जात थेट इतर शेतकरी जातीप्रमाणें दिसते. पुरुषांचा पेहराव व तोंडवळा अंशतः घरंदाज मराठे किंवा मार- वाड रजपुताप्रमाणे दिसतो. त्यांचा नेहमींचा पोषाख झटला झणजे धोतर अगर चोळणा, अंगरखा अगर पेहरण, पांढरें किंवा रंगीत पागोटें हा होय. ते सणावाराचे दिवशीं भपकेदार पागोटें घालितात. सधन बंजारे घराबाहेर जातात तेव्हां भले मोठें तांबडें पागोटें घालून त्यावर उपरणें वेडेवांकडें गुंडाळतात. धारी सुंता करतात, पण त्यांची रहाणी व पुष्कळ नांवें हिंदूप्रमाणं असतात. बंजारणींचा बांधा व रूप चांगलें असतें. कोठें कोठें त्या बड्या धीट व बोलक्या असतात; व कोठें कोठें त्या लाजाळू व अवोल असून बाहेर मारवाडणीप्रमाणें तोंडावरून पदर घेतात. चारणांच्या बायका मोठ्या गमतीच्या दिसतात; त्यांचे ते झळक-<noinclude></noinclude> d5akadkz4h41j3qum4uz67m297gwp4k पान:गुन्हेगार जाती.pdf/१२ 104 70533 154992 2022-07-22T17:26:34Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "बंजारे. ३ , फळक, लाल किंवा निळे घागरे ( लहंगे ), त्याच रंगाचीं भिंगें, मणी किंवा शिंपा बसविलेली कशिदेदार ओढणी, कडक पण पोकळ कांचोळी, हाडकांच्या, शिंगाच्या किंवा पितळेच्या कोंपरभर बांग..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>बंजारे. ३ , फळक, लाल किंवा निळे घागरे ( लहंगे ), त्याच रंगाचीं भिंगें, मणी किंवा शिंपा बसविलेली कशिदेदार ओढणी, कडक पण पोकळ कांचोळी, हाडकांच्या, शिंगाच्या किंवा पितळेच्या कोंपरभर बांगड्या, नानाप्रका- रचीं डोकीचीं फुलें ह्यांनीं भरलेली कंबरेपर्यंत वेणी, आणि अग्रफुलें गुंफलेल्या कानशिलावर लोंबणाऱ्या बटा, रेलचेल पितळी पैंजण, कान- बाळ्या इत्यादि मोठी मजा दिसते. कोठें कोठें सौभाग्यवती बंजारणी माथ्यावर वेणीमध्ये सुमारें नऊ इंच लांबीचें शिंग अगर खुंटी घालितात व त्यावरून ओढणी घेतात. धारी जातीच्या बायका कोठें कोठें कोंप- राच्या वर बांगड्या भरीत नाहींत. मुसलमानणीप्रमाणे साडीचोळी फक्त लग्नकार्यात त्या नेसतात. धालिया जातीच्या बायका मांगिणीप्रमाणे साडीचोळी नेसतात व कांचेच्या बांगड्या भरतात. व बंजाऱ्यांत मथुरियांची जात बेगुन्हेगार, श्रेष्ठ, पण कमी भरण्याची आहे. ते खाऊन पिऊन सुखी असतात, घरांतून राहतात, जानवें अगर तुळशीची माळ घालतात, मद्यमांस खात नाहींत, आणि इतरांपेक्षां स्वच्छ राहतात. गुजरणीप्रमाणे त्यांच्या बायका साडी नेसतात, व केंसांच्या शेवटीं दोन इंच लांबीची कापडी खुंटी घालून माथ्यावर वेणी घालतात, आणि तिच्यावरून साडीचा पदर घेतात. लभाण पुरुष व बायकांचा पोषाख व राहणी मथुरियाप्रमाणें असते. बंजारे देवभोळे व फार चीडखारे असतात. ते नेहमीं आपसांत भांडतात, व कधीं कधीं रक्तपातही कर- तात. परंतु हळूहळू ते निवळत चालले आहेत. मथुरीये व लमाण सोडून बाकीच्या जातींच्या बंजाऱ्यांना मद्यमांस फार आवडतें. आपले भाले व नांवाजलेले कुत्रे घेऊन ते जंगलांत शिकार करतात. त्यांच्यांतल्या सघन लोकांचीं घरें मजबूत असतात; पण बहुतेकांचीं ताडपानांचीं किंवा गव- ताचीं छपरें असतात. प्रवासांत ते पालांतून राहतात. बंजारी कुत्र्यांची. जात फार प्रसिद्ध आहे. ते घरींदारी तांड्यांची राखण करितात.<noinclude></noinclude> 8wizwh0kx8dqzzte5v7qgcofqmhq104 पान:गुन्हेगार जाती.pdf/१३ 104 70534 154993 2022-07-22T17:27:13Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "गुन्हेगार जाती. भाषा:- बंजारी भाषा मारवाडीप्रमाणें असून तिच्यांत हिंदुस्थानी व मराठी शब्दांची भेसळ आहे. त्यांना हिंदुस्थानी बोलतां येतें, व ज्या प्रांतांत ते राहतात तेथील भाषाह..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>गुन्हेगार जाती. भाषा:- बंजारी भाषा मारवाडीप्रमाणें असून तिच्यांत हिंदुस्थानी व मराठी शब्दांची भेसळ आहे. त्यांना हिंदुस्थानी बोलतां येतें, व ज्या प्रांतांत ते राहतात तेथील भाषाही त्यांना येते. ४ सांकेतिक भाषा: -कर्नाटकामध्यें लमाणी बोलींत घरफोडीच्या हत्या- राला 'सुळा, ' दराडेयाला 'धरदमार,' व रस्तालुटीला 'वाटमार' ह्मणतात. उपजीविकेचीं बाह्य साधनें:- रेल्वे व सडका होण्यापूर्वी बंजारे आपल्या बैलांवर मीठ, धान्य वगैरेंची ने आण देशभर करीत असत. आतां • पुष्कळ जण थोडथोडी शेती व शेतमजुरी करतात. त्यांतले गरीब लोक गवत, सरपण, मध जंगलांतून आणून विकतात. लोक त्यांच्या- कडे गुरे राखुळीला घालतात. सावसावकारी करणारा बंजारा एखाद- दुसराच नजरेस पडतो. कांहींजण ढोरें, शेळ्यामेंढया वगैरे लांब लांब नेऊन विकतात; व कांहीं थोडे बैल बाळगून भाडे करतात. कांहींजण जागले, बेलीफ, पोलीस आगगाडीवर हमाल आहेत. नवी रेल्वे, तलाव वगैरे कामांवर लंबाण्याचे तांडे असतात. ते बहुधा दिवसा काम आणि रात्री आसपासच्या गांवांत चोऱ्या करतात. वेषांतरः- दरोड्यासाठीं खवर काढण्याकरितां व जुळवाजुळव कर- ण्यासाठीं कर्नाटकमध्यें बंजारे हे, लिंगायत किंवा ब्राह्मणांचा वेष घेतात. गुन्हा करतांना ते घाटा बांधतात व राख किंवा पिंवडी फांसतात. - गुन्हे:- खाऊन पिऊन सुखी असे बंजारे बहुधा गुन्हे करीत नाहींत. कर्नाटकांत राहणारे लंबाणी लोकांपासून फार प्रलय आहे. रस्त्यावर लूट व दरोडा, घरफोडी, झोंपड्यांवर दरोडा, ढोरें व शेळ्यामेंढ्या चोरणें, बेकायदा दारू गाळणें हे त्यांचे मुख्य गुन्हे होत. शिवाय ते पेवें फोड- तात, रात्रीं चालणाऱ्या किंवा उतरलेल्या गाड्यांत चोया करतात, चोरलेलीं ढोरें परत देण्याकरितां दस्तुरी उकळतात, कधीं कधीं मुलें चोरतात. गुजराथेंत राहणारे गोवारिआ हे बिनपरवाना अफू आणतात. 3<noinclude></noinclude> gtyc0vzgnakyiq32jfwqf8455ncusvq पान:गुन्हेगार जाती.pdf/१४ 104 70535 154994 2022-07-22T17:27:40Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "बंजारे. ५ गुन्ह्याची पद्वतः- ढोरवाड्यांतून किंवा मैदानांत चरणाऱ्या कळपां- तून ते ढोरें व मेंढया पळवितात, व शिंगें खुडून, कानांचा आकार बद- लून, आणि डागण्या देऊन चोरलेल्या जनावरांच..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>बंजारे. ५ गुन्ह्याची पद्वतः- ढोरवाड्यांतून किंवा मैदानांत चरणाऱ्या कळपां- तून ते ढोरें व मेंढया पळवितात, व शिंगें खुडून, कानांचा आकार बद- लून, आणि डागण्या देऊन चोरलेल्या जनावरांचें स्वरूप बदलतात. कधीं कधीं चोरीचों जनावरें ते आपले जनावरांत मिसळतात. एका गांवचीं दहापंधरा जनावरें एका वेळीं जातात, पण ते प्रत्येक जनावर निरनिराळ्या वाटेनें नेतात. त्यामुळें चोरीचा पत्ता लागत नाहीं. दोन प्रहरीं गुराखी जेवण्यास गुंतला असतां किंवा त्याला डुकली लागली असतां पटाईत बंजारा उघड्या मैदानांतून ढवळ्यादिवसां देखील जनावरें लांबवितो. तांडे बायकांच्या जिमतीला लावून गुरें चोरण्यासाठी बंजारे लांच लांब जातात, आणि चोरलेलों जनावरें आडरस्त्यानें तांडयांत आणून सोड- तात. कधीं कवीं चोरी वें ठिकाण व तांडा यांच्या दरम्यान लोक ठेवून दोघेजण जनावरें चोरतात व हातोहात लांबवितात; आणि पेंड पोंच- विला कीं, जो तो आडरस्त्यानें परततो. रात्रींच्या वेळीं बंजारे मेंढ्यांच्या कळपांत शिरून त्यांना विचकवितात, आणि त्या धांदलींत प्रत्येक एक एक में डरूं उबत वाडेस लागतो. मेंढक्या आडवा झाला तर ते त्याला ठोकतात, किंवा दगड मारतात. कोणी अडथळा केला ह्मणजे बंजा- ज्यांना सुमार रहात नाहीं, व मग ते खवळतात. ते तिथे किंवा चौधे बंजारे एकट्या दुकट्या गाडीवाल्याला रस्त्यावर अडवितात. त्यांच्या जमावापुढें गाडीवाल्यांचें चालेनासें झालें झणजे धान्य, रोकड अगर चीजवस्त लुटारूंच्या हवालीं करतात. बंजाऱ्यांचा जमाव मोठा असला तर ते गाड्यांची संबंद हार अडवि- तात, आणि सावकाश एक एक गाडी लुटतात. दिवसां चोरी करणें झाल्यास ते ती आडबाजूच्या किंवा डोंगरांतल्या रस्त्यावर करतात, म्हणजे निर्धास्त असतें. दरएक टोळीला नाईक असतो व त्याच्या हुकुमाप्रमाणें तिच्यांतले लोक बागतात. नायकाला कानडींत 'साल्या ' ह्मणतात. होरा पाहणें,<noinclude></noinclude> r954igx1tcz8q104hu9qthb89oabqep पान:गुन्हेगार जाती.pdf/१५ 104 70536 154995 2022-07-22T17:27:57Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "गुन्हेगार जाती. , देवदेव करणें वगैरेचा पूर्व खर्च तो करतो, आणि वीस किंवा अधिक साथी- दारांची टोळी बनवितो. कोठें डाका मारावयाचा ह्याची बातमी एक- जण टेहळणी करून काढतो. पण बहुधा ही खबर क..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>गुन्हेगार जाती. , देवदेव करणें वगैरेचा पूर्व खर्च तो करतो, आणि वीस किंवा अधिक साथी- दारांची टोळी बनवितो. कोठें डाका मारावयाचा ह्याची बातमी एक- जण टेहळणी करून काढतो. पण बहुधा ही खबर कलाल, स्थानिक मारवाडी किंवा बंजारे ह्यांच्याकडून मिळते. तसेंच गांवचे गुन्हेगारही बातमी देऊन टोळींत सामील होतात. बंजारे वाटेवरच्या झाडांच्या काठ्या काढून त्या, आणि गोफणगुंडे, कोयते, व कधीं कधीं मिळाल्यास तलवारी, बंदुकाही बरोबर नेतात. बंजाऱ्यांची डाका मारण्याची त इतर गुन्हेगारांहून भिन्न नाहीं. दरोड्याचे वेळीं पहिल्यानें ते दगडांचा वर्षाव करतात व गोफणगुंड्यांनीं आसपासचे रस्ते रोखतात. नंतर " दीन ! दीन ! " ह्मणत काठ्यांचा व दुसन्या हत्यारांचा सपाटा सुरू करतात. जवळ असल्यास, दहशत बसविण्यासाठीं तलवारी, बंदुकाही ते चालवितात. ते एकमेकांशी हिंदुस्थानींत बोलतात. पण बहुधा सांकेतिक अक्षरें उच्चारतात. माग चुकविण्यासाठीं ते परत जातांना टोळी फोडून आडरस्त्यानें जातात. तसेंच जावयाचें असेल पूर्वेस तर ते जातात पश्चिमेस; आणि ते वाटेनें फोल जिनसा फेंकीत जातात. दरोडा किंवा रस्तालूट झाल्यावर ते गुन्ह्याच्या ठिकाणापासून सुमारें एक मैलावर थोडावेळ मुक्काम करितात, लूट नीट तपासून घेतात, आणि मग तांड्याकडे वळतात. कधीं कधीं तांडा या गांवचा त्या गांवीं जात अस तांना बंजारे चोऱ्या, दरोडे मारतात. बैलावर सामानाच्या गोण्या घालून त्याबरोबर झातारे बायका पुरुष जातात; आणि धट्टेकट्टे संकेतस्थानीं जमून झपाट्यासरसा एखादा दरोडा घालून पुनः तांड्याला येऊन मिळतात. झुंझुरका सकाळीं राखणदार झोंपीं जातात. अशा वेळीं ते पिकाची किंवा खळ्याची चोरी करतात. कांहींजण राखणदारावर नजर ठेवितात किं वा वेळ पडल्यास त्याचा समाचार घेतात; आणि बाकीचे गोण्यांत किंवा. घोंगड्यांत धान्य भरून चालते होतात. उभी पिकें ते बहुधा रात्रीं चोर- तात. ते घरीं हुक्का व बाहेर चिलीम किंवा चुट्टा ओढतात. गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ ह्या जिनसा किंवा कवड्या, शंख, भिंगें लाविलेले पानसुपा-<noinclude></noinclude> l6tekmhi2cy9s1kkaj5zl1mwboz0nn7 पान:गुन्हेगार जाती.pdf/१६ 104 70537 154996 2022-07-22T17:28:35Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "बंजारे. रीचे बटवे दृष्टीस पडले ह्मणजे लंबाण्यांनी ( बंजाऱ्यांनी ) गुन्हा केला अर्से समजावें. क्वचित् प्रसंगी कैकाडी वगैरे जातीही असल्या जिनसा दुस- व्यावर संशय जावा ह्मणून मुद्दा..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>बंजारे. रीचे बटवे दृष्टीस पडले ह्मणजे लंबाण्यांनी ( बंजाऱ्यांनी ) गुन्हा केला अर्से समजावें. क्वचित् प्रसंगी कैकाडी वगैरे जातीही असल्या जिनसा दुस- व्यावर संशय जावा ह्मणून मुद्दाम तेथें ठेवितात. तसेंच लांबच्या तांड्यांनीं गुन्हा केला असल्यास गांवचे बंजारे फुटतात, मात्र तपासाचें काम जरा खुबीनें केलें पाहिजे. लंबाण्यांनी गुन्हा केला असे वाटल्यास तांड्याची हजिरी घ्यावी, आणि गैरहजर घायाळ इसमांबद्दल बारीक तपास करावा. दोन ते पांच गोवरिया बंजारे संस्थानांतून अफू आणण्यासाठीं सड- केनें किंवा रेल्वेनें जातात, आणि धोपट रस्त्याच्या जवळपासच्या आड- रस्त्यानें परत येतात. ते रात्रीं चालतात व दिवसां मुक्काम करून आस- पास अफू पुरतात. घरीं पोंचल्यावरही ते अफू पुरून ठेवतात आणि अफीमबाजांना किरकोळीनें विकतात. गुन्ह्यांची उपकरणें:- जबरीचे गुन्हे करण्याचे काम कोयते, काठ्या, गोफणगुंडे, सुऱ्या, भाले व मिळाल्यास बंदुका, तलवारी यांचा बंजारे उप- योग करतात. मुख्यत्वेंकरून कर्नाटकांत ते, लोकांस भिवविण्यासाठीं व आपण सशस्त्र आहों हे दाखविण्यासाठीं, कधीं कधीं आपटबार काढतात. - चोरीच्या मालाची निर्गतिः- रोकडशिवाय बाकीचा माल तां- ड्यांच्या नजीकचे नाले, जुन्या विहिरी, वगैरेमध्यें ते पुरतात. लागलीच विकला नाहीं तर ते धान्य व कापूस, गवत, पाला किंवा वळ्हयीखालीं दडवितात. कपड्यांचे कांठ काढून ते विकतात, आणि बिनकांठांच्या कडांना दुमट घालतात. कलाल, लिंगायत, मारवाडी, तांबट, गांवचे पाटील व सावकार ह्यांना ते चोरीचा माल विकतात. लहान डाग ते बायकांच्या कपड्यांत, निऱ्यांत अगर अन्न शिजविलेले भांड्यांत ठेवितात, किंवा गोण्यांत शिवतात. चोरीचे दागिने वांटून न घेतां ते त्यांचे टक्के करतात. साल्याला दोन हिस्से मिळतात. थापथुपीनें मालकीचे दाखले उप- टून बंजारे चोरीचीं जनावरें एकएक, दोनदोन लांबच्या बाजारांत अगर खाटकांना विकतात किंवा क्वचित् सांभाळण्यासाठीं स्नेह्याजवळही देतात.<noinclude></noinclude> tw1dfdxr6azarzgycik5nuj7jdck771 पान:गुन्हेगार जाती.pdf/१७ 104 70538 154997 2022-07-22T17:29:08Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "बेरड. संज्ञा :- ह्यांना बेडर, ब्याडेरू, तलवारू, नाइक्रमकळरू, काटक ( खाटिक, गळेकापू ) ह्मणतात. - वस्तिः - ह्यांची वस्ति बेळगांव, धारवाड, विजापूर व त्यांनजीकची संस्थानें आणि मद्रास इलाख्..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>बेरड. संज्ञा :- ह्यांना बेडर, ब्याडेरू, तलवारू, नाइक्रमकळरू, काटक ( खाटिक, गळेकापू ) ह्मणतात. - वस्तिः - ह्यांची वस्ति बेळगांव, धारवाड, विजापूर व त्यांनजीकची संस्थानें आणि मद्रास इलाख्यांतील कांहीं भाग येथें आहे. गुन्ह्यांचें क्षेत्रः- कर्नाटकांत आपले गांवापासून सुमारें चाळीस ते पन्नास मैल ते गुन्हे करतात. ही जात फिरस्ती नसून, ती खेड्यांत घरें- दारें करून राहिली आहे. लोकसंख्याः- ह्यांची लोकसंख्या सुमारें पावणेदोन लाख आहे. स्वरूप :- ह्यांचें खाणें व रहाणें गलिच्छ असतें. ते रामोशाप्रमाणें दिसतात. ते काळे, खाशा पीळदार व मजबूत बांध्याचे, सोशीक व जलद चालणारे असून त्यांचे डोळे व कान तिखट असतात. खडकाळ प्रदेशांत अंधाऱ्या रात्रीं तीस मैल ह्मणजे बेरडास कांहींच नाहीं. कुत्रे व भाले घेऊन रानडुकराची शिकार पायदळ करण्याचा त्यांना फार नाद असतो. ते जुव्वेबाज व दारूबाज असतात. पुरुषांचा पोषाख जाडेंभरडें पागोटें, पेहरण किंवा कुडतें, चोळणा, धोतर, किंवा लंगोटी हा होय. त्यांच्या हातांत आंगठ्या व कानांत बाळ्या असतात. त्यांच्या बायका पुरुषाप्रमाणें राकट असून चोळी लुगडें नेसतात, पण कासोटा घालीत नाहींत. त्या अंगावर कानडी पद्धतीची लेणीं घालतात. सन १८९५ सालीं बेरडांनी बेळगांव जिल्ह्यांत बंडावा माजविला होता. जरा गड- बड झाली कीं ते बिघडतात आणि पोलिसला न जुमानतां आसमंतात् उपद्रव देतात. त्यांचेवर नेहमीं पोलीसची नजर पाहिजे.<noinclude></noinclude> 5221bdxqx91kgajhlmrftqon3645rjj पान:गुन्हेगार जाती.pdf/१८ 104 70539 154998 2022-07-22T17:29:36Z QueerEcofeminist 918 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "बेरड. भाषा:- ह्यांची भाषा अशुद्ध कानडी आहे. महाराष्ट्राचे लगत्याला जे राहतात ते अशुद्ध मराठी किंवा हिंदुस्थानी बोलतात. बेळगांवनजीक ते वड्डरी बोलतात. सांकेतिक भाषा या लोकांत नाही..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>बेरड. भाषा:- ह्यांची भाषा अशुद्ध कानडी आहे. महाराष्ट्राचे लगत्याला जे राहतात ते अशुद्ध मराठी किंवा हिंदुस्थानी बोलतात. बेळगांवनजीक ते वड्डरी बोलतात. सांकेतिक भाषा या लोकांत नाहीं. उपजीविकेचीं दर्शनी साधनें:- ह्या जातीचे पुष्कळ लोक मेह- नती व इमानी आहेत. कांहीं थोडे जाहगिरदार, वतनदार व पाटील आहेत; आणि पुष्कळ सनदी ( गांवपोलीस ) जागले, शेतकरी, गुराखी, हमाल व गिरणींत मजूर आहेत. कांहीं गाडीवाले, लांकूडविके व पोलीस आहेत. कांहीं बेरडणी कसब करतात त्यांना 'जोक्तर' ह्मणतात. - वेषांतर:- ते आपणांला उंच जातीचे हिंदू, किंवा जनावरें विक ण्याचा धंदा करणारे ( हेडे ) ह्मणवितात. गुन्हा करतांना तोंडाला राख वगैरे फांसून ते डोक्यावर घोंगडी घेतात. गुन्हेः- ते मुख्यत: टोळी करून रस्तालूट, घरावर दरोडा, जनावरें, मेंढ्या चोरणें, पिकें चोरणें, घरफोडी व लहान चोऱ्या इत्यादि गुन्हे कर तात. जानेवारी ते मेपर्यंत ते बहुधा लहान अगर जबरीची चोरी, दरोडा, जनावरें चोरणें, वगैरे गुन्हे करितात; जून ते आक्टोबरपर्यंत घरफोड्या करतात, आणि नोव्हेंबर ते जानेवारी शेतकाम किंवा दुसरा इमानी रोजगार करतात. गुन्ह्याची पद्धतिः- मेंढवाड्यांतून किंवा जाळ्यांतून मेंढ्या चोरणें झाल्यास हातांत वाघनख घालून रानटी जनावराप्रमाणें आविर्भाव घालून ते कळपांत शिरतात. गोठ्यांतून चोरलेली जनावरें ते जंगलांत नेऊन बांधून ठेवितात. मालकानें अडत्यामार्फत निमीशिमी किंमत दिली तर त्यांना ते एखाद्या नेमल्या जागी नेऊन सोडतात अगर कोंडवाड्यांत घाल- तात, व तेथें फी भरून मालक त्यांना सोडवितो. पोलीसकडे फिर्याद वगैरे देण्याचा मालकाचा झोंक दिसला तर जनावरें मारून टाकतात; किंवा त्यांचे शिंगांचा आकार बदलून एकएक दोनदोन लांबच्या बाजारांत किंवा यात्रेंत विकतात.<noinclude></noinclude> mqb2wig2bjb1vjmssb5gktp9xh1habw पान:मनतरंग.pdf/१२६ 104 70540 154999 2022-07-23T06:19:33Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = मनतरंग.pdf |Page = 126 |bSize = 392 |cWidth = 237 |cHeight = 215 |oTop = 32 |oLeft = 56 |Location = center |Description = }} {{gap}}त्या दिवशी रात्री अलकॉम (अल्टर्नेट कम्युनिकेशन्स फोरम) आणि माध्यम या स्वयंसेवी संस्थांनी तयार केलेला, 'इलयुम मल्लम' हा चित्रपट छोट्या पडद्यावर पाहण्याचा योग आला. या दोनही संस्था, कम्युनिकेशनच्या... संवादाच्या विविध माध्यमातून परिवर्तनाचा विचार सर्वांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत असतात. या शब्दाचा अर्थ आहे, पाने आणि काटे. पाने काट्यावर पडली काय किंवा काटे पानांवर पडले काय, परिणाम एकच फाटतात पानेच!! काट्यांना काय त्याचे?<br>{{gap}}पल्लवी जोशीची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात चार मैत्रिणींची कथा आहे. शांता, पार्वती, लक्ष्मी आणि श्रीदेवी या त्या छोट्याशा गावातल्या चार मुली. हातमागाच्या कारखान्यात रोजंदारीवर जाणाऱ्या, कारखान्यात जाताना... येताना चौघीही बरोबर असत. एक तीळ चारजणीत वाटून खाणाऱ्या. अगदी जीवश्च कंठश्च मैत्रिणी. त्यांनी नुकतेच बालपण ओलांडले आहे. नव्या वयासोबत स्वप्नांचे झुले डोळ्यात झुलू लागतात. मनही चंचल बनते. मनात नवे विचार नवे अनुभव, नवे प्रश्न यांचे तरंग उठू लागले आहेत. घरातून-समाजातून सतत सांगितले जाते की मुलींनी मान खाली घालून<noinclude>{{rh|मनतरंग / ११८ ||}}</noinclude> q2nnt9m1d7p8ote4fnraggaz9hz41oa पान:मनतरंग.pdf/१२७ 104 70541 155000 2022-07-23T06:22:34Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>चालावे. स्त्रिया सोशीक असतील तरच घर सुखी राहते. थोडे फार शिकलेल्या, घाम गाळून घरासाठी पैसे मिळविणाऱ्या या पोरींना ही शिकवण बोचत राहते. आम्ही पुरुषांइतकेच कष्ट करतो. घरासाठी चार पैसे मिळवतो. मग आम्ही मार का खायचा? अपमान का सोसायचा? रोज दारू पिऊन येणाऱ्या व मुलांदेखत त्यांच्या आईला गुरासारखे बडवणाऱ्या बापाला शांता.. पल्लवी अडवते आणि चार शब्द सुनावते. त्या क्षणी बापाच्या नजरेत उमटलेला संताप, तुच्छता तिला अस्वस्थ करते. या काळात त्यांच्यातली पार्वती हिचा विवाह होतो. मधुर स्वप्नांचे नाचरे सूर ओंजळीत घेऊन पार्वती सासरी जाते. हुंड्यातील न दिलेल्या रकमेसाठी तिचा सतत छळ होतो. बापाकडे पैसा नाही. सासरी मार आणि उपासमारीचा मारा. अवखळ, गोड, गुणगुणत चालणारी पार्वती, या त्रासाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेते. तिच्या या अघोरी मृत्यूची जखम शांताचे मन सोलून काढते. आता फक्त तिघी मैत्रिणी उरतात. रानातील एकाकी रस्ता या सैरभैर मुलींना बोचू लागतो. त्यांच्यातला मनमोकळेपणा हरवून जातो. गावातल्या तरूण टवाळांचे टोळके कायम झाडाखाली पत्ते खेळत, बिड्या ओढत बसलेले असते. या बेकार पोरांचा उद्योग एकच, स्त्रियांची छेड काढणे. त्या टोळक्याचा म्होरक्या या मैत्रिणींची उद्धटपणे छेड काढतो. शांता खाड्कन् त्याच्या थोबाडीत मारते. एका मुलीने, भर रस्त्यात, मित्रांसमोर केलेल्या अपमानाने उखडलेला तो 'दादा' मित्रांना हाताशी धरून एक दिवस कामावर चाललेल्या शांताच्या व मैत्रिणींच्या अंगावर दारूची बाटली रिकामी करतो आणि गावात अफवा उठवतो की या तिघी दारू पितात, आणि त्यांचे पुरुषांशी संबंध आहेत. या मुलींची निरागसता जाणणारा, त्यांना मदत करणारा नावाडी या अफवेला बळी पडतो. त्या संध्याकाळी या मैत्रिणींना पल्याड पोचवताना त्यालाही दारूचा वास आलेला असतो. पाण्याने अंग धुतले तरी कपड्यांचा वास कसा जाणार ? घर, गाव समाज... या सर्वांपासून एकाकी पडलेल्या तिघी निराशेने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात, शांता, लक्ष्मी कधीच परत न येण्यासाठी समुद्रात शिरतात पण श्रीदेवीला मात्र धीर होत नाही. या दोघींचे निरागस, निष्प्राण देह पाहून गाव जागे होते. श्रीदेवी धाई धाई रडून सर्वांसमोर सत्य ठेवते. गाव पस्तावते. शांता-लक्ष्मीच्या मृत्यूनंतर गावाला मुलींच्या कोवळ्या आणि निरपराधी तना-मनाची साक्ष पटते.<br><noinclude>{{Right|गोरे पान उरी केळीचे फाटते.../ ११९}}</noinclude> 2e8ljkx9d8hfrs0ibv4iwy6as6yn4zt पान:मनतरंग.pdf/१२८ 104 70542 155001 2022-07-23T06:24:32Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}त्या बेशरम टोळक्याच्या म्होरक्याची पत्नी आपल्या अपराधी नवऱ्याला घरात घेत नाही. एवढेच नाही तर वैधव्याचे कपडे घालून, ज्या हातमाग कारखान्यात या मैत्रिणी जात असत तिथे जाते. आता त्या ठिकाणी असते फक्त श्रीदेवी, एकटी... हरवलेली. पण ही नवी मैत्रीण मिळाल्यावर तिला भास होतो की शान्ता, पार्वती, लक्ष्मी नव्या रूपात, नव्या जोमाने नवे धाडस घेऊन परतल्या आहेत.<br>{{gap}}ही कथा मातृसत्ताक जीवनव्यवस्थेच्या खुणा आजही ज्या प्रांतात आढळतात त्या केरळातली आहे. मग इतर भागातील स्त्रियांच्या अनुभवाबद्दल काय बोलावे?<br>{{gap}}तो चित्रपट पाहताना, चित्रपटाचे नाव वाचून आठवत होती, कवी कांतांची कविता - {{center|<poem>"गोरे पान उरी केळीचे फाटते...."</poem>}}<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / १२० ||}}</noinclude> 79o928tsl75ojafdungigaphxbxphcz पान:मनतरंग.pdf/१२९ 104 70543 155002 2022-07-23T06:27:39Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = मनतरंग.pdf |Page = 129 |bSize = 395 |cWidth = 279 |cHeight = 210 |oTop = 42 |oLeft = 45 |Location = left |Description = }}  {{gap}}२७ जानेवारी १९९५ ची संध्याकाळ. आजही आठवत राहणारी. महिलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी बंगलोरमध्ये परिषद भरली होती. अनेक व्यक्ती आपल्याला शब्दांच्या, चित्रांच्या, गीतांच्या... माध्यामातून भेटत राहतात. पण त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा... पाहण्याचा... ऐकण्याचा सुनहरी योग आला की मन अगदी तृप्त होते. {{Block center|<poem>"तू खुदको बदल, तू खुदको बदल तबही तो जमाना बदलेगा तू बोलेगी पूँह खोलेगी तबहीं तो जमाना बदलेना"</poem>}}{{gap}}असे भारतीय स्त्रियांना बजावणारी कमला भसीन गाण्यातून भेटली होती. भारतीय नागरिकाला, {{Block center|<poem>"जिस देश में औरत अपमानित और नाशाद है। दिलपे रखकर हात कहिये क्या देश वो आझाद है ?"</poem>}}<noinclude>{{Right|पंजाबी 'त्रिंजन' मराठी अंगणा' तही येईल! / १२१}}</noinclude> tgls7eel64tfmt5vzydsoi67qyqzwjd 155003 155002 2022-07-23T06:28:10Z अश्विनीलेले 3813 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = मनतरंग.pdf |Page = 129 |bSize = 395 |cWidth = 279 |cHeight = 210 |oTop = 42 |oLeft = 45 |Location = center |Description = }}  {{gap}}२७ जानेवारी १९९५ ची संध्याकाळ. आजही आठवत राहणारी. महिलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी बंगलोरमध्ये परिषद भरली होती. अनेक व्यक्ती आपल्याला शब्दांच्या, चित्रांच्या, गीतांच्या... माध्यामातून भेटत राहतात. पण त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा... पाहण्याचा... ऐकण्याचा सुनहरी योग आला की मन अगदी तृप्त होते. {{Block center|<poem>"तू खुदको बदल, तू खुदको बदल तबही तो जमाना बदलेगा तू बोलेगी पूँह खोलेगी तबहीं तो जमाना बदलेना"</poem>}}{{gap}}असे भारतीय स्त्रियांना बजावणारी कमला भसीन गाण्यातून भेटली होती. भारतीय नागरिकाला, {{Block center|<poem>"जिस देश में औरत अपमानित और नाशाद है। दिलपे रखकर हात कहिये क्या देश वो आझाद है ?"</poem>}}<noinclude>{{Right|पंजाबी 'त्रिंजन' मराठी अंगणा' तही येईल! / १२१}}</noinclude> ldib2victaz69x9u2jr9jhfybmbb66x पान:मनतरंग.pdf/१३० 104 70544 155004 2022-07-23T06:31:32Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}असा भेदक सवाल विचारणारी कमला त्या दिवशी प्रत्यक्ष समोर होती. नाजूक तरीही कणखर. लयीत पावलं टाकीत साभिनय गाणारी कमला बोलताना, शब्दांतून व्यक्त होणाऱ्या अनुभवात श्रोत्यांना बांधून टाकणारी कमला मनात ठसली. ती मनातलं दु:ख बोलत होती... ४७ वर्षांपूर्वी माझ्या पंजाबच्या शरीरावर दोन देशांची दारे खोदली गेली. धर्माच्या नावाने भावा-बहिणींची... एकमेकांवर प्रेम करणाऱ्या शेजाऱ्यांची ताटातूट झाली. आम्हा पंजाबींचे जणू जीवनच लुटले गेले. पंजाबी स्त्रिया दिवसभर शेतात राबत. सायंकाळी मात्र एकीच्या अंगणात साऱ्याजणी जमत. त्यांत धर्म कधी आडवा आला नाही. येताना सोबत आणत शेतातील कापूस आणि टकळी, शिवाय सायंकाळची रोटी. या एकत्र जमण्याला म्हणतात त्रिंजन. मध्ये एकमेकींच्या आनंदाची, दु:खाची, अडचणींची देवाण घेवाण होई. सासू, सुना, नणंदा, भावजया, जावा... अशी सारी नाती एकत्र येत. अडचणीतून मार्ग निघे. कधी कधी ढोलकच्या तालावर, गाण्यांनी अंगण जागते होई. त्याला पावलांची साक्ष मिळे. लेकी-सुनांच्या सवालजबाबांनी 'त्रिंजन' दणाणून जाई. या 'त्रिंजन संगमात' पुरुषांना प्रवेश नसे. ते त्रिंजन आपण महिलांनी पुन्हा एकदा सुरू करायला हवे. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या जीवनाचे सूत तलम निघावे, त्यात गाठी नकोत, ते सपोत असावे यासाठी आपण हा प्रयत्न करायला हवाच. जीवनात कितीतरी सरहद्दी आहेत ! जातीच्या, भाषेच्या, प्रांतांच्या, धर्माच्या लिंगभेदाच्या... अनेक अनेक. या त्रिजनसंगमातून आपण स्त्रिया एकमेकांना साधणारी खिडकी नाही का बनू शकणार ? {{Block center|<poem>"मै सरहदपे खडी दीवार नही हूँ मै तो हूँ दीवार की दरार, सब का स्वागत करनेवाली ।"</poem>}}मनाची खिडकी सहजपणे उघडून गेलेली कमला कायम आठवत राहते.<br>{{gap}}या कार्यशाळेत जकार्ताच्या सुप्रहाती आणि ताती कृष्णवती या मुस्लिम महिलांनी आपल्या देशातील स्त्रियांचे प्रश्न मांडले. आहे ना मजा ? सुप्रहाती - सुप्रभाती कृष्णवती संस्कृत शब्दाशी, भारतीय भाषांशी नाते सांगणारी नावे आणि त्यांचा देश इंडोनेशिया. स्थलांतरचा लोभ दाखवून अशियातील तरुण स्त्रियांना फसवणाऱ्या अनेक एजन्सीज आहेत. आपल्या घराला दोन वेळच्या रोटीसाठी<noinclude>{{rh|मनतरंग / १२२ ||}}</noinclude> 8ekin046m41rcffnyc88wdcm6z2otow पान:मनतरंग.pdf/१३१ 104 70545 155005 2022-07-23T06:33:26Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>वा भावंडाच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या देहाचे हाल करीत पैसा पुरविणारी स्त्री, स्वत:च्या शब्दांत दुःख सांगू लागते तेव्हा काळही गोठून जातो. ती मैत्रीण सांगत होती-ज्या स्त्रिया निघृण प्रकारांना विरोध करतात, अशांच्या नावांची काळी यादी हाँगकाँगमध्ये तयार केली जाते. त्या यादीतील महिलांना नोकरीच्या बाबतीत मदत करण्यात येत नाही. ती मैत्रीण विचारीत होती, घरकाम, मुलांना साभाळणे, वृद्धांची सेवा करणे अशा कामांच्या नावाने परदेशात नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या, नकार दिल्यास बेदम मारणाऱ्या मालकांची काळी यादी कोण तयार करणार ?<br>{{gap}}हे सारेच प्रश्न मन उसवणारे आहेत आणि त्यासाठी स्त्रियांनी एकत्र येऊन 'त्रिंजन' भरवायला हवे. ज्यात मोकळेपणाने प्रश्न मांडता येतील. दु:ख मोकळे करता येईल. तिथे येणाऱ्या स्त्रिया नसतील सासवा, सुना... जावा... नणंदा. त्या असतील एकमेकींना साक्ष देणाऱ्या, एकमेकींना दिलासा देणाऱ्या, विश्वास... शक्ती देणाऱ्या मैत्रिणी. हे पंजाबी 'त्रिंजन' मराठी अंगणातही भरवता येईल की!!<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|पंजाबी 'त्रिंजन' मराठी अंगणा' तही येईल! / १२३}}</noinclude> fukf8pksg2hli5azzf8jdctjmhpnrw7 पान:मनतरंग.pdf/१३२ 104 70546 155006 2022-07-23T06:36:13Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = मनतरंग.pdf |Page = 132 |bSize = 396 |cWidth = 263 |cHeight = 224 |oTop = 27 |oLeft = 72 |Location = center |Description = }}  {{gap}}अकाली वठलेल्या जुईसारखी ती समोर उभी होती. करपलेला सावळा रंग निस्तेज झालेला. उद्ध्वस्त डोळे, कपाळाला टिकली नाही. मळखाऊ रंगाच्या साडीचा दोन्ही खांद्यांवरून घेतलेला... जणू काहीतरी झाकण्यासाठी अंग भरून घेतलेला पदर. जमिनीत शिरणारी नजर.<br>{{gap}}"ताई ओळखलंत का ? ही नमिता आहे" तिच्या आईने मला प्रश्न केला.<br>{{gap}}"ओळख कशी विसरीन ? पण हिचं लग्न केलंत? आणि हे असं कधी घडलं?"<br>{{gap}}गेल्याच वर्षी महाविद्यालयातून खेळात, नाटकात, वक्तृत्व स्पर्धेत भरपूर बक्षीसं पटकावणारी आणि विद्यापीठाच्या परीक्षेत आमच्या महाविद्यालयातून पहिली येणारी नमिताच ना ही ? "शिक्षण अर्ध्यातनं सोडून का केलंत लग्न ? यंदा बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला असती ही!" माझ्या प्रश्नाच्या भडिमाराने तिची आई गांगरून गेली. हे प्रश्न माझ्या तोंडूनही आपोआप सुटलेले होते.<br>{{gap}}...मला क्षणभर आठवली दोन वर्षांपूर्वीची नमिता. तजेल तुळशीच्या झाडासारखा सावळा रंग. विलक्षण बोलके, तेजस्वी डोळे. महिरपदार ओठ, दाट<noinclude>{{rh|मनतरंग / १२४ ||}}</noinclude> 801ww80koct0sqaysnk157o8o08qt99 पान:मनतरंग.pdf/१३३ 104 70547 155007 2022-07-23T06:38:56Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>केसांची पाठीच्या खालपर्यंत झुलणारी वेणी. एन.सी.सी त चमकणारी, स्नेहसंमेलन गाजवणारी ती नमिता आणि माझ्या समोरची, विशीच्या आत वैधव्याच्या शापाने निस्तेज झालेली नमिता.<br>{{gap}}मी तिला आणि तिच्या आईला बसायला सांगितले. तिच्या आईला शांत होऊन नीटपणे काय ते सांगण्याची विनंती केली. प्रत्येक शब्द उच्चारताना त्यांचा ऊर भरून येत होता. एक वाक्य धड बोलणे शक्य नव्हते. नमिता मात्र गोठलेल्या बर्फासारखी बसून होती.<br>{{gap}}...गावातील एका बँकेच्या अधिकाऱ्याने नमिताला वक्तृत्व स्पर्धेत बोलताना पाहिले होते. धडाडीने बोलणारी, स्वच्छ आणि नेमक्या शब्दांत आपला विषय मांडणारी ही तरतरीत मुलगी कोण ? त्याने सहज चौकशी केली. आणि ती त्याच्या जातीतली निघाली. एक तर ही जात महाराष्ट्रात क्वचितच आढळणारी. त्यातून शिकलेल्या मुली शोधून मिळणे कठीण. या अधिकाऱ्याचा धाकटा भाऊ पुण्यातील एका कारखान्यात कामाला होता. इंजिनियरिंगचा डिप्लोमा झालेला असल्याने पगारही भरपूर होता. घरातला धाकटा मुलगा म्हणून लाडावलेला. आपल्या भावासाठी ही मुलगी योग्य नव्हे तर अतियोग्य आहे हे पाहून त्याने नमिताच्या वडिलांच्या घरी घिरट्या घालायला सुरुवात केली. तिचे वडील सरकारी शाळेत चपराशी म्हणून काम करणारे. लग्नासाठी जवळ पैसा तर हवा ना ? त्यामुळे त्यांनी नकार दिला. परंतु हुंडा न देता, चार पैसे खर्च न होता लेकीचे लग्न होतेय म्हटल्यावर त्यांनीही होकार दिला आणि महाविद्यालयाची दुसऱ्या वर्षाची पायरी न चढताच नमिता बोहोल्यावर चढली.<br>{{gap}}पहिले चार महिने बरे गेले. परंतु नवऱ्याला रात्री खोकला येत असे, भूक लागत नसे. पण 'दुसरी भूक' मात्र आवरत नसे. दोन दिवसांचे माहेरपणही कधी मिळाले नाही. खोकल्याबरोबर तापही येऊ लागला आणि डॉक्टरांनी निदान केले की नवऱ्याला एड्सची लागण झाली असून केस अखेरच्या टप्प्यावर आहे. विवाहानंतर अवघ्या चौदा महिन्यात नमिता वैधव्याचा कोरा पट्टा घेऊन माहेरी आली. एन.सी.सी च्या शिबिरात, महाविद्यालयात एड्स या महाभयानक रोगाबद्दल नमिताने ऐकले, वाचले होते आणि म्हणूनच तिने माहेरी आल्यावर आईजवळ आग्रह धरला की तिचीही एच.आय.व्ही. टेस्ट करावी. वडिलांना कसलीही कल्पना न देता मायलेकींनी पॅथॉलॉजिस्टकडून शरीरविकृती प्रयोगशाळेतून तपासणी<noinclude>{{Right|उत्तराच्या शोधातले प्रश्न / १२५}}</noinclude> n59tthix5cmvvyga2jjpiodwpovr1yw पान:मनतरंग.pdf/१३४ 104 70548 155008 2022-07-23T06:41:34Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>करवून घेतली. तपासणीचा निकाल सकारात्मक होता. कोणताही अपराध नसताना, कोणतीही चूक नसताना एका निष्पाप... निरागस मुलीच्या शरीरात नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणातून 'एच.आय.व्ही' विषाणू शिरले होते.<br>{{gap}}नमिताच्या मनात एकच विचार होता आत्मघाताचा. या विचाराची चाहूल लागल्यामुळे आई बावरून गेली होती. वडिलांच्या कानांवर ही गोष्ट जाताच ते नमिताच्या वडील दिराचा खून करण्याची भाषा दारूच्या नशेत बोलू लागले. दारूचे व्यसन अधिक वाढले. धाकटा भाऊ बी.एस्सी.च्या शेवटच्या वर्गात होता. त्याला भीती वाटते आहे की, बहिणीचा रोग आजूबाजूच्या लोकांना कळला तर लोक आपल्याला बाजूला टाकतील. समाजात बदनामी होईल. लग्न झालेल्या मोठ्या दोघी बहिणींना या बाबतीत एक अक्षरही कळता कामा नाही. असा धाक त्याने सर्वांना घातला आहे. नमिताला तात्काळ लांबच्या महिलाश्रमात ठेवावे. तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या विमापॉलिसीचे पैसे बँकेत ठेवून येणाऱ्या व्याजात तिची सोय करावी आणि भविष्यात त्यानेही त्यात पैशाची भर टाकून हा प्रश्न कायमचा सोडवावा. पण नमिताला तात्काळ इथून दूर... दूर पाठवावे हा त्याचा हेका.<br>{{gap}}...हे सारे प्रश्न घेऊन अकाली वठलेल्या जुईवेलीसारखी नमिता आणि तिची आई माझ्यासमोर उभ्या आहेत. उत्तर शोधण्यासाठी माझ्यासमोरच नव्हे तर समाजासमोर... संस्कृतीसमोर उभ्या आहेत. उत्तर शोधण्यासाठी मदत करणार आहोत ना आम्ही ? आज एक नमिता समोर आहे पण गावागावांतील अशा नमितांची संख्या वाढतेय याचे भान ठेवणार आहोत का आम्ही ?<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / १२६ ||}}</noinclude> grwz5z5xjuu64d9c00xd7jftipblgsp पान:मनतरंग.pdf/१३५ 104 70549 155009 2022-07-23T06:44:15Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = मनतरंग.pdf |Page = 135 |bSize = 398 |cWidth = 279 |cHeight = 213 |oTop = 35 |oLeft = 50 |Location = center |Description = }}  {{gap}}बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातला 'जागतिक चषक-वर्ल्डकप' स्पर्धेचा सामना रंगात आलेला. नव्यानेच या क्षेत्रात प्रवेश करणारा बांगलादेशसारखा संघ, पाकिस्तानसारख्या बलदंड संघाला जेरीस आणतोय हे पाहून प्रेक्षकांना स्फुरण चढलेले. एकजण, टी.व्ही. पाहणाऱ्याला ओरडला.<br>{{gap}}"अरे, जरा कारगिलकी न्युज भी देखो. झी न्यूज लावा. बघा कारगिलला काय चाललं ते !"<br>{{gap}}"यार पाकिस्तानको भी अभीच टाईम मिला क्या ? बघ बाबा घुसखोर कारगिलमध्ये किती आत घुसले ते ?" दुसरा पुष्टी देतो, "फर्नाडिसबाबाला कोणता डास चावला रे ? आपण तर यार त्यावर लई खूश होतो. पण अशात काहीही उलटसुलटं बोलायला लागलेत हे फादर !" तिसऱ्याची टिप्पणी. गेल्या पंधरा दिवसांपासून टी.व्ही. वर क्रिकेट...द्रविड...सचिन...गांगुली यांची चलती आहे.<br>{{gap}}तरुणपिढीचे हे संवाद ऐकताना माझे मन थेट सदतीस वर्षे मागे गेले. माझ्या पिढीने तरुणाईत पाऊल नुकतेच रोवलेले होते. आपला देश, राष्ट्र, संस्कृती यांच्याबद्दलच्या भावना अतिशय तजेल, संवदेनशील होत्या. स्वातंत्र्यानंतर<noinclude>{{Right|हर वीर था भारतवासी!/१२७}}</noinclude> jucclwsn43gvegp2od5n08wpkuffh90 पान:मनतरंग.pdf/१३६ 104 70550 155010 2022-07-23T06:47:07Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>भवतालच्या आशियाई राष्ट्रांशी दोस्ती करण्याची भूमिका भारताने घेतली होती. 'हिंदी चिनी भाई भाईचे' स्वर आसमंतात घुमताहेत तोवरच चीनने हिमालयावर स्वारी करून भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. हिमालयाच्या सीमेवर चीनने सैन्य आणून उभे केले. आत घुसखोरी करून रस्ता बांधला. तेव्हाचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना लोकक्षोभाला समोरे जावे लागले. आम्हां भारतीयांचा युद्धाचा पहिलाच अनुभव...सैन्याजवळ ना गरम कपडे, खाण्यापिण्याची रसद. अनुभव नवा. पण अत्यंत हलाखीच्या अवस्थेतही आमचे जवान ध्येयधुंद होऊन लढले. या जवानांना भारतीय जनतेनं अपरंपार नैतिक बळ दिले. पंडित नेहरूंच्या उपस्थितीत गायलेले लताजीचे गीत... {{center|<poem>"ऐ मेरे वतनके लोगो जरा आँखोंमे भर लो पानी..."</poem>}}आजही या गाण्यातले शब्द...स्वर मन थरारून टाकतात.<br>{{gap}}मात्र त्या काळातला एक अनुभव नेहमी स्मरतो. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आक्रमणाची हवा पोहचवावी या हेतूने भारलेले आम्ही काहीजण ग्रामीण भागात भारताचा नकाशा घेऊन हिंडत होतो. आम्ही राष्ट्र सेवा दलाचे ६-७ जण. माझं नुकतंच लग्न झालेलं. त्यातून जातीबाहेरचे लग्न. उत्सुकतेपोटी बैठकींना भरपूर बायका-पुरुष येत. 'चिनी आक्रमणाचा फार्स' त्यावेळी रामभाऊ नगरकर आणि दादा कोंडके सादर करीत. त्यातील काही गाणी आधाराला घेऊन आम्ही अभिनयासह भाषणाद्वारे हा विषय लोकांपर्यंत नेत होतो.<br>{{gap}}एका खेड्यात मला मध्येच अडवीत एका आजींनी प्रश्न केला. "अगं सुने, आताच लगीन झालंया, तुझां वानीकिनीचा संवसार करायचा सोडून भटकभवानीसारखी कशापायी हिंडतीस गं ? हिमालयामंदी लढाया जायची गरजच काय ? आमचा संकरबाप्पा आनि त्याचे नंदी. भैरवगण समदे हायेत ना तिथं. तो चिनी की फिनी कवाच खल्लास करून टाकला असल त्यांन...बोल, काय हाय तुझं म्हणनं ?" आजींच्या प्रश्नाला होतं का माझ्याजवळ उत्तर ? १९६५ मध्ये पाकने आमच्यावर युद्ध लादले. १९६४ मध्ये पं.नेहरू स्वर्गवासी झाले आणि पाकिस्तानाने युद्धाचा डाव टाकला. 'जय जवान, जय किसान' ही पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी दिलेली घोषणा प्रत्येक भारतीयाने हृदयात झेललीही. लहानथोरांनी शुक्रवारी भात खाणे सोडले. आमच्या जवानांनी थेट लाहोरपर्यंत<noinclude>{{rh|मनतरंग / १२८ ||}}</noinclude> i1g5va3v838djs24ema842ag1mtyq7o पान:मनतरंग.pdf/१३७ 104 70551 155011 2022-07-23T06:49:48Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>रणगाडे भिडवले. भारतीय संस्कृतीचा गाभा माणुसकीचा आहे. आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून आम्ही, पुनश्च आमच्या सीमेवर परतलो. पण या युद्धात एक नीतिमान, अत्यंत सुजाण पंतप्रधान गमवावे लागले.<br>{{gap}}त्यानंतर अवघ्या सहा वर्षात पाकने बांगला देशवर चढाई केली. ती तर आम्ही सहजपणाने परतवून लावली. भारताच्या रणवीरांनी बांगलादेश स्वतंत्र केला. पण बाहेरच्या राष्ट्रांनी आमची सीमा नेहमीच धगधगती ठेवली. कधी शिखिस्तानला उचलून धरून तर कधी श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांना घुसवून. आज सुमारे २८ वर्षानंतर, भारतातील लोकशाहीवादी सरकार अवघ्या एका मताने पडल्याचा आणि भारतीय पंतप्रधान या मातीतून उगवलेला असावा की परकीय असावा या राजकीय वादाचा फायदा घेऊन, पाकने हजारो भाडोत्री आणि काही घरातले घुसखोर कारगिल, पूंछ, द्रास सीमेवरून भारतात घुसवले. १९६२, १९६५, १९७१ साली भारताच्या विशाल एकात्म मनाने नैतिक बळ जवानांना दिले होते.<br>{{gap}}धारातीर्थी पडलेल्या जवानांची अर्थी... त्यांच्या पत्नीचे भकास डोळे... आईवडिलांचे दुर्दम्य मनोबल टी.व्ही. वरून पाहात असताना पुन्हा मनात ओळी उगवतात... {{Block center|<poem>"कोई शीख कोई जाट मराठा कोई बंगाली कोई मद्रासी सरहदपे मरनेवाला हर वीर था भारतवासी..."</poem>}}<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{Right|हर वीर था भारतवासी!/१२९}}</noinclude> 96tamem5wag22ts6xm462fex8zokxqk पान:मनतरंग.pdf/१३८ 104 70552 155012 2022-07-23T06:52:28Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = मनतरंग.pdf |Page = 138 |bSize = 399 |cWidth = 287 |cHeight = 210 |oTop = 36 |oLeft = 53 |Location = center |Description = }} {{gap}}सौरव...मनोज...अजय...नचिकेत असे अनेक. कुणाचे वय पंचवीस तर कुणी सत्तावीस, कुणी नुकतीच पस्तिशी ओलांडलेला. कावऱ्या बावऱ्या नजरेने त्या लाकडी पेटीकडे, फुलांच्या चक्राने सजलेल्या लाकडी पेटीकडे पाहणारी पाच सात वर्षांची चिमुकली मुले. त्यांना घट्ट पकडून उभ्या असलेल्या कोऱ्या कपाळाच्या तरुण सौभाग्यवती. रडता रडता मुलाच्या मृत्यूने उद्ध्वस्त झालेले मन मोकळं करणाऱ्या आया...<br>{{gap}}हे सारे दूरदर्शवरून पाहताना डोळे भरून येतात, रक्ताच्या ज्वाला होऊन उसळू लागतात. १७ हजार फूट उंचीवर बर्फाच्या माऱ्यात, भूक...भावना लाथाडून कारगिल खोऱ्यात घुसलेल्या घुसखोरांना हुसकावून भारताच्या हद्दीबाहेर घालवण्यासाठी सर्वस्व समर्पून लढणाऱ्या तरुण भारतीय रणवीरांच्या पाठीवरून मायेचा हात फिरविण्यासाठी, मन धावू लागतं. भारतातील, स्त्रिया 'विदुला' आहेत. विदुला... रणांगणातून पळून आलेल्या मुलाला...संजयला मृत्यूला कवटाळण्यासाठी धाडस देऊन परत पाठवणारी आई. पण काळाबरोबर आम्हीही बदललो आहोत. जोहार करणाऱ्या स्त्रियांपेक्षा प्रत्यक्ष रणभूमीवर जाण्यासाठी सिद्ध असलेल्या तरुणी आज तयार आहेत. पूर्व वैदिक काळात विश्पला ही<noinclude>{{rh|मनतरंग / १३० ||}}</noinclude> tlvb4mosa6bb93ckzlfe02esgr4lcou पान:मनतरंग.pdf/१३९ 104 70553 155013 2022-07-23T06:55:44Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>अत्यंत कुशल अशी सैन्याधिकारी होऊन गेली. झाशीची राणी, रझिया सुलताना, अहिल्यादेवी या तर अगदी अलीकडच्या वीरांगना. महात्मा गांधींच्या अहिंसामय लढाईत एक लाख स्त्रिया गजाआड गेल्या. आजही पतीच्या समर्पणानंतर अत्यंत धैर्याने, गर्वाने, आईवडील या दोहोंचे प्रेम, मुलांना देणाऱ्या वीरपत्नी काय कमी आहेत ? पण तरीही...<br>{{gap}}पण तरीही. शौर्याने सकटांना समोरे जाणाऱ्यांची, मग त्या स्त्रिया असोत वा पुरुष...परंपराच कुठेतरी खंडित झाली आहे. 'हे हवे ते हवे, दिसेल ते माझ्या कवेत हवे' ही भोगवादी वृत्ती क्षणोक्षणी वाढते आहे. समोर वर्तमानपत्र आहे. त्यात कर्जाच्या काटेरी जाळ्यात आकंठ अडकलेल्या एका सुखवस्तू (?) घरातील तरुण माणसाने आपल्या दोन चिमुकल्यांचे गळे कापून आणि पत्नीला आढ्याला टांगून खून केल्यानंतर, स्वत:लाही पंख्याला टांगून घेतल्याची बातमी पहिल्या पानावर, ठळक अक्षरात आली आहे. स्वत:च्या 'कर्तुकी' ची शिक्षा स्वत:च्या तरुण पत्नीला ? दोन निष्पाप मुलांना ? इथेही हे माझे. माझ्या असण्याशी त्यांचे असणे बांधलेले. मी नष्ट होण्यापूर्वी त्यांच्या असण्याचे दोर कापून मग स्वत: संपायचे ही वृत्ती दिसते.<br>{{gap}}अशा वेळी आठवतात चायनात ठिकठिकाणी वेळोवेळी भेटलेली तरुण मुलं आणि मुली. चेहऱ्यावर मंद आणि काहीसं गोठलेलं हसू. डोळ्यात खूप उत्सुकता. पण ती पापण्यात बंदिस्त झालेली. १९९५ च्या बीजिंग महिला परिषदेतील सुमारे ३६ हजार महिलांना मदत करण्यासाठी ही मुले तत्परतेने पुढे येत. परिसरातल्या रस्त्यांची सफाई असो, केराच्या प्रचंड टोपल्या उचलण्याचे काम असो, सर्व सार्वजनिक कामे ही मुले करीत.<br>{{gap}}एका रंगाच्या पोषाखातल्या या चटपटीत पोरी-पोरांबद्दल मनात खूप उत्सुकता होती. तिचे निरसन होणार कसे ? अडचण भाषेची. चायनात हजारात एकाला तरी इंग्रजी कळत असेल की नाही तेच जाणोत ! इकडून तिकडून कळले की, चीनमध्ये १६ ते १८ वयोगटातील मुलामुलींना सक्तीची राष्ट्रसेवा करावी लागते. या काळात सैनिकी शिक्षण दिले जाते. ते देण्यापूर्वी त्यांना रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची सफाई करणे, झाडे लावणे, रात्री गस्त घालणे यांसारखी कामे करावीच लागतात. शिस्त अत्यंत कडक, आम्ही आमच्या डब्यातल्या चकल्या, अनारसे खाण्याचा किती आग्रह केला. पण थंडपणे हसून नकारच मिळाला. दुपारी आणि रात्री विशिष्ट वेळी त्यांच्या जेवणाचे सरकारी डबे घेऊन<noinclude>{{Right|तुजसाठी मरण ते जनन.../१३१}}</noinclude> bbw1ajatid5k33pb6q72bujnmvggrog पान:मनतरंग.pdf/१४० 104 70554 155014 2022-07-23T06:57:33Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>गाडी येई. त्यातील जेवणच ते खात. दुकानातली कोणतीही वस्तू विकत घेण्याची मुभा त्यांना नव्हती. भोगवादी जाळ्यात अडकलेले व्यसनाधीन तरुण, पत्नी व मुलांचे गळे घोटणारे बाप, रिंकू, अमृताचे तरुण मारेकरी, खेड्यातल्या वा शहरातल्या पानाच्या ठेल्यावर उभी असलेली 'बेकरी'च्या होरपळीत तडफडणारी तरुण मुले...असे अनेक, पाहिले की वाटते, आमच्या भारतातही १६ ते १८ वयोगटातील मुलामुलींना सक्तीची राष्ट्रसेवा...सैनिकी शिक्षण अंतर्भूत - असायला हवी. केवळ राष्ट्रगीत ऐकून वा दूरदर्शनवरील देशप्रेमाच्या जाहिराती पाहून का कुठे तरुणांच्या अंतर्मनात अग्निबिंदू पेटत असतो ? त्यासाठी तरुणाईत प्रवेश करणाऱ्या, ज्यांच्या मनगटात उभारण्याचे आणि उद्ध्वस्त करण्याचे बळ आहे, मृत्यू ज्यांना फुलासारखा कोमलही वाटू शकतो अशा तरुण तरुणींना 'एन.एस.एस.' राष्ट्रीय सेवा योजना सारखी गोंडस देशसेवा सांगून चालणार नाही. या वयात त्यांच्या मनात एकच लक्ष्य गोंदवायला हवे. {{center|<poem>"तुजसाठी मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण !!"</poem>}}{{gap}}मग कारगिलच काय आमची कोणतीही सीमा - मग ती देशाची असो वा मनाची असो वा संस्कृतीची, ती सुरक्षित राहील.<br>{{Right|■ ■ ■}}<noinclude>{{rh|मनतरंग / १३२ ||}}</noinclude> bnuzze6ijdssk53vs2pt12m0018lxqh